Sat. Sep 24th, 2022

शिक्षण

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी थाटात संपन्न

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व विज्ञानाची उत्सुकता प्रत्यक्षात साकारावी या उद्देशाने २३ डिसेंबर ला पुसद येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन थाटात करण्यात आले. या प्रदर्शना साठी रोटरी क्लब पुसद व स्व अनिल चिंतामणी बहुउद्देशीय संस्था या समूहाने पुढाकार घेतला होता.

प्रदर्शनी चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स च्या प्रागगणात घेण्यात आली. या प्रदर्शनी मध्ये गट अ वर्ग चार ते पाच गट ब वर्ग ६ ते ८ व गट क वर्ग ९ ते १२ अशी घेण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पुसद उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री व्यंकट राठोड साहेब यांच्या हस्ते झाले याप्रसंगी खाजगी शिकवणी वर्ग संघटनेचे राज्य अध्यक्ष बंडोपंत
भुयार, रोटरी क्लब डिस्टिक 3030 चे सह प्रांतपाल श्री जलालुद्दीन गीलानी हेदेखील उपस्थित होते.
या बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांचे बक्षिसे वितरित करण्यात आली असून प्रत्येक ग्रुप मधून २ प्रोजेक्ट ला विशेष बक्षीस देण्यात आले. यात यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना उपविभागीय पोलीस अधीकारि अनुराग जैन, अश्विनी धुप्पे, ऍड. विवेक टेहरे, अध्यक्ष रोटरी क्लब

डॉ. वाढवे सचिव रोटरी क्लब पुसद रोट. डॉक्टर भानुप्रकाश कदम, रोट. डॉक्टर सतीश चिद्दर वार, रोट. शैलेश उबाळे रोटेरियन शंतनू डूब्बेवार रोटेरियन विहार बिडवई, रोटेरियन चंद्रप्रकाश खेडकर, रोटेरियन राम पद्मावार रोटेरियन स्वप्निल चिंतामणी व इतर रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यशस्वी स्पर्धकांमध्ये पहिले बक्षीस अनुसया विद्या मंदिर हिंगोली ३ हजार रुपये रोख शिल्ड व प्रमाण पत्र, अनुराज सावके, सूरज गोडबन, अथर्व जाधव यांना देण्यात आले तर दुसरे बक्षीस डॉ उमेश रेवणवार यांच्या तर्फे दोन हजार रुपये पोदार लर्न स्कूल पुसदच्या जयश अग्रवाल, सौर्य डुब्बेवार, प्रज्वल कांबळे तर तिसरे बक्षीस को दो विद्यालयायील सार्थक भगत यास डॉ बिडवाई यांनी एक हजार रुपयांचे पारितोषिक दिले. ऍड विनायक टेहरे तर्फे सेंट मेरीज इंग्लीश शाळेच्या अणेय आसेगावकर गोबिकाबाई भरवाडे इंग्लिश स्कूल मधील विवेक माने, सुधीर राठोड, हितेश राजपुरोहित यांना शिल्ड प्रमाणपत्र व रोख रकमेचे पारितोषिक दिले. जिल्हा बाहेरील अनेक शाळांनि या प्रदर्शनित सहभाग घेतला होता.

राम राठोड
TV INDIA प्रतिनिधी
पुसद जि.यवतमाळ

यवतमाळ: प्रज्ञा पर्व शोध 2019 -20 अंतर्गत दिनांक 30-12-2019 रोजी स्वर्गीय विठ्ठलराव चव्हाण नगर परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 8 इठावा पुसद येथे नवयुवक मंडळाच्या सहभागाने वर्ग 5 ते 7 च्या विद्यार्थ्याकडून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ४ च्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदविला .
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक उत्तम किसन जाधव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री विष्णू शिकारे (नगरसेवक ) मा. श्री.देविदासभाऊ डोळस (माजी नगरसेवक) प्रा. वानखेडे सर, प्रा. श्री देशमुख सर श्री शिवाजी अध्यापक विद्यालय पुसद, सुधाकर मितक मुख्याध्यापक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे न. प .म .उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ४हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये एकूण परीक्षेकरिता 85 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वितेकरिता कुमारी वैशाली घाडगे, प्रवीण कांबळे, रफिक अहमद सर ,सुरज गिरी सर, तसेच छात्र शिक्षक श्री शिवाजी अध्यापक विद्यालय पुसद. तसेच नवयुवक मंडळ इटावा वार्ड सागर जाधव, बिपिन हरणे, निलेश हरणे, पवन दहातोंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैशाली घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन श्री प्रवीण कांबळे यांनी व्यक्त केले.

राम राठोड
TV INDIA प्रतिनिधी
पुसद जि.यवतमाळ

मुख्याध्यापिकेच्या गैरहजेरीने शिक्षकांची मुजोरी

चंद्रपुर : मुख्याध्यापिकेच्या गैरहजेरीने शिक्षकांची मुजोरी गोंडपिपरी जि.प.कन्या शाळेतील प्रताप शाळा व्यवस्थापन समितीचे बीडीओंना तक्रार गोंडपिपरी – आकाश चौधरी तालुक्यात सध्या जिल्हा परीषद शाळांचे कारनामे गाजत आहेत. अश्यातच आता गोंडपिपरी येथिल जि.प. कन्या शाळेतील मुजोर शिक्षकांचा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरनाची तक्रार ला सवंर्ग विकास आधिकारी यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यानी दिली आहे.

 

शहरात जि.प. कन्या शाळा नामांकीत शाळा म्हणून ओळखल्या जात होती. मात्र मागील वर्षापासून सदर शाळेच्या नियोजन शुन्य कार्यप्रनालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अडबायले म्याडम मुख्याध्यापक पदाचा पदभार स्विकारला तेव्हापासून शिक्षकही मुजोर झाले.
शाळेच्या वेळेवर विध्यार्थी हजर होतात.मात्र शिक्षकच शाळेत वेळेवर येत नसल्याने गेट बंद असते.त्यामुळे तासन तास विध्यार्थाना ताटकळत राहावे लागते . मुख्याध्यापिका ह्या नेहमीच गैरहजर असल्याने शिक्षकावर कुठलाच वचक नाही.

त्याचा फायदा शिक्षक घेत असुन जवळपास ५०ते६० कि.मि. अंतरावरुन प्रवास करतात.ते आपल्या सोईनुसार शाळेत येत असल्याने व शाळेतुन सुट्टी झाल्यानंतर घराकडे जान्यासाठी घाई करतात.त्यामुळे विध्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप तक्रारीतुन करन्यात आली आहे.शाळेच्या वेळात शिक्षक गैर हजर असल्याने भांडनाच्या छोट्या- मोठ्या घठना घडत आहेत. एकःदरित हा संपुर्ण प्रकार विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नुकसानीचा आहे.या गंभीर प्रकारकडे लक्ष देऊन बिडीओ बुलकुंडे याःनी कार्यवाही करावी.व मुख्याध्यापिकेस
सक्त ताकीद द्यावी,येत्या 24 डिसेंबरपासून शाळेत तालुकास्तरीय सामने आहेत.अशावेळी प्रशासनानेही जागृक रहावे.व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्यांवर कार्यवाही करावी.अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबलू कुळमेथे,शंकर बोरकूटे,अरूण धुडसे यांनी केली आहे.आज या संदर्भात शिष्टमंडळाच्या वतीने बीडिओ बुलकुंडे यांना निवेदन देण्यात आले.[ मुख्याध्यापिकेच्या गैरहजेरीने शिक्षकांची मुजोरी *गोंडपिपरी जि.प.कन्या शाळेतील प्रताप * शाळा व्यवस्थापन समितीचे बीडीओंना तक्रार गोंडपिपरी – आकाश चौधरी तालुक्यात सध्या जिल्हा परीषद शाळांचे कारनामे गाजत आहेत. अश्यातच आता गोंडपिपरी येथिल जि.प. कन्या शाळेतील मुजोर शिक्षकांचा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरनाची तक्रार (दि.१८)ला सवंर्ग विकास आधिकारी यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यानी दिली आहे.

 

शहरात जि.प. कन्या शाळा नामांकीत शाळा म्हणून ओळखल्या जात होती. मात्र मागील वर्षापासून सदर शाळेच्या नियोजन शुन्य कार्यप्रनालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अडबायले म्याडम मुख्याध्यापक पदाचा पदभार स्विकारला तेव्हापासून शिक्षकही मुजोर झाले.
शाळेच्या वेळेवर विध्यार्थी हजर होतात.मात्र शिक्षकच शाळेत वेळेवर येत नसल्याने गेट बंद असते.त्यामुळे तासन तास विध्यार्थाना ताटकळत राहावे लागते . मुख्याध्यापिका ह्या नेहमीच गैरहजर असल्याने शिक्षकावर कुठलाच वचक नाही.
त्याचा फायदा शिक्षक घेत असुन जवळपास ५०ते६० कि.मि. अंतरावरुन प्रवास करतात.ते आपल्या सोईनुसार शाळेत येत असल्याने व शाळेतुन सुट्टी झाल्यानंतर घराकडे जान्यासाठी घाई करतात.त्यामुळे विध्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप तक्रारीतुन करन्यात आली आहे.शाळेच्या वेळात शिक्षक गैर हजर असल्याने भांडनाच्या छोट्या- मोठ्या घठना घडत आहेत. एकःदरित हा संपुर्ण प्रकार विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नुकसानीचा आहे.या गंभीर प्रकारकडे लक्ष देऊन बिडीओ बुलकुंडे याःनी कार्यवाही करावी.व मुख्याध्यापिकेस
सक्त ताकीद द्यावी,येत्या 24 डिसेंबरपासून शाळेत तालुकास्तरीय सामने आहेत.अशावेळी प्रशासनानेही जागृक रहावे.व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्यांवर कार्यवाही करावी.अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबलू कुळमेथे,शंकर बोरकूटे,अरूण धुडसे यांनी केली आहे.आज या संदर्भात शिष्टमंडळाच्या वतीने बीडिओ बुलकुंडे यांना निवेदन देण्यात आले.

मनोज गोरे चंद्रपूर प्रतिनिधी

शिक्षकाच्या मागणीसाठी पांढऱकवड्याचे विद्यार्थी जिल्हा परिषदेत धडकले

 

यवतमाळ :दि. 26 शिक्षक नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याने विध्यार्थ्यांनी आज जिल्हा परिषदेत धडक दिली. तत्काळ शिक्षक देऊन न्याय द्यावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. तासिकेवर नेमलेले शिक्षक या सत्रात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतः बारावीचा अभ्यास करावा लागत आहे.

 

ऋतुजा खडसे, विद्यार्थिनी

पांढरकवडा येथे जिल्हा परिषद माध्यमिक हायस्कुल आहे. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या शाळेत गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. यापूर्वी पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षक देण्याची मागणी केली होती, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

 

पालक सनी खान

एक महिन्यावर परीक्षा आली असताना शिक्षक देण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासन गंभीर नाही. जवळपास शंभर विद्यार्थी आज जिल्हा परिषदेत आले होते. त्याची दखल घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.

 

आशितोष तारफे, विद्यार्थी

रिपोर्टर ,संजय राठोड यवतमाळ

मो.9764917444

देशाच्या प्रगतीसाठी चांगले वैज्ञानिक घडवणे अतिशय गरजेचे

शिक्षण विभाग जि.प चंद्रपूर तर्फे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन ज्युबिली हायस्कूल चंद्रपूर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून
**मा.श्री.देवरावदादा भोंगळे** अध्यक्ष जि.प चंद्रपूर लाभले होते व त्यांच्या शुभहस्ते या विज्ञान प्रदर्शनीचा शुभारंभ संपन्न झाला. या वेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना

मा.श्री.देवरावदादा भोंगळे म्हणाले की देशाच्या प्रगतीसाठी चांगले वैज्ञानिक घडवणे अतिशय गरजेचे आहे. या सम्पूर्ण जगात आपल्या भारत देशाचा नवीन ओळख जर कोणी निर्माण केली असेल तर ते आपलें वैज्ञानिक आहे. आपल्या देशातील वैज्ञानिकांनी जगभरात देशाचा गौरव वाढवलेला आहे. आणि भविष्यात येनारे वैज्ञानिक आणखी या देशाचा गौरव वाढवणार याचा मला पुर्ण विश्वास आहे असे प्रतिपादन मा.श्री.देवरावदादा भोंगळे यांनी केले.

या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णा भाऊ सहारे, महिला व बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, जि.प शिक्षण अधिकारी माध्यमिक संजय डोर्लीकर व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 

रिपोर्टर मनोज गोरे चंद्रपुर जिल्हा

पोलीस विभागातर्फे मुलींसाठी “सव्यंसंरक्षण” शिबीर आयोजित. (गडचांदूर येथे आयोजन/मुलींनी घेतला लाभ)

 

 

काही नराधमांमुळे सध्या देशाचे वातावरण अनपेक्षितपणे गढूळ झाल्याचे पहायला मिळत आहे.कित्येक ठिकाणी माता भगिनी कमालीच्या दहशतीत वावरत असल्याचे चित्र असून काही मानवरुपी राक्षस प्राण्यांणाही लाजवेल असे कृत्य करत असल्याचे चित्र आहे.देशात घडणाऱ्या घटनांची गंभीरता लक्षात घेता चंद्रपूर :पोलिसांतर्फे २३ डिसेंबर रोजी गडचांदूर येथे शालेय मुलींसाठी “सव्यंसंरक्षण” शिबीराचे आयोजन करण्यात आले.यात कोरपना, जिवती,पाटन,टेकामांडवा,भारी,गडचांदुर या पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मोठ्यासंख्यने सहभाग घेऊन स्वयंस्वरक्षणाचे धडे गिरवले.स्वयंसंरक्षाणाची माहिती प्रत्येक मुलींना असने काळाची गरज असल्याचे मत उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.सदर शिबीर एसडीपीओ यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली तर एपीआय एकुडके मॅडम,प्रविण रामटेकेसह इतर सहयोगी कर्मचारी प्रशिक्षण दिले. यावेळी गडचांदूर ठाणेदार गोपाल भारती,महिला,पूरूष पोलीस कर्मचारी,सर्व शाळेतील शिक्षकांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.मोठ्या आवडी व उत्साहाने मुलींनी सदर शिबीराचा लाभ घेतला.सध्याची परिस्थिती पाहता अशे शिबीरांची अत्यंत गरज असल्याचे भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

रिपोर्टर, मनोज गोरे चंद्रपुर

विवेकानंदाच्या स्मरणशक्तीचे कारण ध्यानाची साधना !”

नागपूर
अखिल भारतीय तांडा सुधार समितीने मुलांची एकाग्रता वाढावी, अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष लागावे, कमी काळाच्या अभ्यासात जास्त उद्दीस्ट प्राप्त व्हावे या उद्दिष्टाने आयोजित केलेल्या ” मनाची एकाग्रता ” या कार्यशाळेत प्रसिद्ध संमोहन तज्ञ अनिल सर यांनी वरील उद्गार काढले. ते पुढे म्हणाले की स्वामी विवेकानंद ग्रंथच्या ग्रंथ स्मरणात ठेवीत होते, याचे कारण त्यांचे मन पाहिजे तिथे ते एकाग्र करू शकत होते. तसेच स्वामी विवेकानंदांना तासनतास ध्यानाचा अभ्यास ( सराव) होता. त्यामुळे हे शक्य झाले. आपणही मन एकाग्र करण्याचा अभ्यास केल्यास आपल्याला ही ते शक्य होईल. आपण मुलांना शिकवतो, शब्द शिकवतो व नंतर वाक्य शिकवतो. वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. विद्यार्थ्यांनी यापुढे जाऊन जर प्रयत्न केला तर ते आपल्या मनाची व बुद्धीची तसेच नेत्रइंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकतात. या तीन ही शक्तीचाविकास झाल्यास आपल्याला स्वामी विवेकानंदा प्रमाणेच परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचता येईल असेही ते म्हणाले. प्राचीन काळापासून वेगवेगळ्या पंथांमध्ये मनाच्या एकाग्रतेला वेगवेगळ्या नावाने ओळखत असले तरी त्याचा मूळ उद्देश मनाची केंद्रीयता हाच आहे.मनाची एकाग्रता हा विज्ञानाचा भाग आहे.यात दैविशक्ती वैगेरे अंधश्रद्धेचा भाग मुळीच नाही विद्यार्थ्यांनी रोज अभ्यासापूर्वी दहा मिनिटाचा कालावधी स्वतःच्या मनाला एकाग्र करण्यास दिल्या तर त्यांना अभ्यासात मदत मिळेल. अनेक तास अभ्यास करून जे इच्छित साध्य होत नाही ते कमी तासाच्या अभ्यासाने साध्य होईल असे प्रतिपादन अनिल सर यांनी केले. या प्रसंगी मुख्य संयोजक नामा बंजारा/ जाधव, मडावी सर, धर्मेंद्र जाधव, वाडपल्लीवर सर, पृथ्वी चव्हाण सर उपस्थित होते.

मल्लमपोडुर ग्र .पं अंतर्गत अंगणवाडीतिल बालकांना गणवेश सह सर्व साहित्याची वाटप

 

 

 

 

भामरगड तालुक्यातच प्रथम ग्रा.पं आहे की, अंगणवाडी बालकांना मोफत साहित्य वाटप केले.

यानिर्णय घेतल्या बध्दल सरपंच , सचिव व गावकार्यांची बीडीओने प्रशंसा केले .

सर्वत्र कौतुक शहरात 3 ते 4 वर्षापासूनच मुलांना कोन्वेट मध्ये स्कूल बॅग ,हातामध्ये बास्केट व सूट ,बूटसह पाठविले जाते…परंतु तालुक्यातील आदिवासी बंधूंची आर्थिक परीस्थिति बेताचीच ते एवढा खर्च पेलु शकत नाहीत ….या अडचणींवर मात करता यावी दुर्गम भागातील आदीवासी मुलांना देखील या सर्व सुख सुविधा मिळाव्या या हेतूने ग्रामपंचायत मल्लमपोडुर चे सचिव अविनाश गोरे ,सरपंच श्रीमती अरुणा वेलादि यानि ग्रामसभेत ठराव पारित करून , ग्रामसभांशि ,अंगणवाडी ताईशि चर्चा करुन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडीतिल बालकांना साहित्य देण्याची निर्णय घेण्यात आले .

 

 

ग्रा पं गावाचा विकासबरोबर गावतील बालकांचा विकास व्हावा याद्रुष्टीने मोलाचे उपक्रम घेऊन गणवेष ,स्कूल बॅग ,टिफिन करीता बास्केट ,पाटी ,लेखनी , ड्रॉयिंग बुक ,केचपेन ई.साहित्य देण्याचे ठरविले….व प्रथम मौजा मल्लमपोडुर येथिल अंगणवाडीतिल मुलांना साहित्य वाटप व पालकांना मार्गदर्शन याबाबतचा कार्यक्रम आयोजित केला आहे .या कार्यक्रमास संवर्ग विकास अधिकारी महेश डोके सपत्नीक उपस्थितझाले त्यांच्या हस्ते चिमुकल्याना साहित्याचे वितरण करण्यात आले.याप्रसंगि संवर्ग विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक करत ग्रामपंचायत मल्लमपोडुर हि तालुक्यातील प्रथम ग्रामपंचायत असेल जीने अंगणवाडीतिल बालका करीता गणवेशाचि तरतूद केल्याचे प्रतिपादन केले . या साहित्या मुळे निश्चितच बालकांचा उस्ताह वाढेल तसेच समान गणवेशा मुळे अंगणवाडीत सुश्रुतता येन्यास मदत होनार असल्याचे सांगितले.कार्यक्रमास ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती अरुणाताई वेलादि ,सचिव अविनाश गोरे ,उपसरपंच रोशन वडे ,ग्रामसभा अध्यक्ष लचुराम धूर्वे , अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती गेडाम ,अंगणवाडी सेविका करुणा धूर्वे ,तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

रिपोर्टर,  मनोज गोरे चंद्रपूर/
गडचिरोली