Sat. Sep 24th, 2022

समस्या

ब्रेकिंग न्यूज : यवतमाळ येथे प्रभाग क्र १७ ऑनलाईन जनता दरबार उपक्रम

 

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अंकुश पांडे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र १७ या भागात ऑनलाईन जनता दरबार सुरू करण्यात आला असून नागरिकांनचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ऑनलाईन जनता दरबार मध्ये परिसरातील नागरिकांच्या विविध तक्रारी व समस्या या कॉल,मॅसेज,सोशल मीडिया च्या माध्यमातून अंकुश पांडे हे जाणून घेत असुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रभाग क्र १७ मध्ये ऑनलाईन जनता दरबार हा सोमवार ते शनिवार सुरू राहत असुन दर आठवड्याच्या शेवट नागरिकांच्या समस्या व तक्रारी नगर पालिका व संबंधित विभागाला निवेदनाद्वारे सांगण्यात येते व नागरिकांच्या काही तक्रारी या अंकुश पांडे स्वतःजाणून घेत असुन त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येते ऑनलाईन जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळत असून विविध विभागाच्या अनेक तक्रारदारांच्या तक्रारी आल्या असुन त्या सोडविण्यासाठी अंकुश पांडे प्रयत्न करत आहे तक्रारदारांचा प्रतिसाद पाहता, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या पुढे दर आठवड्याच्या प्रत्येक दिवशी ऑनलाईन जनता दरबार घेतला जाईल असे सांगण्यात येत आहे. ऑनलाईन जनता दरबार मध्ये महसूल विभाग, पोलिस विभाग, विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, नगरपालिका या खात्यांबाबत नागरिकांच्या सर्वाधिक तक्रारी होत्या.या उपक्रमाबाबत अंकुश पांडे म्हणाले, प्रशासकीय स्तरावर जनतेच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे लोकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन ते सुटावेत, यासाठी ऑनलाईन जनता दरबार सुरू करण्यात आला. या पुढे प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेतला जाईल. सार्वजनिक प्रश्नाबरोबर खासगी प्रश्न सरकारी यंत्रणेसाठी संबंधित असलेले सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी ऑनलाईन जनता दरबाराचे आयोजन केले आहे. या मध्ये आलेल्या तक्रारींचा प्रामुख्याने पाठपुरावा करून लोकांचे प्रश्न सोडविले जातील. स्थानिक नागरिकांच्या समस्या सुटाव्या या करिता अंकुश पांडे यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन जनता दरबाराला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे..

महाबिज कार्यालयापुढे अधिका-यांचे आंदोलन सातव्या वेतन आयोग लागू करण्याची मागणी

 

यवतमाळ : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी महाबिज अधिकारी कर्मचा-यांचे 9 डिसेंबरपासून नागपुर येथे आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभुमीवर आज यवतमाळ येथे महाबिज कार्यालयापुढे कर्मचा-यांनी धरणे दिले. या आंदोलनामुळे बिजोत्पादक शेतक-यांची गैरसोय होत आहे.
महाबिज स्वायक्त महामंडळ असल्याने महाबिजने सातव्या वेतन आयोगापोटी आर्थिक तरतुद केलेली आहे. त्यामुळे सदर बाबतचा कुठलाही आर्थक भुर्दंड शासनाच्या तिजोरीवर पडणार नाही. त्याच धर्तीवर महाबिजमधील कर्मचारी अधिका-यांना महाबिजच्या संचालक मंडळाने सातवे वेतन आयोग लागू करण्याची तदतूर केली आहे. असे असतांना महामंडळाने अद्यापही याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव महाबिज कर्मचारी अधिका-यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याबाबत महाव्यवस्थापकांना निवेदनही देण्यात आले आहे. सातवा वेतन आयोग हा पुर्वलक्षी प्रभावाने लागू करण्या यावा. यासह ईतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मागण्या पुर्ण होणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा निर्धार संघटनेने केला आहे. या आंदोलनात यवतमाळ महाबिज केंद्रातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
बॉक्स
बिज प्रक्रियेची कामे प्रभावी

सध्यास्थितीत खरीप 2020 हंगामातील उत्पादीत सोयाबीन, धान व ईतर पिकांची आवक बिज प्रक्रिया केंद्रावर सुरू आहे. तसेच रबी 2020 ची बिजोत्पादनाची कामे देखील होत आहे. कर्मचारी व अधिका-यांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे हि सर्व कामे प्रभावी झालेली आहे. त्यामुळे येत्या खरीप व रब्बी हंगामातील बियाण्यांच्या उपलब्धतेवर याचा परिणाम होणार असल्याचे दिसुन येत आहे.

दहा रुपयाचे नाणे अजूनही चलनात : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले स्पष्ट

 

यवतमाळ : दहा रुपयाच्या नाण्यावर कोणतीही बंदी आली नसून हे नाणे चलनात कायम आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जनतेने दहा रुपयाच्या नाण्याबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नये. तसेच सामान्य नागरिकांसह, व्यापारी व दुकानदारांनी ही नाणी ग्राहकांकडून बिनधास्त स्वीकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार दहा रुपयाचे नाणे चलन म्हणून सुरू आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांमध्ये याबाबत गैरसमज पसरविला जात आहे. त्यामुळे ही नाणी व्यवहारात स्वीकारल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी ही नाणी बँकेत मोठ्या प्रमाणात जमा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बँकात इतर चलनी नोटा ठेवण्यास जागेची अडचण येत आहे. ही अडचण केवळ यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक पुरुषोत्तम बहिरसेठ यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या निदर्शनास आणून दिली.

जिल्ह्यातील व्यापारी आस्थापना, किरकोळ दुकानदार, ठोक व चिल्लर आस्थापना यांनी दहा रुपयाचे नाणे स्वीकारावे. तसेच नागरिकांनीसुध्दा अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी

अतिक्रमण पथकावर दगडफेक; विरोध करणाऱ्या महिलेने विष घेण्याचा प्रयत्न; वेळीच पोलिसानी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला

 

 

– यवतमाळ :दि. 22 येथील जांब रोडवर नगरपालिका प्रशासनाने जांब रोडवरील अतिक्रमण
काढण्यात आले. यावेळी महिलांनी अतिक्रमणं विरोधी पथकावर दगडफेक केली. एका महिलेने या मोहिमेचा विरोध दाखवीत विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिलेला वेळीच अटकाव केल्याने मोठा अनर्थ टळला.

यवतमाळ नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव  मोहीम चालू आहे. सर्वत्र या मोहिमेचा विरोध केल्या जात आहे. जांब रॉडवरील अतिक्रमण हटवित असताना महिला जेसीबी समोर आल्यात. अधिकाऱ्यांशी महिलांनी हुज्जत घातली. संतप्त महिलांनी अधिकाऱ्यांवर  दगडफेक सुद्धा केली. सुदैवानी यात कोणीही जखमी झाले नाही. एका महीलेने या मोहिमेला विरोध दर्शवित विष पिण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. यामुळे मात्र वातावरण चिघळे होते. ऐन थंडीत या गरिबांना बेघर केल्याने यांनी कुठे जावे आणि निवारा कुठे शोधावा असा यक्ष प्रश्न अतिक्रमनााने झाला आहे.

सुसाट वेग भेटतोय जीवावर: दरवर्षी तीनशेपेक्षा जास्त मृत्यू

 

यवतमाळ : लवकर पोहोचण्यासाठी वाढविण्यात येणारा वाहनाचा वेग जिवावर बेतत आहे. रस्त्यावर होणार्‍या अपघातांत जिल्ह्यात वर्षाला 350 च्या आसपास मृत्यू होतात.

गेल्या काही वर्षांत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्तेही चकाचक झालेले आहेत. त्यामुळे वाहनचालक कोणतीही पर्वा न करता भरधाव वाहने चालवितात. निष्काळजीपणामुळे आपला किंवा दुसर्‍या व्यक्तीचा जीव जाईल, याचा विचार करीत नाहीत.

बहुतांश चालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. हेल्मेट अपवादानेच वापरले जाते. जास्तीत जास्त मृत्यू हे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानेच होत असल्याचे वास्तव आहे. महामार्गाचे रुंदीकरण झाल्यापासून सिमेंट रोडवर होणार्‍या अपघातांत डोक्याला दुखापत होऊनच मृत्यू होत असल्याचे पोलिस सांगतात. सन 2018 या वर्षात एक हजार 401 अपघात झाले. त्यात 350 जणांचे मृत्यू झाला. 2019मध्ये झालेल्या एक हजार 48 अपघातांत 366 मृत्यू झाले. आपला आणि दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षित वाहन चालवण्याला प्राधान्य द्यायला पाहिजे.

महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे आर्थिक व सामाजिक परिस्थिती बिकट

किनवट महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे आर्थिक व सामाजिक परिस्थिती बिकट आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन या समाजाचा आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुसूचित जमातीत समावेश करावा अशी मागणी बंजारा समाजाचे युवा नेते आकाश जाधव यांनी दिल्ली येथे भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटून केली असून यासंदर्भात लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्याशी चर्चा करून बंजारा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी जे पी नड्डा यांनी आकाश जाधव यांना दिले आहे.
भटकंती करून उदरनिर्वाह करणारा महाराष्ट्रातला बंजारा समाज हा गेल्या कित्येक वर्षापासून आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास आहे, वाडी तांड्यावर तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या या समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी कोणत्याही संविधानिक तरतुदी नाहीत परिणामी स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर सुद्धा हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करत आहे. किनवट लगतच असलेल्या आंध्र प्रदेशसारख्या राज्यात बंजारा समाजाचा बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश असल्यामुळे तेथील समाज आज प्रगतिपथावर आहे मात्र महाराष्ट्रात हा समाज केवळ शासकीय सवलती व कोणताही शासकीय लाभ मिळत नसल्याने रोज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो जरा समाजातील युवावर्ग उच्चशिक्षित असला तरीही त्यांना नोकरी मिळणे अवघड बनले आहे.बंजारा समाजाची ही बिकट परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा ही गेल्या अनेक वर्षांपासूनची बंजारा समाजाची मागणी आहे परंतु या मागणी संदर्भात अद्याप कोणत्याही सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही म्हणून महाराष्ट्रातील बंजारा समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावे ची मागणी किनवट येथील जरा समाजाचे युवा नेते आकाश जाधव यांनी भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची दिल्ली येथे नुकतीच भेट घेतली व त्यांच्याशी या विषयावर सखोल चर्चा केली दरम्यान महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुसूचित जाती जमातीत समाविष्ट करता येईल काय यासंबंधाने मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून बंजारा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी जेपी नदा यांनी आकाश जाधव यांना दिले आहे.

फिस्की जंगलासह मारेगांव तालुक्यात वाघाची दहशत

मारेगांव : फिस्की जंगलासह मारेगांव तालुक्यात वाघाची दहशत कायम असुन एका दिवसात चार गायीवर हल्ले एक ठार तिन गभिर जखमी
वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे पांढरकवडा येथूनच कामकाज चालवत असल्याने मारेगांव वनपरिक्षेत्र कार्यालय झाले पोरखे.

मारेगांव वनपरिक्षेत्रामध्ये वाघाची दहशत कायम असुन वाघाने एकादिवासात चार गायीवर हल्ले चिंचाळा (दोन); बामर्दा, डोंगरगांव येते प्रत्यकी एका ठिकाणी वाघाने हल्ले केले असुन चिंचाळा भाऊराव खंडरे यांची गाय ठार केली असुन बमर्दा नितीन चिकटे ,मछिद्रा बिट येते निळकंठ जुमळे , व चिंचाळा येथील रहिवासी महादेव कोल्हे यांच्या गायीवर हल्ला करुन ठार केल्याच्या घटना घडत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी पांढरकवडा येथून घोडे हाकण्याचे काम करत असुन मारेगांव कडे डोकावून सुध्दा पाहिले जात नसल्याने वाघाच्या हल्लात गायी ठार व जखमी झालेल्या मालका कडुन बोल्या जात असुन ही अवस्था अशीच राहिले तर मणुष्सावर सुध्दा हल्ला करून ठार करु शकतात वन्यप्राण्यावर वाघाचे हल्ले सुरू असुन सुध्दा वनविभागाने कुठलाही उपयोजना अजून पर्यंत केल्या नसल्याने या घटना घडत आहे.
दि.11/1/2020रोजी चिंचाळा येथील वाघाने गायीवर हल्ला. करून ठार असुन एक गाय गभिर जखमी झाली असुन व मछिद्रा बिट येथील दोन गायीवर हल्ला करुन जखमी केले असल्याने विस दिवसा अगोदर चार गायीवर वाघाने हल्ले करून ठार केल्याच्या घटना झाल्या होत्या तरी पण वनविभागाने कुठल्या उपाययोजना केल्या नसल्याने वनप्राण्यावर हल्ले चालुच असल्याने फक्त वनरक्षक पंचनामा करण्यात व्यस्त आहेच वनपरिक्षेत्रा मध्ये वनप्राण्यावर एक दिवसा आड हल्ले होत असताना सुध्दा पंचनाम्याच्या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी गेले नसल्याचे गांवकऱ्या कडुन बोल्या जात आहेत वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कडे पांढरकवडा येते अतिरिक्त पदभार दिल्याने त्यांचे मारेगांव वनपरिक्षेत्रा कडे दुर्लक्ष होत आहेत.

रिपोर्टर , सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ

गुरुदेव युवा संघाचा वीज वितरणावर धडकला मोर्चा कार्यकारी अभियंत्यांनी दिला तात्काळ वीज पुरवठा करण्याचे आदेश

 

यवतमाळ : वीटभट्टी परिसरात आवश्यक असलेले विद्युत पोल बसविण्यास वीज वितरण कंपनीकडून टाळाटाळ केली जात होती, गोरगरीब नागरिक आपल्या पाल्यासह अंधारात जीवन व्यतीत करीत होते. या बाबीकडे गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी गांभीर्याने लक्ष देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केल्याने कार्यकारी अभियंता चित्रे यांनी तीन विद्युत पोळ तातडीने लावण्याचे अतिरिक्त अभियंता कांबळे याना लेखी आदेश दिले. त्यासोबतच पाटीपुरा , दलित वस्ती, अण्णाभाऊ साठे चौक, तलाव फाईल, अशोक नगर, गवळीपुरा, येथील गोरगरीब, विधवा, अपंग नागरिकांना सौभाग्य योजनेअंतर्गत वीज वीज पुरवठा देण्यास महावितरणच्या सहायक अभियंत्यांकडून टाळाटाळ केली जात होती. मागील एक वर्षांपासून सादर गोरगरीब लाभार्थी वीज पुरवठ्यापासून वंचित होते. याबाबत गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिले यावेळी जिल्हाधीकारी अजय गुल्हाने यांनी गोरगरिबांना वीज पुरवठा देण्याचे आदेश कार्यकारी अभियंता चित्रे याना दिले.
मागील एक वर्षांपासून पाटीपुरा , दलित वस्ती, अण्णाभाऊ साठे चौक, तलाव फाईल, अशोक नगर, गवळीपुरा, येथील गोरगरीब, विधवा, अपंग नागरिकांना सौभाग्य योजनेअंतर्गत रीतसर अर्ज सादर करण्यात आले. मात्र थकीत वीज बिलाचे कारण पुढे करून सहायक अभियंत्यांकडून टाळाटाळ केली जात होती. यावर लाभार्थ्यांनी थकीत वीज बिलाचा आम्ही भरणा करतो असे म्हटल्यानंतरही सहायक अभियंता डांगे हे वीज बिले सुध्या काढण्यास तयार नाही. गोरगरीब अपंग, विधवा, नागरींकांची होत असलेली हेळसांड पाहता गुरुदेव युवा संघाने आक्रमक पवित्र घेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गोरगरिबांची व्यथा मंडळी असता जिल्हाधीकारी अजय गुल्हाने यांनी गोरगरिबांना वीज पुरवठा देण्याचे आदेश कार्यकारी अभियंता चित्रे याना दिले.त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी आदेश दिल्याने आता लवकरच वीटभट्टी परिसरात विद्युत पोळ उभे करण्यात येणार आहे. गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्यासह विटाभट्टी येथील महिला मंदा मानकर, सविता मनवर, सुरेखा भगत, लता देवतळे, सोनू जैस्वाल, उषा खरतडे, शालू धवने, अनिता मुनेश्वर, ज्योती कांबळे, आरती पाटील, निता धुमोने, राजश्री धुमोने, सारिका बुराडे, अनिता रामटेके, लता मोहोड, रुख्मीना पाटील, अर्चना मुनेश्वर, सुनीता भागडकर, मंदा बेन्ले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

पाटीपुरा येथील आयुर्वेदिक दवाखान्यात शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापनेसाठी मुख्याधिकाऱ्याकडून टाळाटाळ

 

यवतमाळ : भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकानुसार वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाकरिता पाटीपुरा येथील आयुर्वेदिक दवाखान्यात शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नंदा व न. प. पधाधिकाऱ्यांकडून अधिष्ठाता याना परवानगी देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे.
पतिपुरा, अण्णाभाऊ साठे चौक, दलित सोसायटी, अशोक नगर, सेवा नगर कळंब चौक, कुंभार पुरा, वीटभट्टी परिसर, सुराणा ले आऊट अंबिका नगर आदी परिसरातील गोरगरीब नागरिकांना आरोग्र्या सुविधा देण्यासाठी शासनाच्या प्रकल्पाला सुरु करण्यास ना. प. मुख्याधिकारी व पदाधिकारी टाळाटाळ करीत आहेत.

याबाबत गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी अधिष्ठाता श्रीगिरीवर यांचेशी चर्चा केली असता त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना याबाबत अनेकदा स्मरणपत्र दिले मात्र कुठलीच कारवाई करण्यात अली नाही. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकानुसार वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाकरिता पाटीपुरा येथील आयुर्वेदिक दवाखान्यात शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे.त्याअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आयुर्वेदिक रुग्णालयात जागा उपलब्ध करणेसाठी परवानगीच देण्यात अली नाही.गुरुदेव युवा संघाचे वतीने अधिष्ठाता याना प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याबाबत अनेकादा निवेदन देण्यांत आले तेव्हा अधिष्ठाता यांनी मुख्यधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे सांगितले प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधवैद्यकशास्त्र, स्त्रीरोगशात्र, शल्यचिकित्सक, बालरोग,दंतशास्त्र, रक्तामलमूत्र तपासणी, आदी विविध उपचाराची सुविधा नागरिकांना मिळणार होती, परिसरातील नागरिकांना शासकीय रुग्णालयाच्या गर्दीपासून सुटका होणार होती मात्र मुख्याधिकारी व ना. प. पदाधिक्यांच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिक सुविधेंपासून वंचित राहत आहेत.

या गंभीर बाबीबाबत गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. येत्या पाच दिवसाच्या आत प्राथामिक आरोग्य केंद्रासाठी परवानगी ना मिळाल्यास गुरुदेव युवा संघाचे वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नगपंचायत मारेगांव घरकुल योजनेचा बोजवारा -लालफितीचा कारभार : लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी आदेश

यवतमाळ : मारेगांव नगपंचायत अतर्गत घरकुल योजनेचा बोजवारा उडाला आहे.
लेखापाल यांच्या लालफितीच्या कारभारामुळे घर बांधणाऱ्या कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला आहे.
वेळेवर लाभार्थ्याला पैसे मिळत नाहीत. नगपंचायतच्या कारभाराविषयी जनतेत असंतोष आहे. लेखापालच्य दुर्लक्षपणामुळे सरकारी बाबूंची मनमानी सुरू आहे. नवीन घर शासनाकडून बांधून मिळणार या आशेने जुने घर मोडून लाभार्थी उघड्यावर दिवस काढत आहेत.
शासनाकडून प्रधानमंत्री आवासा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी होतात. घराचे बांधकाम सुरू केल्यावर चाळीस हजार रुपये, घराचा पाया भरल्यावर साठ हजार रुपये, घराची चौकट बसली की चाळीस हजार रुपये, रुपकाम झाल्यावर एक लाख दहा हजार रुपये,
असे हप्ते लाभार्थ्याला दिले जातात. मात्र, सध्या हे हप्ते लेखापालच्या निषकाळजी पाणा मुळे वेळेवर घरकुलचे हप्ते मिळत नसल्याने , लाभार्थ्यांनी नगपंचायत येते मोठ्या प्रमाणावर हप्ता विषय जमा झाले होते. मुखधिकारी नसल्याने वेळेवर नागरिकांना, लाभार्थ्यांना पैस मिळत नसून, वेळेवर घराच्या कामाचे फोटो अपलोड केले जात नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांना आता मुख्यधिकारी मिळेल का ? अशी वेळ लाभार्थ्यांवर आली अनेक लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे ‘भीक नको पण कुत्रे आवर’ या म्हणीप्रमाणे लाभार्थ्यांची अवस्था झाली आहे. याकडे कोणाचेच लक्ष नाही.
नगपंचायतचे मुख्यधिकारी. पाटील यांची बदली झाल्यामुळे सध्या हे पद रिक्त आहे. संबंधित कर्मचारी व अधिकारी लाभार्थ्यांची हळसाड या कार्यालयात होत असुन लाभार्थ्यां कडुन बोल्या जात आहे, नगपंचायत कारभार नामधारी असल्याचे पाहवयास मिळत आहे.
याचा फायदा लेखापाल घेत आहेत. दिवसभर नगपंचायत कार्यालयात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कार्यालयात हजर असतात. फिरकतही नाहीत. मग, लाभार्थ्यांना वेळेवर घरांचे हप्ते कसे मिळणार? त्यामुळे नगरपंचायतचा कारभाराचा बोजवारा उडाला आहे.
नगपंचायत मध्ये कार्यक्षम मुख्यधिकारी यांची गरज आहे.

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्य शासनाच्या विशेष योजनेतून गरिबांसाठी ही घरकुल योजना आहे. घरकुल विभागाने प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी नगपंचायत ने आदेश दिले आहेत. लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली आहेत, असे सांगण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी जुनी घरे पाडून नवीन बांधण्याची तयारी केली आहे. मात्र, एका महिन्यात नवीन घर बांधून होत नाही असे शासकीय कर्मचायाला माहीत असतानादेखील आपल्यावरची जबाबदारी काढून टाकायची, अशी वृत्ती नगपंचायत कर्मचारी, यांची असल्यामुळे गरिबांना आपला संसार उघड्यावर मांडावा लागला आहे.

रिपोर्टर, सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ