Sat. Sep 24th, 2022

महाराष्ट्र

सीएए च्या समर्थनात पांढरकवडा येथे हुंकार रॅली..

यवतमाळ ::सीएए च्या समर्थनात पांढरकवडा येथे हुंकार रॅली..
यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथे आज नागरिकता संशोधन कायद्याच्या समर्थनात पांढरकवडा येथे हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला रॅली शहरभर फिरून रेलीची समाप्ती क्रीडा मंडळ मैदानात झाली यावेळी 250 फुटाच्या ध्वजा ने सर्वांचे लक्ष वेधले होते

महिला संघर्ष वाहीनीची कार्यक्रम पूर्व बैठक संपन्न

आज दिनांक १६/०२/२०२० ला महिला संघर्ष वाहीनीच्या वतीने ” महिला व बाल अर्थसंकल्प ” वर दिनांक ०६ मार्च २०२० ला नागपुर येथे परिषदेच्या नियोजनाबाबत बैठक झाले. याकरिता राज्यभरातील कार्यरत महिला संघटनाच्या सहकार्याने परिषदेत महिला अत्याचार, बालविवाह, कौटुम्बिक हिंसाचार, शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा व् पुनर्वसन, सामाजिक व् आर्थिक सुरक्षा, भेदभाव, वड़िलोपार्जित संपत्ति, कायदे व् अंमलबजवाणी, बालगुन्हेगारी, एकल महिला, शिक्षण धोरण, रोजगार व् विकासशील योजना, शासन व् प्रशासनात भागीदारी इत्यादि समस्यावर उपाययोजना व् त्यासाठी लागणारा खर्च, त्याची आर्थिक तरतूद राज्याच्या बजेटमध्ये व्हावी अश्या विविध विषयावर चर्चा होइल. या विषयावर प्रकाश टाकन्यासाठी राज्यातून तद्न्य व्यक्ति व् प्रत्यक्ष काम करणारी अनुभवी व्यक्ति निमंत्रित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या आयोजनात अधिक संघटनांचा सहभाग वाढावा व् त्याची व्यापकता वाढावी यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला ज्योती निचळ, भाग्यश्री ठाकरे, पूर्वा आकुलवार प्रणीति मेश्राम, रंजना सुरदुसे, सुजाता भोगाड़े, सरिता जूनघरे, दीनानाथ वाघमारे, धीरज भिसिकर, प्रकाश आकुलवार , अर्जुन मेश्राम , मुकुंद अडेवार इत्यादि उपस्थित होते

महात्मा फुले समता परीषद महीला प्रदेशाध्यक्ष मंजिरीताई धाडगे यांचा यवतमाळ दौरा

– – अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्या महीला आघाडिच्या *प्रदेशाध्यक्षा मा.मंजिरीताई धाडगे* ह्या विदर्भ दौऱ्यावर येत असून *सोमवार दि.१७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा.* यवतमाळ येथे येणार आहेत. *विश्राम गृह यवतमाळ* येथे आयोजित समता परीषदेच्या सभेत त्या मार्गदर्शन करतील. समता परिषदेचे नागपूर *विभागिय अध्यक्ष मा.प्रा.दिवाकरराव गमे सर व अमरावती विभागिय अध्यक्ष मा.प्रा.अरविंदजी गाभणे सर* या सभेस उपस्थित रहाणार आहेत.तरी अ.भा. महात्मा फुले समता परीषदेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सभेसाठी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन समता परिषदेचे *जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव व विनोद इंगळे* यांनी केले आहे.

गेली 25 वर्ष महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेले विकासकामांची चित्रफित

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पर्यावरण पूरक अशा बसेस बसेस लोकार्पण सोहळा नवी मुंबई मुख्यालयात पार पडला यावेळी मुख्यालयाच्या सभाग्रहात गेली 25 वर्ष महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेले विकासकामांची चित्रफित दाखविण्यात आली यावेळी माननीय विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गणेश नाईक यांचा यांचे मनःपूर्वक आभार मानले करण त्यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेने योग्यरीत्या काम करून नवी मुंबईचा विकास केला यावेळी उपस्थित मान्यवरांचा महानगरपालिकेचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व विशेषता माननीय आमदार लोकनेते श्री गणेश नाईक यांचे विशेष आभार

वसंतरावजी नाईक यांच्या स्मृती स्थळाचा विकास आता जनतेच्या हातात”

 गोर बंजारा समाजाच्या नव्हे तर बहुजनांच्या सामाजिक,राजकीय व सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक, वसंतरावजी नाईक यांच्या स्मृतिस्थळासोबतच झिलकरींचे मानधन व नागपूरचे सभागृह या मागण्या आता जनतेच्या हातात आहे,त्यामुळे या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जनतेने 19 फेब्रुवारी 2020 ला एक दिवसासाठी प्रेरणा यात्रेमध्ये मोजता येणार नाही एवढ्या संख्येमध्ये उपस्थित राहणे गरजेचे आहे असे आवाहन तांडा सुधार समितीचे मुख्य संयोजक नामा बंजारा यांनी कोरपना तालुक्यातील धानोली येथील व विद्यानगरी गडचांदूर या दोन्ही सभेतून महाराष्ट्रासह भारतातील तमाम जनतेला केले. संत सेवालाल महाराज ज्यांतिप्रीत्यर्थ धानोली तांडा येथे आयोजित आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.शासन या मागणीच्या मागे किती जनरेटा आहे याचा विचार करत असते. त्यासाठी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया व टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आपली मागणी व त्या मागणीमध्ये असलेला जनतेचा सहभाग शासनापर्यंत पोहोचवणे आवश्यक असून सगळी कामे एका दिवसासाठी बाजूला ठेवून विधानभवन नागपूर ते प्रेरणा भुमी गहुली या रॅलीमध्ये सहभागी होऊन आपले वसंतरावजी नाईकांवरचे प्रेम जनतेने दाखवून द्यावे असेही आवाहन नामा बंजारा यांनी विद्यानगरी गडचांदूर येथे आयोजित गोर सेनेच्या सेवालाल महाराज जयंती महोत्सवात केले.

रेल्‍वेशी संबंधित प्रश्‍नांच्‍या निराकरणासाठी रेल्‍वे मंत्र्यांना जिल्‍हयात आमंत्रीत करणार आ.सुधीर मुनगंटीवार

बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍थानकावर दोन फुड स्‍टॉल्‍सचे उदघाटन

बल्‍लारपूरची ओळख मिनी भारत अशी आहे. 22 राज्‍यातले लोक या शहरात वास्‍तव्‍यास आहे. सर्व दिशांना येथून रेल्‍वे जातात. त्‍यामुळे येथील रेल्‍वे स्‍टेशन तसेच चंद्रपूर येथील रेल्‍वे स्‍टेशन अत्‍याधुनिक व सुंदर व्‍हावे यासाठी मी वनमंत्री असताना वनविभागाच्‍या माध्‍यमातुन निधी देवून ही रेल्‍वे स्‍थानके सर्वोत्‍तम व देखणी व्‍हावी यासाठी प्रयत्‍न केला. रेल्‍वे विभागाच्‍या स्‍पर्धेत ही दोन्‍ही रेल्‍वे स्‍थानके देशातील सर्वोत्‍तम व प्रथम क्रमांकाची रेल्‍वे स्‍थानके ठरली. या पुढील काळातही या रेल्‍वे स्‍थानकांवर आणखी सोयी उपलब्‍ध होतील यासाठी आपण प्रयत्‍नशील असल्‍याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक 16 फेब्रुवारी रोजी बल्‍लारपूर येथील रेल्‍वे स्‍थानकावर दोन फुड स्‍टॉल्‍सचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या निमीत्‍ताने आयोजित कार्यक्रमात आ. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी स्‍टेशन प्रबंधक श्री. रामलाल, भाजपा नेते अजय दुबे, के.के. सेन, श्रीनिवास घोटकर, स्‍टॉल ओनर प्रकाश भानारकर, प्रविण कलसाईट, सुर्यनारायण राव, सुभाष पेकडे, रामलाल सिंह, भारती सोमकुंवर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी  बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, बल्‍लारपूर आणि चंद्रपूर ही रेल्‍वे स्‍थानके देशात सर्वोत्‍तम ठरली हा आपल्‍या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण होता. जे करायचे ते उत्‍तम करायचे असा प्रयत्‍न मी आजवर केला आहे व सदैव करेन. रेल्‍वेशी संबंधित प्रश्‍न व समस्‍या सोडविण्‍यासाठी मी स्‍वतः पाठपुरावा करेन. रेल्‍वे मंत्री श्री. पियुष गोयल यांना याठिकाणी आमंत्रीत करून येथील विविध प्रश्‍नांची सोडवणूक करण्‍यासाठी आपण येत्‍या काळात प्रयत्‍न करणार असल्‍याचे आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

 

रिपोर्टर, मनोज गोरे चंद्रपूर

शाहीन बाग आंदोलनात राज्य अल्पसंख्यक आयोगचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी केले मार्गदर्शन

यवतमाळ-देशात केंद्र सरकार कडून पारित करण्यात आलेल्या नागरिकता संशोधन कायदा,एनआरसी व नवीन एनपीआर सारख्या निर्णयाविरुध्द यवतमाळात दिल्लीच्या धर्तीवर शाहीन बाग कमिटीच्या वतीने 1 फेब्रूवारी पासून महिलांकडून 15 व्या दिवशीही आन्दोलन सुरुच असून यात मोठ्या संख्येने अल्पसंख्यक मुस्लिम व इतर धर्मीय महिला,युवती सामिल होत आहे.बॉयकॉट सीएए, रिजेक्ट एनपीआर,इंकलाब जिंदाबाद,बच्चा बच्चा जाग उठा है शाहीन तेरे नारों से,सारखे नारे परिसरात गुंजत आहे.दरम्यान आज 15 फेब्रूवारी रोजी शाहीनबाग आन्दोलनात राज्य अल्पसंख्यक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम व मौलाना अबु तल्हा यांनी सम्बोधित केले.दुपारी धरनेमण्डपात मार्गदर्शनात मुनाफ हकीम म्हणाले की,आज या शासनाने देशातील नागरिकावरच आपली नागरिकता सिद्ध करण्याची वेळ आणली आहे,गैरसंविधानिक प्रकारे सिटिजनशिप अमेंडमेंट एक्ट आणून व मनमानीपने एनपीआर प्रक्रिया राबवून मोदी सरकार हुक़ूमशाही करीत असून नागरिकतेचा मुद्दा फक्त मुस्लिमाशी नव्हे देशातील सर्व धर्म,समाजाशीही निगडित आहे,त्यामुळे या आंदोलनात अन्य सर्व धार्मिक सामाजिक संघटन,यांना सामिल करा,विद्यार्थी संघटनानी यात प्रामुख्याने सामिल होत संविधानिक लढा उभारने गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.सदर कायदा व तत्सम निर्णय हे असंवैधानिक, देशाच्या,एकता अखण्डता व धर्मनिरपेक्ष तत्वाला तड़ा घालनारे आहे,यामुळे शाहीन बाग आन्दोलनात सर्वच संविधान व देशप्रेमी संघटन,नागरिक,महिला पुरुष आपला पाठिम्बा दर्शवून सामिल होत आहे.या आन्दोलनाची दखल घेवून सरकार हा कायदा जो पर्यन्त मागे घेत नाही तो पर्यन्त हा लढा सुरुच राहणार आहे.अशी भूमिका आता घेण्यात आली आहे. याप्रसंगी उपस्थित महिलांना संबोधित करताना यांनी यांनी म्हटले की,देशात सर्व समाज व धर्म शांततेने नांदने आवश्यक आहे,नागरिकता संशोधन विधेयकाविरुद्ध महिलांची आवाज बुलंद आहे यात अल्लाह मदत करेल त्यामुळे पूर्ण समाजाचा बेड़ा पार होईल,मुख्य म्हणजे आम्ही आपले कर्म सोडले त्यामुळे ईश्वर आमच्याशी नाराज आहे,जेव्हा ईश्वर नाराज होतो तेव्हा अशा मानसिकतेची सरकार येत असते,ते म्हणाले कि आपल्यासाठी शासनाची जुबान मधू सारखी गोड़ मात्र मन खूंखार भेड़िये सारखा आहे, आपला आंदोलन व आवाज अभिनंदनीय व चांगला आहे, सरकारविरुद्ध आवाज बुलंद केल्यावर ही सत्ता व त्याचे निर्णय मागे होईल या शब्दात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

माननीय महोदय,
सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक/ वृत्तवाहिनीमध्ये सदर बातमी
प्रकाशीत करून सहकार्य करावे ही आग्रहाची विनंती.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘मिशन उभारी’ – जिल्हाधिकारी एम.डी. सिंह

यवतमाळ दि. 17 : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख कायमची पुसून टाकण्यासाठी व शेतक-यांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यात ‘मिशन उभारी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती यवतमाळचे नुतन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी आज (दि. 17) बैठकीत दिली.
बीड जिल्ह्यातील ‘मिशन दिलासा’ च्या धर्तीवर हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सर्व विभागाच्या समन्वयाने विविध शासकीय योजना, सीएसआर फंड यांच्या मदतीने शेतक-यांचे जीवनमान उंचाविणे, त्यांच्यातील नैराश्य कमी करणे, आत्महत्या होणार नाही, याकडे लक्ष देणे आदी बाबी या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.
दर मंगळवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी स्वत: उपस्थित राहून शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा घेतील. यात गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, बीट जमादार यांच्यासह संबंधित आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी कुटुंबातील सदस्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल. तसेच त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात येतील.
येत्या 15 दिवसांत ‘एक खिडकी योजना’ : शेतकरी व इतर नागरिकांना सर्व योजनांची माहिती व लाभ एकत्र मिळण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर ‘एक खिडकी योजना’ येत्या 15 दिवसांत जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येईल. यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व इतर विभाग प्रमुख यांचा समावेश राहील. शेतक-यांना विविध कार्यालयात जावून अर्ज करण्याची गरज पडू नये म्हणून त्यांना एकाच ठिकाणी अर्ज करण्याची व विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याप्रकरणात मोठ्या प्रमाणात घट किंबहुना एकही शेतकरी आत्महत्या न होऊ देणे, यासाठी प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

आपल्या देशासाठी व्हॅलेंटाईन डे नाही फक्त तो काळा दिवस, सौ मायाताई शेरे

काल दिनांक 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे साजरा करू नका शहिदांना श्रद्धांजली द्या आणि हा दिवस काळा दिवस असे संबोधित सौ मायाताई शेरे यांनी श्रीमती जानकीबाई वाधवानी कला महाविद्यालयात विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांन सोबत संवाद साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी सीनियर कॉलेजचे प्राचार्य जयंत चतुर सर तसेच प्राचार्य संगीता वेरुळकर मॅडम प्राध्यापिका गोडघाटे मॅडम शिंदे मॅडम इंगोले मॅडम इत्यादी उपस्थित होत्या आज 14 फेब्रुवारी हा दिवस आपल्यासाठी काळा दिवस आहे असे संबोधित मायाताई शेरे यांनी केले आज एक वर्ष होऊन गेले कश्मीर मधील पुलवामा पुलवामा येथे भ्याड हल्‍ल्‍यात शहीद झालेल्या भारत मातेच्या सुपुत्रांना श्रद्धांजली द्या व्हॅलेंटाईन डे साजरा करणे ही आपली संस्कृती नव्हे आज 14 फेब्रुवारी प्रत्येक ठिकाणी मुला-मुलींमध्ये व्हॅलेंटाईन डे पार्टी साजरी होत असते आपल्या त्यासाठी आपल्या आई-वडिलांसोबत खोटे बोलून हा दिवस मित्र-मैत्रिणी मध्ये साजरा केला जातो येथे ते कुठेतरी आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालला आहे आपले खरे व्हॅलेंटाईन म्हणजेच आपले आईवडीलच ही जनजागृती आजच्या पिढीला करून देण्याची खरी गरज आहे आज आपण रोजच्या दिवसाला बघतो की रोज एक निर्भया कांड होत चाललेला आहे हे जर कुठे थांबवायचं असेल तर सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना आई-वडिलांचं प्रेमाची जाणीव करून देणे गरजेचे झाले आहे आज छोट्या छोट्या मुली पासून ते महिलांपर्यंत अत्याचार थांबवायचे असेल तर शाळा असो कॉलेज असो यामध्ये सर्व शिक्षकांनी एक दिवस मुला-मुलींमध्ये हे कौन्सिलिंग केले पाहिजे त्यामध्ये विद्यार्थ्यांचे पालकांचाही समावेश असायला पाहिजे आजची पिढी इंटरनेटच्या माध्यमातून चुकीच्या दिशेने पाऊल उचलत आहे इंटरनेट हा माध्यम चांगला ही तेवढाच आहे तर वाईटही पण चांगल्या चा उपयोग आजकालची पिढी बिलकूल करत नाही आहे यापुढे कुठेही निर्भया कांड घडू नये त्यासाठी पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे तसेच मुलींनी सुद्धा कोणत्याही घटना आपल्या सोबत बाहेर घडत असल्यास तर आपल्या आई-वडिलां ना विश्वासात घेऊन गोष्टी समोर आणाव्यात त्या वेळेलाच हे असे निर्भया कांड होणार नाही असे सौ मायाताई शेरे यांनी सांगितले तसेच संवाद साधण्या पूर्वीच सर्व शहिदांना श्रद्धांनी अंजली अर्पण करूनच सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी तनिष्काच्या सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या राधिका आव्हाड प्रणिता खडसे अनिता खडसे विद्या ताई खडसे प्रणिता जोशी नगरसेविका संगीता कासार माधुरी मेश्राम गायकवाड व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या

लखमापूर येरवा हे गाव अजूनही अंधारातच

चंद्रपूर जिल्हातील राजुरा मतदारसंघातील जिवती तालुक्यातीलभारी ग्रामपंचायत हद्दीतील लखमापूर या विकासापासून वंचित असलेल्या आदिवासी ग्रामीण भागात अद्याप वीज पुरवठा झाला नाही. १६ घरे १२० ते १५० लोकांची वस्ती असलेल्या या भागात गोंड समाजाचे लोक रहातात. सतत अंधारात राहून आमच्या गावात कधी वीज पुरवठा होणार असे वस्तीतील ८५ वर्षांच्या वृद्ध सांगत होती.
या गावात मोबाइल पोहोचला तरी वीज मात्र अद्याप पोहचली नाही. या वस्तीतील विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत. या मुलांना केरोसिनच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे अंधारामध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागत असतील तर देशातील गावे स्मार्ट व्हिलेजकशी होणार हा एक प्रश्नच आहे. लखमापूर वस्तीवर अजूनही वीज पोहोचली नाही. या गावामध्ये मूलभूत सुविधा पोचणार की नाही? आपले संपूर्ण आयुष्य हे अंधारामध्येच काढावे लागणार की काय ह्याची चिंता समस्त ग्रमस्ताना भेडसावत आहे.
तारा तूटुन, पोल पडून आहे.
हेच कारण सांगून विजेच्या समस्येकडे दुर्लक्ष केला जात आहे असा आरोप ग्रमस्तानी केला आहे. लखमापूर येथे वीज पुरवठा करून देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्तानी केली आहे. देश स्वतंत्र होऊन सुद्धा ह्या गावात वीज पोहचली नसल्याने शोकांतिका व्यक्त केली जात आहे.
एकदा नव्हे; तर तीनदा सर्व्हे होऊन काहीच झाले नाही. अनेक वेळा अर्ज करूनही गावात वीज आली नाही. गांव तीस वर्षांपासून अंधारातच आहे. मात्र नव्या पिढीला तरी प्रकाश मिळावा ही अपेक्षा गावातील नागरिकांनी वर्तविली आहे.
मराईपाटण लखमापूर या गावात कनेक्शन घेण्यासाठी पोल व लाईन घेण्यात आली परंतु पहाडी व जंगलातुन लाईन गेल्याने काही खांबे/पोल पडलेले व वाकलेले आहे. त्यामुळे विज पुरवठा शक्य नव्हता. म्हणून नवीन लाईन येरवा ते लखमापूर अशी कनेक्शन प्रपोजल पाठवून ती मंजूर झालेले आहे व टेंडरला सुध्दा टाकली आहे. ती टेंडर निघाल्यानंतर लवकरच येरवा ते लखमापूर अशी लाईन टाकून विद्युत सुरु केल्या जाईल अशी माहिती
*एम. टी. राठोड उपकार्यकारी अभियंता, जिवती* यांनी
आमच्या प्रतिनिधीशी बातचीत करतांना दिली आहे.

– या प्रसंगी (लखमापूर येथील नागरिक)भिमराव वेडमे, चिंन्नू कोटनाके, जागेराव कोटनाके, रघुनाथ कोटनाके, देवराव , जंगुबाई कोटनाके, जनाबाई कोटनाके, राधाबाई वेडमे, लिंगुबाई आडे, रुपाबाई कोटनाके आदी उपस्थित होते.

-मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा