Sat. Sep 24th, 2022

कृषि

ब्रेकिंग न्यूज : आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर ; अधिवेशनात समस्या निकाली न निघाल्यास आंदोलन

यवतमाळ : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार आपले अपयश लपवत आहे. अधिवेशनात समस्या निकाली न निघाल्यास आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शेतकरी नेते मनीष जाधव यांनी दिला आहे.


यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड नैराश्याच्या गर्तेत सापडला असून त्याच जगणे हे निखाऱ्यावर चे झालेले असताना पालकत्व हरविलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडून आपल अपयश लपवत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. लागवडीचा खर्च निघाला नाही. आणेवारी कमी निघाली मात्र, कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. मनीष जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून लक्ष वेधले आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली निघणार काय याकडे लक्ष लागले आहे.मनीष जाधव
जिल्हाध्यक्ष, शेतकरी स्वाभिमानी संघटना

ढगाळी वातावरणाचा तुरीला फटका : राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा

 

यवतमाळ : शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात आता ढगाळी वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या वातावरणाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसणार आहे.

खरीप हंगामातील कपाशी आणि सोयाबीन पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांनी लागवड केलेला खर्च निघाला नाही. तूर पिकाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र,ढगाळी वातावरण असल्याने त्यालाही फटका बसणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे झाले आहे.

 

बाईट…
सिकंदर शहा
अध्यक्ष, शेतकरी वारकरी संघटना

राज्यातील अधिकार्‍यांची केंद्रासोबत हातमिळवणी : शेतकरी नेते किशोर तिवारी यांचा आरोप

 

यवतमाळ : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी विधेयकाची अंमलबजावणी राज्यातील अधिकार्‍यांनी ऑगस्ट महिन्यातच केली. त्यामुळे राज्यातील अधिकार्‍यांची केंद्रातील भाजप सरकारसोबत हातमिळवणी आहे, असा आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.

शेतकरी विधवांसह किशोर तिवारी यांनी आंदोलन केले. शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय घेतले जात नाही. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कायद्याची अंमलबजावणी राज्यातील अधिकार्‍यांनी तत्काळ केली. त्यामुळे या अधिकार्‍यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.

किशोर तिवारी, शेतकरी नेते

तेल घाणीने दिले जगण्याचे बळ : शेतीला जोडधंद्याचा आधार

 

यवतमाळ : शेती व्यवसाय आता तोट्याचा झाला आहे. शेतकरी आणि संकट हे समीकरण बनले आहे. यातून एका शेतकऱ्यांना नवीन मार्ग काढला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून तेल घाणीची सुरुवात केली. वेस्टज निघणाऱ्या मालातून ढेप बनविली जाते. तर घाणीच्या तेलाला ग्राहकांची मागणी आहे. तेलघाणीच्या व्यवसायाने शेतकऱ्याला लढण्याचे बळ दिले.

शेतीच्या नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या गर्तेतून बाहेर निघायचे असेल तर शेतीला जोडधंदा आवश्यक आहे. हे यवतमाळ तालुक्यात येणाऱ्या बोरी सिंह येथील शेतकरी अरविंद केसकर यांनी दाखवून दिले. शिक्षण पूर्ण झाल्यावर अरविंद यांनी वडिलोपार्जित असलेली नऊ एकर शेती कसायला सुरुवात केली. परंतु, सततच्या नापिकीमुळे ते निराश झाले. शेतीला जोडधंदा असला पाहिजे असा विचार यांच्या मनात आला. मग बाजारात अशुद्ध तेल मिळते. आपण शुद्ध तेल दिल्यास चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असा विश्वास बसला. यू ट्यूब वर तेल बनविणे,मशीनचा शोध घेतला. शेतातून निघणारे भुईमूग आणि तीळच्या माध्यमातून तेल घाणीला सुरुवात केली. त्यातून उत्पन्न मिळू लागले. मग शुद्ध खोबरेल तेल काढायला सुरुवात केली.

 

शुद्ध तेल असल्याने ग्राहकांची मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे तेल काढल्यानंतर वेस्टज मटेरियल निघते. त्यातून अरविंद केसकर हे ढेप बनवितात. दूध उत्पादक ती ढेप दूध वाढीसाठी वापरतात. या व्यवसायातून बऱ्यापैकी नफा मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे. शेतीसोबतचा जोडधंदा असल्यामुळे जीवन जगण्याला बळ मिळाले, हेही तितकेच खरे आहे.

पावसामुळे कोंब फुटलेल्या सोयाबीनची पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पाहणी

 

यवतमाळ : संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले असून सोयाबीनला चांगलाच फटका बसला आहे. ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे. एवढेच नाही तर अमरावती, वर्धा, बुलढाणा आदी जिल्ह्यात व राज्यात शेतमालाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बुधवारी याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असून नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

मडकोना येथील दिनेश गोठे या नुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेतातील सोयाबीनची पाहणी करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर उपस्थित होते.
जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, याबाबत जिल्ह्यातून आपल्याकडे तसेच प्रशासनाकडे शेतक-यांच्या तक्रारी येत आहे. त्यामुळेच प्रशासनाला सोबत घेऊन प्रत्यक्ष शेतक-यांच्या शेतात नुकसानग्रस्त शेतमालाची पाहणी करीत आहोत. जास्त पावसामुळे सोयाबीनला कोंब फुटले असून सर्वत्र हीच परिस्थिती निदर्शनास येते. शेतक-यांच्या मदतीकरीता शासन कटिबध्द असून येत्या बुधवारी मंत्रिमंडळात शेतमालाच्या नुकसानीबाबत चर्चा करू, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

लिंबू उत्पादक शेतकरी अडचणीत

उन्हाळ्यात लिंबू सरबतला मोठी मागणी असते लग्न सराई , हॉटेल ,खानावळ आदी ठिकाणी याची मोठी मागणी असते आता मात्र लिंबूला मागणी नसल्यामुळे उठाव नसल्यामुळे आता या लिंबू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे

 

शेतकऱ्यांनी वर्षभर त्याची लिंबूच्या बागेची  निगा राखली आता त्याच लिंबु उत्पादक  शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतले शासनाने यात काही मार्ग काढावा अशी शेतकरी अपेक्षा करतोय

व्यापारी लिंबुला उचलायला तयार नाही आणि अशात  सरकारने  मार्ग काढावा अशी मागणी नेर तालुक्यातील शेतकरी निखिल जैत यांच्या 4 एकर शेतात 500 लिंबुचे झाड आहे त्याची वर्षभर निगा राखली आता लिंबू गळून जात आहे काय करावं असा प्रश्न त्यांना पडलाय .

1) बाईट निखिल जैत

लिंबू उत्पादक शेतकरी

जिल्ह्यात आठ ठिकाणी तुर खरेदी केंद्र सुरु  शेतकऱ्यांना दिलासा

यवतमाळ दि.9 : तुर खरेदी संदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या आदेशाने आठ ठिकाणी तुर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. सदर केंद्रातुन तुर खरेदी संदर्भात शेतकऱ्यांना मोबाईलवर मॅसेज देण्यात येत असून शेतकऱ्यांनी तुर खरेदी करीता संबंधीत केंद्रावर तुर घेवून यावे, असे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पांढरकवडा, बाभुळगाव, मारेगाव, पुसद, नेर, दारव्हा, महागाव आणि आर्णी या ठिकाणी तुर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात तुर साठवण क्षमता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना तूर खरेदीची वाट पाहावी लागत होती. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने बाजार समित्यांचे व खाजगी गोदाम तुर खरेदीकरीता अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. शेतकऱ्यांचा माल लवकरात लवकर उचल करून त्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. तुरीचा हमीभाव 5 हजार 800 रुपये असून हा हमीभाव मिळणे शेतकऱ्यांचा अधिकार आहे. हमीभावापासून कोणीही वंचित राहू नये, शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, याचा विचार करूनच संबंधीत यंत्रणेला खाजगी व बाजार समित्यांचे गोदाम भाडेतत्वावर घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांसाठी आशादायी अर्थसंकल्प

महाविकास आघाडी सरकारने आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजना समाधानकारक आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये आशादायी वातावरण निर्माण होईल असे वाटते. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले होते. मात्र आता त्या शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज मुक्त होणार असून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.

कर्ज पुनर्गठनातील लाभार्थ्यांना कर्जमाफीतून नेहमी वगळल्या जात होते. यापूर्वीच्या कर्जमाफीच्या या लाभार्थ्यांना अडचणी आल्या होत्या. महाविकास आघाडीच्या कर्जमुक्ती योजनेमुळे या शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे. शिवाय नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार निधी दिल्या जाणार आहे. एकंदरीतच थकीत कर्जधारक व नियमित कर्ज भरणारे शेतकरी या दोन्ही घटकांना विद्यमान सरकारने न्याय दिला आहे.

या सर्व सुधारणांसाठी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष मा.ना.नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मा.महसूलमंत्र्यांची भेट घेऊन या सर्व समस्या त्यांच्यापुढे प्रकर्षाने मांडल्या होत्या.

जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान होते. हे नुकसान पीक विम्यांतर्गत समाविष्ट करावे यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार आहे. शिवाय ठिबक सिंचन योजनेची व्याप्ती वाढवून अनुदानातही वाढ करण्याचा स्तुत्य निर्णय सरकारने घेतला आहे, तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे व पाच लाख सौरऊर्जा पंप शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या सर्व बाबी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांप्रती बांधिलकी असणारे नेते सत्तेत असल्यानेच हे निर्णय होऊ शकले.

महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प हा ग्रामीण भागाला केंद्रबिंदू मानून विकासाचा आराखडा मानणारा व दुर्बल घटकांना न्याय देणारा आहे. राज्याच्या आर्थिक तिजोरीवर केंद्र सरकारने कात्री लावली आहे. जीएसटी मधून राज्याचा वाटा असलेल्या आठ हजार कोटी रुपयांचा परतावा केंद्र सरकारने कपात केला.दुष्काळ निधीसाठी राज्य सरकारने केलेली मागणी सुद्धा फेटाळून लावली. जसे महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे हित पहिले तसे केंद्र सरकारने पहिले असते व राज्याच्या हक्काचा निधी दिला असता तर हा अर्थसंकल्प आणखी चांगला झाला असता. मात्र भाजप सरकारला शेतकऱ्यांची केवळ मते पाहिजे असतात. राज्यात भाजप नसल्याने केंद्राने राज्यातील शेतकऱ्यांप्रती आपला आकसभाव दाखवून शेतकऱ्यांच्या हक्काचा निधी दिला नाही. यावरूनच भाजपाची नियत स्पष्ट होते अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी दिली.

मत्स्यव्यवसायातून आर्थिक समृद्धी : शेतकरी महिलेची यशोगाथा

 

यवतमाळ: बाभूळगाव तालुक्यातील मादणी या गावच्या महिला शेतकरी वच्छालाबाई गरजे यांनी शेततळ्यामध्ये मत्स्यव्यवसाय सुरू केला. त्यामधून वर्षांकाठी त्या चार लाख रुपयाचे उत्पन्नन मिळवीत आहे. या शेततळ्यामधील पाण्याचा उपयोग करून शेती उत्पादनात सुद्धा वाढ झाली आहे.

नापिकीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पारंपरिक पद्धतीने करण्यात येणारी शेती तोट्याची ठरत आहे. मात्र, शेतीत प्रयोग केल्यास फायदेशीर ठरते, हे या महिलेच्या प्रयोगातून दिसते.
यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या बाभूळगाव तालुक्यातील मादणी गावच्या महिला शेतकरी वच्छालाबाई गरजे यांनी तालुका कृषी विभागामार्फत खोदलेल्या शेततळ्यामध्ये मत्स्यव्यवसाय सुरू केला.त्यामधून वर्षाकाठी त्या चार लाख रुपयाचे उत्पन्न मिळवीत आहे.या शेततळ्यामधील पाण्याचा उपयोग करून शेती उत्पादनात सुद्धा वाढ होत आहे.

बाईट….
वच्छाला गरजे, महिला शेतकरी

त्या मागील अनेक वर्षांपासून शेती करततात. परंतु त्यांना पारंपरिक शेतीमधून फारसे उत्पन्न मिळत नव्हते.म्हणून त्यांनी आपला मुलगा विकास यांच्या मदतीने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली योजनेअंतर्गत शेततळे खोदले. त्यामध्ये त्यांनी प्लास्टिक पुन्नी टाकून त्यात मत्स्य बीज टाकले.त्यामध्ये त्यांना पहिल्या वर्षी दीड लाख रुपये तर दुसऱ्या वर्षी 2 लाख तिसऱ्या वर्षी अडीच लाख तर आता चोथ्यावर्षी चार लाख रुपयांच्या उत्पादनाची अपेक्षा आहे.
वच्छला गरजे ह्या महिला शेतकरी शेतामध्ये स्वता नांगरणी फवारणी,डवरणी,बैलगाडी चालवण्याचे काम करतात. त्यामुळे मजुरीच्या बचत होत आहे. महिला आज कुठेही कमी नाही, हे गरजे या महिलेच्या यशोगाथा बघून स्पष्ट होते.

कृषीमंत्र्यांच्या संकल्पनेतून प्रथमच शेतकरी, संघटना आणि शासन यांच्यात चर्चेसाठी व्यासपीठ

 

नवनविन प्रयोग करणारे शेतकरी आमचे आयडॉल
– कृषी मंत्री दादाजी भूसे

मुंबई, दि. १७: प्रत्यक्ष शेतात राबून नवनविन प्रयोग करणारे शेतकरी आमचे आयडॉल असल्याचे सांगत निसर्गावर अवलंबून असलेली शेती लहरी हवामानाच्या दुष्टचक्रातून सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत. त्यातून शेतकरी बांधवांना बाहेर काढू, असा विश्वास कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी आज येथे व्यक्त केला.

शेतकरी संघटना आणि शासन यांच्यात दुवा म्हणून कृषी विभाग काम करणार या संकल्पनेला आज मूर्त स्वरूप देत कृषीमंत्री भुसे यांनी राज्यातील विविध शेतकरी संघटना, प्रयोगशील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी यांना आपले विचार, कैफीयत, कृषी विकासासाठीच्या उपाययोजना मांडण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद देत सुमारे ३०० पेक्षा अधिक शेतकरी प्रतिनीधींनी सहभाग घेतला.

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयंत पाटील, राज्य मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, कृषी तज्ज्ञ किशोर तिवारी, अजीत नवले, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त सुहास दिवसे, कृषी संचालक राष्ट्रीय किसान महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक संदीप आबा गिड्डे पाटील,श्रीकांत तराळ,लक्ष्मण वंगे,युवराज सुर्यवंशी,धनंजय जाधव,राजाराम पाटील,अभयसिंह अडसुळ,अतिश गरड,पवन पारवे,ओंकार शिंदे,माऊली हाळवणकर,नितीन थोरात,अरुण कान्हेरे,उमेश शिंदे,राजाराम देशमुख,प्रभाकर देशमुख,बी जी पाटील,दत्ता गिराम, यांच्यासह राज्यभरातील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनीधी, प्रयोगशील व पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते.

गेल्या अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग झाला. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना थेट कृषिमंत्री आणि विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर व्यथा मांडता आल्या, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

तुमचा भाऊ म्हणून मला व्यथा सांगा, त्या समजून घ्यायला अधिकाऱ्यांसमवेत येथे आलोय, असे आवाहन करून कृषीमंत्री म्हणाले, लहरी हवामानामुळे शेतीवर संकट कायम येते. शेतकरी आत्महत्या या अतिशय वेदनादायी असून त्या रोखण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन श्री. भुसे यांनी यावेळी केले. कृषी विकासाच्या योजना राबविताना त्या सकारात्मक पद्धतीने राबवण्यात येतील. वर्षानुवर्ष शेती करणाऱ्या अनुभवी शेतकऱ्यांचे बोल ऐकण्यासाठी आम्ही आलोय त्यांच्या सूचना नक्कीच अमलात आणू, अशी ग्वाही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिली.

सुमारे चार तासांहून अधिक वेळ चाललेल्या या कार्यक्रमात राज्यभरातील शेतकऱ्यांनी समस्या मांडत शेतीसाठी विविध उपाययोजना सुचविल्या. प्रथमच झालेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनापर्यंत व्यथा पोहोचल्याची भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली.