Sat. Sep 24th, 2022

व्यवसाय

यवतमाळ येथे राजवी होंडा नवीन शोरुमचे उद्घाटन

 

 

यवतमाळ : होंडा मोटारसायकल्सचे अधिकृत शोरुम असलेले राजवी होंडा या नवीन शोरुमचे सोमवारी यवतमाळात दिमाखात उद्घाटन झाले. होंडाचे रिजनल सेल्स हेड अजय बोरा, स्टेट बॅक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर रजत बॅनर्जी यांच्या हस्ते शोरुमचे उद्घाटन झाले. याप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एरिया जनरल मॅनेजर सुहास ढोले, झोनल मॅनेजर हर्षल पुजारी, होंडाचे झोन मॅनेजर प्रविण झा, होंडाचे कस्टमर सर्व्हीस इन्जार्ज मनोज शितोळे, यवतमाळ येथील सी.ए. संजय अटल या सोबतच एरिया इन्जार्च (कस्टमर सर्व्हीस) प्रदिप मिश्रा, एरिया इन्जार्ज सेल्स प्रविण तुरकर यांच्यासह यवतमाळातील गणमान्य नागरीक, व्यापारी प्रामुख्याने उपस्थित होते. यवतमाळकरांना राजवी होंडा या नवीन शोरुमच्या एकाच छताखाली विक्री, सर्व्हीसिंग स्पेअर पार्टस आणि सुरक्षा आदी सेवा उपलब्ध करुन देत असल्याची माहिती राजवी होंडाचे संचालक शशांक देशमुख यांनी याप्रसंगी दिली. या नवीन वर्कशॉपमध्ये निष्णात कामगारांकडून शास्त्रशुध्द पध्दतीने गाडीची दुुरुस्ती करण्यासह स्वयंचलित पध्दतीने गाडीची वॉशिंगसुध्दा केली जाणार आहे. आपल्या गाडीची दुरुस्ती करतांना ग्राहकांना एका आरामदायक कक्षात बसून वायफाय सेवेचा आनंद घेत आपल्या गाडीची दुरुस्ती होतांना बघता येणार आहे. याप्रसगी संचालक श्रीमती चारुशीला देशमुख, प्रियांक देशमुख, एकता देशमुख यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले. संचालन आर्या देशमुख यांनी तर आभार राजवर्धन शशांक देशमुख यांनी मानले.

आता शेतामध्ये खाकी रंगाचा कापुस पिकणार

कापूस म्हंटल की डोळ्यासमोर येतो शुभ्र पांढरा रंग मात्र आता कापसाचं नाव घेताच आणखी एक रंग डोळ्यासमोर येईल तो म्हणजे ‘ खाकी ‘ रंग…खाकी रंगाचा कापूस…अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खाकी रंगाच्या कापसाची नेमकी माहिती मिळते. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वनी रंभापुर येथे ‘वैदेही ९५’ हा खाकी कापूस डोलतोय. विद्यापीठाच्या साडेबारा एकर प्रक्षेत्रावर ‘वैदेही ९५’ या नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या खाकी रंगाच्या कापूस वाणाची यावर्षी जूनच्या महिन्यातपेरणी केली.सुमारे १६० दिवसाच्या या पिकावर किडींचा किंवा रोगाचाकोणताही प्रादुर्भाव या कालावधीत आला नसल्याचा तज्ज्ञानचा दावा आहे. त्यामुळे हा कापूस पांढऱ्या कापसापेक्षा अधिक उत्तम असं म्हणावं लागेल. पहिल्यांदाच झालेल्या या प्रयोगातून सुमारे ३० ते ३५ क्विंटल कापूस अपेक्षित आहे. हा उत्पादित कापूस आय.सी.आर.सीडकॉट,मुंबई यांना पुरविण्यात येईल असे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कापूस शास्त्रज्ञ तारासिंग राठोड सांगतात. वैदेही ९५ या वाणाची

लागवड आम्ही जून महिन्यात ५ हेक्टर क्षेत्रावर आम्ही केली आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था मुंबई, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बीजोत्पादन कापूस घेण्यात आला आहे. सुमारे सुमारे ३० ते ३५ क्विंटल कापूस अपेक्षित असल्याचे राठोड सांगतात.आता कापूस केवळ पांढरा राहिला नाही तर रंगीत कापूस उत्पादनाचे स्वप्न कृषी शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात उतरविले आहेय .डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वनी रंभापुर अकोला प्रक्षेत्रावर खाकी कापूस उत्पादनाचा हा पहिला प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी करून दाखविला आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था मुंबई, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बीजोत्पादन कापूस घेण्यात आला आहे. नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमधील संशोधक डॉ. विनिता गोतमारे यांनी हे बीज तयार केले आहे.रायमंडी आणि थरबेरी या रानटी कापसाच्या प्रजातीचे मिश्रण करून ही प्रजाती तयार करण्यात आल्याचे केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे शास्त्रज्ञ डॉ. विनिता गोतमारे सांगतात. यावर प्रक्रिया करून नैसर्गिक रित्या रंगीत कापड निर्मिती करता येऊ शकते. तसेच ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करता येईल मात्र हे सर्व राज्य सरकारवर अवलंबून आहे. या कापसाचा गुणधर्म म्हणजे यापासून कोणतेही त्वचेचे आजार होत नाहीत.

या खाकी आणि सेंद्रियकापूस वाणाची अकोल्यातील वनी रंभापुर प्रक्षेत्रावर पेरणी करून पहिल्या वेचातील उत्पादन काढले आहे. यातून निघणाऱ्या सरकीचे बियाणे करून पुढील वर्षी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरच 100 एकरावर या सेंद्रीय आणि रंगीत कापूस वाणाचे उत्पादन घेण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.रंगीत कापसामध्ये विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. रंगीत कपाशीचे संशोधन आम्ही करत आहोत आणि त्यातून रंगीत कपाशीचे वाण येतील. या कापसाला मोठी मागणार असणार आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ब्रँड तयार करण्याचा प्रयन्त आहे. खूप मोठा वाव असल्याचे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी म्हटले.

अहमदनगर बाजार समितीत कांदा दीडशे रुपये किलो

अहमदनगर: नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात आज गुरुवारी (५ डिसेंबर) झालेल्या लिलावात कांद्याला दिडशे रुपये तर लाल कांद्यास ९० रुपयांपासून ते १३० रुपये किलो असा दर मिळाला. आजच्या बाजारभावाने नवा उच्चांक गाठला.

मागील काही महिन्यांपासून कांद्याची आवक कमी होत असून कांद्याचे दर रोज वाढत आहेत. देशभरात कांद्याची मागणी वाढली आहे. नगर बाजार समितीत रोटेशन पद्धतीने कांद्याचे लिलाव होत आहेत. आज गुरुवारी शेतकऱ्यांनी सुमारे ३० हजार गोण्या कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यात चांगल्या दर्जाच्या लाल कांद्याला विक्रमी १५० रुपये किलोचा भाव मिळाला. गावरान तसेच काहीशा कमी प्रतीच्या लाल कांद्यालाही ९० रुपयांपासून ते १३० रुपये भाव मिळाला. या वर्षीचा हा उच्चांकी भाव असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे, निरीक्षक जयसिंग भोर व संजय काळे यांनी सांगितले. नगर बाजार समितीत चांगल्या दर्जाचा व टिकाऊ कांदा येत आहे. सध्या नवीन कांदा बाजारात येण्यासाठी अवकाश असल्याने कांद्याचे दर असेच वाढत राहण्याची राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.