Sat. Sep 24th, 2022

भारत

– अबब…..58 वर्षानंतर आले सर्वात मोठे कंकणाकृती सूर्यग्रहण ; विद्यार्थ्यांनी नाश्ता करून दिली अंधश्रद्धेला मुठ माती

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून नागरिक आणि विद्यार्थ्याना सूर्यग्रहणाचे वेध सुरू होते. 58 वर्षानंतर सर्वात मोठे सूर्यग्रहण बघण्याचा अनुभव खगोल अभ्यासक आणि विध्यार्थ्यांनी घेतला. स्काय वॉच ग्रुपने यवतमाळ येथे सूर्यग्रहण बघण्यासाठी पुढाकार घेतला होता.

 

आनंद. रवींद्र खराबे
खगोल अभ्यासक

ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहकणाचे नीट दर्शन होऊ शकले नाही, अशी खंत काहींनी व्यक्त केली. पृथ्वी आपल्या कक्षेमध्ये फिरत असतानाच सूर्याभोवती सुद्धा प्रदक्षिणा घालीत असते. दुसरीकडे चंद्र सुद्धा पृथ्वीभोवती चक्कर घालत असतो. त्यामुळे जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. तेव्हा पृथ्वीवर सूर्य काही प्रमाणात दिसण्याचे बंद होते. याच घटनेला सूर्यग्रहण असे म्हटले जाते. या खगोलीय घटनेमध्ये सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे तीनही एका रेषेत असतात.

रवींद्र खराबे
खगोल अभ्यासक

सूर्यग्रहण बघण्याबावत समाजात अजूनही अंधश्रद्धा आहे. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. स्काय वॉच ग्रुपने याच काळात नास्ता केला. सूर्यग्रहण दहा वर्षांतून एकदा येते. आजचे कांकणाकृती सूर्यग्रहण 58 वर्षांनंतर आलेले सर्वांत मोठे सूर्यग्रहण होते.

 

 

रिपोर्टर, संजय राठोड यवतमाळ

मो. 9764917444

 

झारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभवः बाळासाहेब थोरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीला जनतेने नाकारले

भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात झारखंडची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाली. झारखंडमधील भाजपचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याने जनतेचे जीवनमान प्रचंड खालवले असताना स्थानिक जनतेचे मुलभूत प्रश्न सोडून राष्ट्रीय प्रश्न त्यांच्यावर थोपवण्याचे भाजपचे राजकारण झारखंडच्या जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. खोट्या राष्ट्रवादाची अफूची गोळी, कलम ३७० चे भांडवल आणि नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि पाकिस्तान या सगळ्या मुद्द्यांवर राजकारण करून निवडणूक जिंकण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांचा प्रयत्न जनतेने हाणून पाडला आहे. आणि भाजपच्या जनविरोधी राजकारणाचा पराभव केला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, २०१७ पासून देशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत कोणत्याही राज्यात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले नाही. झारखंड राज्याची निर्मिती झाल्यापासून तेथे भाजप आघाडीचे सरकार अस्तित्वात होते. काँग्रेस पक्ष तिथे कधीही सत्तेत आला नाही. प्रथमच भारतीय जनता पक्ष सत्तेबाहेर जाणार आहे आणि काँग्रेस आघाडीचे सरकार येणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत जवळपास ३७ जागा जिंकून बहुमताच्या जवळपास असणा-या भाजपकडे पाच वर्षात झारखंडचा विकास करण्याची नामी संधी होती. परंतु पाच वर्षात भाजप सरकारने झारखंडला पिछाडीवर नेले. २०१४ साली ७.३२ टक्के असणारा राज्याच्या सकल उत्पन्न वाढीचा दर हा २०१९ पर्यंत ५.२ टक्क्यांपर्यंत घसरला. बेरोजगारीचा दर हा १५.१ टक्क्यांपर्यंत गेला. दरडोई उत्पन्नामध्ये झारखंडचा क्रमांक २८ वरून ३० वर गेला. गरिबी ८.६ टक्क्यांनी वाढली. उद्योगधंदे बुडाले नविन गुंतवणूक आली नाही. आदिवासींचे प्रश्न अधिक गंभीर झाले. शेतकरी हवालदिल झाला, भूकबळी गेले. हे अपयश झाकण्याकरिता निवडणुकांपूर्वी  महाराष्ट्राप्रमाणेच

मेगाभरती हाती घेऊन विरोधी पक्षातून ११ आमदार आयात केले पण झारखंडच्या जनतेने भाजपच्या अनैतिक राजकारणाचा दणदणीत पराभव केला. मोदी शाह यांनी प्रत्येकी ९ सभा घेऊन राज्याच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला, तो ही सपशेल अयशस्वी ठरला आहे. देशपातळीवर आणखी एक राज्य भाजपच्या हातून गेल्याने काँग्रेस मुक्त भारताची घोषणा देणा-या भाजपला स्वतःच्या अस्तित्वासाठी लढावे लागेल. भाजपच्या जनविरोधी आणि विभाजनवादी धोरणांविरोधात देशात प्रचंड जनआक्रोश आहे, हे देशपातळीवर सुरु असलेल्या आंदोलनातून आणि आजच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. झारखंडमध्ये येणारे नवे सरकार गरीब, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, महिला, तरूण,विद्यार्थी यांचे असेल.महाराष्ट्रातील सरकारप्रमाणे झारखंडमधील काँग्रेस आघाडीचे सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेईल असा विश्वास करून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

काँग्रेसकडून स्वांतत्र्यवीर सावरकरांची बदनामी का?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी झारखंड येथील जाहीर सभेत मोदी सरकारच्या “मेक इन इंडिया” या योजनेवर टिंगल करताना घसरले व त्यांनी यातून “रेप इन इंडिया” असे वक्तव्य केले. त्याच्या वक्तव्यावर संसदेच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहात भाजप सदस्यांनी राहूल गांधी यांनी माफी मागावी,अशी मागणी केली. भाजपच्या मंत्री स्मृति इराणी यांनी तर गांधीचे हे वक्तव्य देशाचे व विशेषत: महिलांचा अवमान करणारे आहे,असे म्हणत त्यांना अडचणीत आणले.या विषयावर संसदेत गोंधळ चालू असताना गांधी हे सभागृहात होते, मात्र विषयावर हसत होते.त्यांना या विषयाचे गांभीर्य वाटले नाही.त्यांनी संसदेत माफी मागितली असती तर या विषयावर पडदा पडला असता.काँग्रेस नेत्यांना भाजप सरकारच्या धोरणावर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण टीका करताना मर्यादा व भान असले पाहिजे.पण राहूल गांधी अनेक वेळा भावनेच्या भरात बेताल बोलतात,आणि फसतात, असे त्यांचे झालेले आहे. “चौकीदार चोर है” म्हणताना त्यांनी न्यायालयाचा हवाला दिला,ते अडचणीत आले. त्यांना या प्रकरणात न्यायालयात माफी मागावी लागली. राहूल गांधीच्या बेताल वक्तव्याचा आधार पाकिस्ताने तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेतला. त्याचप्रमाणे त्यांनी गांधीजींची हत्या आर. एस.एस. ने केली,असा आरोप केला होता,या आरोपावरून ते आता न्यायालयात चकरा मारत आहेत.
संसदेत गेल्या काही दिवसापासून मोदी सरकारने अनेक महत्वपूर्ण विधेयके पास करून घेतली आहेत. राज्यसभेत भाजपला बहूमत नसताना त्यांंनी प्रत्येकवेळी इतर विरोधी पक्षाची साथ मिळली आहे. संसदेत काँग्रेस पक्ष भाजप सरकारला घेरण्यात कमी पाडला.त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्ष दुबळा होत चालला, अशी प्रतिमा जनतेपर्यंत जात होती. काँग्रेसच्या सोनिया गांधी व राहूल गांधी हे दोघेही लोकसभा सदस्य आहेत, पण हे दोघे सभागृहात बोलत नाहीत. राहूल गांधी यांनी बोलण्याचा प्रयत्न जरी केला,तर ते कधी डोळे मारतील, पतंप्रधानाशी गळा भेट करतील , गांभीर विषयावर चर्चा होत असता झोपा काढतील. त्यांच्या या बालीश वागण्यामुळे फजिती झाली व राजकीय विनोद घडत गेले.त्यांना देशातील योजनांची माहिती नाही,असे दिसले.त्यांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव सांगता आलेले नाही. संसदेत होत असलेल्या सतत पराभवामुळे काँग्रेस पक्षाने पक्षाला उभारी मिळावी व गांधी घराण्याचे नेतृत्व वाचविण्याच्या उद्देशाने दिल्लीत “भारत बचाओ” सभेचे आयोजन गेल होत. याशिवाय कोणतेही सभा घेण्याचे कारण नव्हते. काँग्रेसनेचे नेत्यांनी मोदी सरकार धोरणांचे वाभाडे काढणे टीका करणे, इथपर्यंत ठीक होत. पण राहूल गांधी यांनी भाषणात मोदी व शहा यांना वैयक्तिक टार्गेट करताना ” मी माफी मागणार नाही मी” राहूल सावरकर नाही, राहूल गांधी आहे” असे बोलून गेले.त्यामुळे काँग्रेस पक्षाचा सभेतून सरकारला घेरण्याचा जो उद्देश, विषय तोच नेमका बाजूला पडला. या सभेचा डाव काँग्रेसच्या अंगलट आला. त्यांनी सावरकर व गांधी आडनावाची तुलना केली, ती शोभणारी मुळीच नाही. तेंव्हा भाजप नेत्याने गांधी हे उसने आडनाव नाव लावून कोणी गांधी होत नाही त्यांना आरसा दाखविला.राहूल गांधी यांनी दगड मारून स्वत: वर अंगावर चिखल ओढून घेतला. भाजप म्हणत ते खरेही आहे. राहूल यांचे आडनाव गांधी हे नसून ‘खान’ आहे. कारण त्यांचे आजोबा फिरोजखान काँग्रेसचे नेते व पत्रकार होते. फिरोजखान श्रीमती इंदिरा गांधी यांचेशी “निकाह” केला होता . त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता व स्वत: चे नाव” मैमुना बेगम” स्वीकारले होते. जेंव्हा पंडित नेहरूंनी यांच्या विवाहाची माहिती मिळाली,ते संतापले, त्यातून वाद निर्माण झाला. त्यावेळी म. गांधींनी मध्यस्थी केली, त्यांना स्वत: चे खान यांना आपले गांधी आडनाव दिले.तेंव्हा पासून हे खानदान गांधी म्हणून वावरत आहे. वास्तविक फिरोजखान यांचे मृत्यूनंतर त्यांचे दफन करण्यात आले. त्यांची प्रयागराज (अलाहाबाद ) येथे आजही कबर पहावयास मिळेल. एकदा राहूल गांधी अंधारात कबर पहाण्यासाठी गेले होते. राजीव गांधी यांनी सोनिया गांधी विवाह केला. सोनिया गांधी या इटलीतील विसेन्जा या खेड्यातील.त्यांचे मूळ नाव ‘एंटोनिया माइनो’ असे आहे.त्या विवाह करून भारतात आल्या. नंतर पंधरा वर्षानंतर १९८३ त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळवल. त्या संसदेत पोहचल्या. त्यांचे पंतप्रधानांचे स्वप्न शरद पवारांनी धूळीला मिळविले. या गांधी खानदाने सावकरकरांवर देशभक्तीवर प्रश्न चिन्ह उभे करावेत,याचे आश्चर्य वाटते.या गांधी घराण्याला स्वांतत्र्यांचा इतिहास केवळ गांधी व नेहरू पुरता मर्यादित आहे, असेच दिसते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या चौफेकर बधूंचा इतिहास माहित नसावा. देशासाठी बलिदान देणार्‍या हुतात्मांची, घरादाराची राखरांगोळी करणारे कुटुंबाची नावे त्यांना माहित नसावीत. राहूल गांधी, संसदेत “तुमचे सावरकर, आमचे गांधी’ असा शब्द प्रयोग केला होता. ते जी टीका करतात आश्चर्य वाटण्यासारखे नाही. कारण ते अज्ञानपणातून टीका करत असतात. त्यांना अज्ञानातून आनंद मिळत असतो. काँग्रेसचे स्वातंत्र्यानंतर नंतर हिंदू नेत्यांना टार्गेट करणे, त्यातून सावकरकरांची बदनामी करण्याचे राजकारण चालूच आहे. काँग्रेसची नीतीही सावरकारांना बदनाम करण्याचीच राहिलेली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व श्रीमती इंदिरा गांधी यांचे देशात व राजकीय क्षेत्रात्र योगदान आहे,त्याच बरोबर त्यांनी मोठ्या घोडचूकाही केल्या, हा इतिहासच सांगतो. राष्ट्रीय पक्षाचा नव्या पिढीतील तरूण नेता राहूल गांधी हे जबाबदारीने बोलतील असे वाटत होते. पण त्यांचा अजूनही थिल्लरपणा गेलेला नाही. त्यांनी अंदमान- निकोबार येथे जाऊन सावरकरांना ज्या कोठडीत ठेवले, तेथे जाऊन पहावे, त्यांनी तेथे सावरकारांना काय यातना भोगल्या असतील, ते कळेल. सावरकर कुटुंबाची वाताहात झालीच. गांधी हत्येनंतर सावकरांच्या एका भावाला दगडाने ठेचून मारले गेले. पाच ब्राह्मणांची कत्तल करण्यात आली, त्यांची घरे जाळण्यात आली.याबद्दल काँग्रेसने कधी माफी मागितली नाही.
काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने स्वांतत्र्यानंतर प्रखर हिंदूत्व नेतृत्व करणारे, हिदू महासभेचे अध्यक्ष विनायक दामोदार सावकरकर यांना शह व बदनाम करण्याचा डाव ‘डायनिंग टेबलवर’ रचला .यातूनच माफीचा साक्षीदार दिगंबर बडवे यांच्या साक्षीवरून पोलिसांच्या मदतीने गांधीजींच्या हत्याच्या प्रकरणात सावरकरांना मुद्दाम गोवण्यात आले. हे सर्व इतिहास संशोधक प्रा.शेषराव मोरे यांनी लिहिलेले ” गांधी हत्या व सावकरांची बदनामी’ हे पुस्तक वाचल्यानंतर कळेल. २००४ अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात मध्ये संसदेच्या सेंट्रल हाॅल मध्ये सावकरांच्या तैलचित्र लावण्याचा कार्यक्रम होता. त्यावेळी काँग्रेस व विरोधी पक्षांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.संसदीय इतिहासातील पहिलीच घटना असावी. त्यानंतर २००४ अब्दूल नुरानी यांचे सावरकर-हिंदूत्व – गोडसे कनेक्शन आणि २००७ तुषार गांधी यांच्या “लिटस् किल गांधी” पुस्तकांनी सावकर विरोधकांना बळ दिले. त्यानंतर श्रीकांत शेट्ये यांची ‘माफीवीर सावरकर ‘यांचे पुस्तक प्रकाशित झाले. सावरकरांनी माफी किती वेळा मागितली याच्या तारखा त्यांनी दिल्या आहेत. लोकांच्या अज्ञान हेच पुरोगामी दहशतवाद्यांचे भांडवल आहे. सावरकर हे ज्वलंत देशभक्त, सूधारक, साहित्यिक, कवी, इतिहासक, राजकारणी आदी विविध पैलूंनी त्यांची ओळख आहे.पुरोगामी मंडळी सावकारांच्या विचारांना विरोध करत नाहीत,त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे बोट दाखवित असतात. सावरकरांनी स्वत: माफीपत्राबाबत स्पष्टीकरण केलेले आहे, तो आपल्या रणनीतीचा भाग होता, आपण तुरूंगाबाहेर येऊन, आपणाला हवे ते काम करता येईल. हे त्यांचे म्हणणे आहे. पण सावरकर विरोधकांना ते मान्य नाही. त्या पत्राचे भांडवल करत त्यांना कायर ठरवित आहेत .ते जर असते इंग्रजाविरोधात लढा दिला नसता. त्यांना दोन वेळेस पंचेवीस -पंचेवीस वर्षाची दोन वेळेस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये खोली क्रमांक ५२ मध्ये ठेवले गेले.त्यांचा कैदी क्रमांक ३२७७८ असा होता. त्यांच्या हाता- पायात बेड्या घातल्या जात होत्या. यालाच काळ्या पाण्याची शिक्षा म्हणतात. कैदत असताना विटाच्या तुकड्यांनी भिंतीवर सहा कविता लिहिल्या व पाच पुस्तके लिहिली.ते विचारवंत होते, त्यांचे सामाजिक कार्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.गांधीजींच्या हत्येच्या कटात स्वातंत्र्यवीर सावकरकरांचा अजिबात संबंध नाही, हे न्यायालयाने १९४९ मध्ये दिलेल्या निकालात स्पष्ट केले.या निकालाच्या विरोधात त्यावेळच्या काँग्रेस सरकारने वरिष्ठ न्यायालयात अपील केले नाही. पण गांधी हत्येनंतर ३० जानेवारी १९४८ नंतर तब्बल अठरा वर्षांनंतर १९६६ मध्ये काँग्रेस सरकारने माजी न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांची एक सदस्यीय चौकशी आयोग नेमला होता.या आयोगाला केवळ तीन कारणांची चौकशी करावयाची होती, गांधी हत्येची पूर्व कल्पना होती का? त्याबाबत आयोगाने चौकशी तर केली नाही, उलट आयोगाने अहवाल गांधी हत्येच्या कटात सावरकारांची शक्यता असल्याचे नमुद केले.कपूर आयोगाचे दोन खंड आहेत. या आयोगाने घटनाबाह्य काम केलेच त्याच बरोबर त्यांनी गांधी हत्याबाबत सावकरांचा जो उल्लेख केला आहे, त्यालाही कोणताही पुरावा, आधार नसल्याचे प्रा. मोरे यांचे स्पष्ट म्हणणे आहे,त्यांनी कपूर आयोगाच्या कथित नोंदीवरून सरकारलाच आव्हान दिले आहे.कपूर आयोगाच्या या बनावट नोंदीच्या आधारावर काँग्रेस पक्ष गेले कित्येक वर्षापासून सावकरांची बदनामी करत आहेत. सावकरांचे अनुयायी कमी मात्र विरोधक अधिक आहेत. त्यांचा राजकीय विरोध इतका टोकाला गेला आहे की,स्वातंत्र्यवीर सावरकारांची प्रखर देशभक्त असलेली जनमानसातील उज्वल प्रतिमा कलंकित करण्याचा प्रयत्न होत आहे, त्यात काँग्रेस पक्ष, मार्क्सवादी, समाजवादी ही राजकीय मंडळी पुढे आहे. काँग्रेसला तर प्रखर हिंदूत्व नेतृत्व केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा कलंकित करून देशातील अल्पसंख्याकांची व्होटबँक” मजबूत करावयाची आहे, हेच दिसते.

भारतीय सैन्यदल प्रमुखपदी श्री.मनोज नरवणे अधिकाऱ्याची वर्णी

नवी दिल्ली | भारतीय सैन्यदलप्रमुख या महत्वाच्या पदावर एका मराठी अधिकाऱ्याची निवड झाली आहे. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे असं या मराठी अधिकाऱ्याचं नाव आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनलर बिपीन रावत यांची 31 डिसेंबर 2019 रोजी मुदत संपत आहे. त्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे लष्करप्रमुखपदाची कमान सांभाळतील.

लेफ्टनंट जनरल नरवणे सध्या आर्मी स्टाफचे उपप्रमुख म्हणून काम करत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे ते 28 वे लष्करप्रमुख ठरणार आहेत. नरवणे यांच्या निवडीसह आता हवाईदल, नौदल आणि भूदल अशा तिन्ही दलाच्या प्रमुखपदी राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 56 व्या बॅचचे अधिकारी विराजमान होतील.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी दक्षिण दिल्लीत हिंसक आंदोलन

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी दक्षिण दिल्लीत हिंसक आंदोलन आंदोलकांनी बस जाळल्या तसेच दगडफेक केली. हिंसक आंदोलन रोखण्याच्या प्रयत्नात ६ पोलीस जखमी झाले. जखमी पोलिसांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

LIVETV | पोलिस बेसावध आणि निष्काळजी होते का?

बलात्काराचे आरोपी ठार झाल्याचा आनंद असला, तरी पोलिसांच्या कृत्याला जाहीर समर्थन दिल्याने ते कायदा हातात घेण्याची भीती, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राला दोन ‘फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार’

 

नवी दिल्ली, 5 : चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारीका छाया पाटील आणि जळगाव जिल्हयातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रा


च्या आरोग्य सहाय्यक आशा गजरे यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्काराने’ गौरविण्यात आले.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार-2019 चे वितरण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि मंत्रालयाच्या सचिव प्रिती सुदान यावेळी मंचावर उपस्थित होत्या.

या समारंभात देशभरातील एकूण 35 परिचारीका, परिचारीका सहाय्यक आणि महिला आरोग्य सहाय्यीकांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. केरळ मधील कोझीकोड येथील परिचारीका लिनी साजीश यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला, त्यांच्या पतीने हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्रातून चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारीका छाया पाटील आणि जळगाव जिल्हयातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक आशा गजरे यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारीका छाया पाटील या गेल्या 29 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हयातील आदिवासी भागांमध्ये 17 वर्ष सेवा दिली तर 10 वर्ष त्या शहरी भागातील आरोग्य सेवेते कार्यरत होत्या. चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी व नक्षलप्रभावीत भागांमध्ये पायी तर कधी सायकलवर प्रवास करून त्यांनी लसीकरण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. श्रीमती पाटील यांनी कुटुंब नियोजन कार्यक्रम, मलेरिया लसीकरण, रूग्णालयांमध्ये प्रसुतीसाठी प्रोत्साहन देणे आदि केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सक्रीय सहभाग घेवून उल्लेखनीय काम केले आहे. वर्ष 2015-16 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या लसीकरण अभियानात श्रीमती पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका वठवली आहे. तसेच, 1991-92 मध्ये चंद्रपूर जिल्हयात साथीचे रोग नियंत्रण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात श्रीमती पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केले. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आज सन्मानित करण्यात आले.

जळगाव जिल्हयातील चोपडा तालुक्यातील लासूर प्राथमिक केंद्रातील आरोग्य साहाय्यक आशा गजरे या गेल्या 33 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सर्वाधिक 28 वर्ष शहरी भागात तर 5 वर्षे आदिवासी भागात आरोग्य सेवा प्रदान केली. श्रीमती गजरे यांनी कुष्ठरोग नियत्रंण कार्यक्रम, क्षयरोग, मनोविकार, संसंर्गजन्य रोग, लसीकरण आदी केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी आरोग्य कार्यक्रमांच्या अमंलबजावणीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी कौशल्य विकासासाठी विविध प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी एमएमआर (गालगुंड, गोवर, रुबेला लसीकरण कार्यक्रमाद्वारे) शून्य टक्कयांवर आणला तर नवजात बालकांच्या मृत्युदरावर नियंत्रण आणले. श्रीमती गजरे यांचे आरोग्य सेवेप्रती समर्पण व उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

*!! श्री विघ्नहर्ते नमः !!* 🇮🀠 🌞 *पंचांग* 🌝🇮🀊 *दिनांक ४ डिसेंबर २०१९*

 

 

🔥 *अग्निवास* अग्निवास पृथ्वीवर नाही.
💥 *आहुती* शुक्र मुखात आहुती.
🌎 *युगाब्द*-५१२१
*संवत* -२०७६
*भारतीय राष्ट्रीय सौर अग्रहायण* १२
*शालिवाहन शके* -१९४१
*संवत्सर* – विकारी
*अयन* – दक्षिणायन
*सौर ऋतु* – हेमंत
🌳 *ऋतु* – शरद
☀ *मास* – मार्गशीर्ष
🌗 *पक्ष* – शुक्ल
⚡ *तिथी* – अष्टमी (२५|४४)
🌺 *वार* – बुध (सौम्य वासरे)
⭐ *नक्षत्र* – शततारका (१७|१९)
💫 *योग* – हर्षण (१४|५३)
🌟 *करण* – विष्टि (१२|२८)
– बव (२५|४४)
🌝 *चंद्र राशी* – कुंभ
🌛 *सूर्य राशी* – वृश्चिक
*सूर्य नक्षत्र* – ज्येष्ठा (१)
🌕 *गुरू राशी* – धनु
*गुरू नक्षत्र* – मूळ (२)
*सुर्योदय* 🌅 – ०६|५८
*सुर्यास्त* 🌄 – १७|५९
⛳ *दुर्गाष्टमी,बुधाष्टमी* भद्रा १२|२८ पर्यंत .

🔅 *दिशा शूल* उत्तर . .

☀ *चंद्रबळ*
🔅 मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुम्भ .
⌛अशुभ वेळ *राहु काळ*
१२|२९ ते १३|५१
⏳शुभ वेळ *अभिजित मुहुर्त*
१२|०६ ते १२।५१
🕰 *शिवलिखीत चौघडिया*
लाभ ०६|५८ ते ०८|२१
अमृत ०८|२१ ते ०९|४३
शुभ ११|०६ ते १२|२९
लाभ १६|३६ ते १७|५९
🔔 *उपासना*
” ॐ श्री विष्णवे नमः”
“ॐ बुं बुधाय नमः”

*शुभाशुभ दिन*
चांगला दिवस आहे.

*सुभाषित*
*सन्तोषः परमो लाभः सत्सङ्गः परमा गतिः ।विचारः परमं ज्ञानं शमो हि परमं सुखम् ।।*
संतोष सबसे बडा लाभ है, अच्छी संगत परम गति है, सुविचार(विवेकद्वारा चिंतन) सबसे बडा ज्ञान है और शांति सबसे बडी सुख है !

*आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.*
*‼दैनिक राशिभविष्य .‼*
*‼बुधवार, दि . ०४ / १२ / २०१९‼*

*मेष राशी .*
आरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या असाईनमेंटवर तुम्हाला जाता न आल्यामुळे तुम्हाला माघार घ्यावी लागेल, पण तुमचे तर्कशास्त्र वापरून पुढे जात राहा. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत, विशेषत: तुम्ही धोरणीपणाने वागला नाहीत तर नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. लकी क्रमांक: 3 .

*वृषभ राशी .*
तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकाल, आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवाल. आजचा दिवस विशेष साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत कॅण्डललाईट डीनरचा आस्वाद घ्या. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. तुमचे ग्रहतारे आज तुम्हाला अतिरिक्त ताकद प्राप्त करून देतील, म्हणून महत्त्वाचे निर्णय आणि प्रदीर्घ काळ फायदा देणारे निर्णय आजच घ्या. आज तुम्ही ऑफिस मधून परत येऊन आपले आवडते काम कराल, यामुळे मनाला शांती मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. लकी क्रमांक: 2 .

*मिथुन राशी .*
मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. लकी क्रमांक: 9 .

*कर्क राशी .*
एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मन:शांती गमावून बसाल. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेऊ नका. भावनिक प्रसंग, अडचणी निर्माण करतील. खूप काळापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम आज पूर्ण झाल्याने तुम्हाला खूप समाधान लाभेल. जे दुसऱ्याला मदत करतात त्यांना देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. लकी क्रमांक: 4 .

*सिंह राशी .*
त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. आपल्या वरिष्ठ सहका-यांना आणि बॉसला आपल्या घरी बोलाविण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर, तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. तुमची इच्छा नसताना तुम्हाला काही कामे करावी लागतील. की क्रमांक: 2 .

*कन्या राशी .*
मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल, म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. एखाद्या जुन्या मित्राच्या फोन मुळे सायंकाळ स्मरणरंजनात व्यतीत होईल. या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे अन्यथा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. या राशीतील व्यक्तींना कुठल्या जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे! तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही? आजच्या दिवशी लक्ष ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल. लकी क्रमांक: 9 .

*तुळ राशी .*
तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. आज तुम्हाला तुमच्या आई-वडिलांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे, अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुमचा जोडीदार काळजी घेईल. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर होईल. तुमच्या टीममधली सर्वात त्रासदायक व्यक्ती आज अचानक विचारी वाटू लागेल. तुमचे संवाद कौशल्य, आणि कामातील कौशल्य प्रभावी ठरेल.. लकी क्रमांक: 3 .

*वृश्चिक राशी .*
आरोग्य चांगले राहील. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या, परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च कराल. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. अतिरिक्त ज्ञान व कौशल्ये शिकून घेण्यासाठी तुम्ही अतिरिक्त वेळ आणि ऊर्जा खर्च केलीत तर त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. लकी क्रमांक: 5 .

*धनु राशी .*
आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. कंटाळवाण्या आणि धीम्या अशा दिवशी मित्र तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी चांगला दिवस. ही अशी वेळ आहे की, जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न कराल परंतु, तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही; तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा. लकी क्रमांक: 2 .

*मकर राशी .*
रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य ते उपचार करा. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. जीवनसाथीच्या आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. बऱ्याच कामांना सोडून तुम्ही आज आपल्या आवडीच्या कामांना पूर्ण करण्याचे मन बनवाल. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील. लकी क्रमांक: 2 .

*कुम्भ राशी .*
आजारातून तुम्ही बरे व्हाल. मादक गोष्टींवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते याने तुमची आर्थिक स्थिती ही बिघडते. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासाखेच आहे; तुम्हाला आज हे कळेल. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमच्या जोडीदाराच्या सहवास तुम्हाला आज अगदी राजेशाही वाटेल. लकी क्रमांक: 8 .

*मीन राशी .*
तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा, यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उंची द्याल. तुमच्या ‘चलता है’ भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल, अस्वस्थ होईल. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. जे लोक आत्तापर्यंत बेरोजगार आहे त्यांना चांगली नोकरी मिळवण्याची शक्यता आहे. मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. आजच्या दिवशी केलेल्या स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. लकी क्रमांक: 6

!! श्री विघ्नहर्ते नमः !! 🌞 पंचांग 🌝‼दिनांक ३ डिसेंबर २०१९‼

 

🔥 *अग्निवास* अग्निवास पृथ्वीवर आहे.
💥 *आहुती* शुक्र मुखात आहुती.
🌎 *युगाब्द*-५१२१
*संवत* -२०७६
*भारतीय राष्ट्रीय सौर अग्रहायण* ११
*शालिवाहन शके* -१९४१
*संवत्सर* – विकारी
*अयन* – दक्षिणायन
*सौर ऋतु* – हेमंत
🌳 *ऋतु* – शरद
☀ *मास* – मार्गशीर्ष
🌗 *पक्ष* – शुक्ल
⚡ *तिथी* – सप्तमी (२६|१४)
🌺 *वार* – मंगळ (सौम्य वासरे)
⭐ *नक्षत्र* – धनिष्ठा (११|१६)
💫 *योग* – व्याघात (१४|०८)
🌟 *करण* – गर (१०|०४)
– वणिज (२३|१४)
🌝 *चंद्र राशी* – कुंभ
🌛 *सूर्य राशी* – वृश्चिक
*सूर्य नक्षत्र* – अनुराधा (४)
१२|२३ पासून ज्येष्ठा (१)
🌕 *गुरू राशी* – धनु
*गुरू नक्षत्र* – मूळ (२)
*सुर्योदय* 🌅 – ०६|५८
*सुर्यास्त* 🌄 – १७|५९
⛳ भद्रा २३|१४ पासून, मृत्यु १४|१६ पासून .

🔅 *दिशा शूल* उत्तर .

☀ *ताराबळ*
🔅 भरणी, रोहिणी, मृग, आद्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्वा, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वभाद्रपदा, रेवती .

☀ *चंद्रबळ*
🔅 मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुम्भ .

⌛अशुभ वेळ *राहु काळ*
१५|१३ ते १६|३६
⏳शुभ वेळ *अभिजित मुहुर्त*
१२|०६ ते १२|५०
🕰 *शिवलिखीत चौघडिया*
लाभ ११|०५ ते १२|२८
अमृत १२|२८ ते १३|५१
शुभ १५|१३ ते १६|३६
🔔 *उपासना*
” ॐ गं गणपतये नमः”
“ॐ भौं भौमाय नमः”

*शुभाशुभ दिन*
उत्तम दिवस आहे.

*सुभाषित*
*सुखस्य दु:खस्य न कोऽपि दाता ।परो ददाति इति कुबुद्धिरेषा । अहं करोमि इति वृथाभिमान: ।स्वकर्मसूत्रै: ग्रथितोऽहि लोक: ॥*
हमें कोई सुख या दुःख नहीं देता । अज्ञानी यह सोचते हैं कि किसी औरके कारण हमें सुख और दुःख मिला है । उसी प्रकार यह सोचना कि अपने प्रयासोंसे सुख प्राप्त कर सकते हैं या दुःख दूर कर सकते हैं यह अभिमान व्यर्थ है; क्योंकि सभी अपने-अपने पूर्वजन्मके कर्मोंसे बन्धे हुए होते हैं ।

*आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.*
*‼दैनिक राशि भविष्य ‼*
*‼मंगळवार, दि . ०३ / १२ / २०१९‼*

*मेष राशी .*
मोतीबिंदू असणा-या रुग्णांनी प्रदुषित वातावरणात जाणे टाळावे. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुमचे प्रयत्न आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे तुमच्या कुटुंबातील लोक तुमचे कौतुक करतील. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. तुमचे व्यक्तित्व असे आहे की, जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतीत होऊन जाता, आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. लकी क्रमांक: 2 .

*वृषभ राशी .*
मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल. म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते जितके शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात. त्यामुळे त्यांच्या निष्पाप, निस्सीम आनंदात असताना त्यांच्याभोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. आपल्यावर प्रेम करणा-या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. लकी क्रमांक: 1 .

*मिथुन राशी .*
आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळीसमवेत आज भरपूर वेळ घालवता येईल. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. आपल्या वरिष्ठांना गृहित धरू नका. लकी क्रमांक: 8 .

*कर्क राशी .*
अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका, कदाचित त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेण्याची, सहानुभूतीची गरज असू शकते. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. तुमची मेहनत आणि चिकाटीने काम करण्याची जिद्द याचा फायदा होईल आणि त्यामुळे विश्वास आणि पाठिंबा मिळेल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करेल. लकी क्रमांक: 3 .

*सिंह राशी .*
तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. पत्नीशी सुसंवाद साधून स्वरमिलाफ साधणारा दिवस. नातेसंबधात कुटुंबातील दोन्ही व्यक्तीनी, गुंतवणूक ही प्रेम आणि विश्वासाशी बांधिलकी ठेवणारी असावी. जबाबदारी स्वीकारून योग्य प्रकारे पार पाडण्याची तयारी ठेवा. आपल्या प्रियकर/प्रियसीशी सूड उगविण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने, आपल्या ख-या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. प्रवासामुळे नवीन व्यवसाय संधी मिळतील. रिकाम्या वेळेत आज कुठल्या ही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न कराल. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करेल. लकी क्रमांक: 1 .

*कन्या राशी .*
तुमचा आजार तुमच्या दु:खाचे कारण ठरेल. लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. तुमच्या द्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतातील. तथापि, तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही स्थिती लवकरच सुधारेल. कुटुंबातील सदस्य आणि ज्येष्ठ प्रेमाने तुमची काळजी करतील. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काही ही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणे ही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे. लकी क्रमांक: 8 .

*तुळ राशी .*
जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि देखभाल करण्याची गरज असेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. आज ऑफिस मध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाही. तुमचा कोणी खास आज तुमच्या समोर विश्वासघात करू शकतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर चिंतेत रा आल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. लकी क्रमांक: 2 .

*वृश्चिक राशी .*
तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा. प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. जर तुम्ही विचार करतात की, मित्रांसोबत आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवणे तुमच्यासाठी चुकीचे आहे तर, असे करण्याने तुम्हाला येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करावा लागेल. लकी क्रमांक: 4 .

*धनु राशी .*
हवेत इमले बांधण्याचा वास्तवात काहीही उपयोग नाही. आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काही तरी करणे गरजेचे आहे. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या म्हणजेच एखादी वस्तु नाकारलीतर तर तो/ती दुखावेल. लकी क्रमांक: 1 .

*मकर राशी .*
एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. लकी क्रमांक: 9 .

*कुम्भ राशी .*
अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. कौटुंबिक जबाबदा-या बंधनांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात, आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. तुमच्या साहेबाला कारणे दिलेली आवडणार नाहीत, त्यामुळे साहेबाकडे तुमचे नाव राहण्यासाठी काम करत राहा. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल. लकी क्रमांक: 7 .

*मीन राशी*
निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा. चढउतारांमुळे फायदा होईल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुमचा/तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. व्यवसायात आपल्या स्पर्धकांच्या तोडीस तोड राहण्यासाठी आपल्या विचारांची स्पष्टता उपयोगी पडेल. त्याचबरोबर भूतकाळातील विचारातील गोंधळ नाहीसा होण्यास मदत होईल. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉल मध्ये जाल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची जास्त काळजी घेईल. लकी क्रमांक: 5 .