Sat. Sep 24th, 2022

आरोग्य

ब्रेकिंग न्यूज : जिल्ह्यात दोन मृत्युसह 511 जण नव्याने पॉझेटिव्ह 194 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 2 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह तब्बल 511 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 194 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये बाभुळगाव तालुक्यातील 73 वर्षीय आणि मारेगाव तालुक्यातील 67 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 511 जणांमध्ये 303 पुरुष आणि 208 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळातील 174, पुसद 164, दिग्रस 34, दारव्हा 28, पांढरकवडा 18, बाभुळगाव 17, उमरखेड 13, आर्णी 12, घाटंजी 12, वणी 09, महागाव 04, कळंब 02, मारेगाव 01 व इतर 1 रुग्ण आहे.
मंगळावारी एकूण 2736 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 511 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2225 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1803 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 18086 झाली आहे. 24 तासात 194 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15816 आहे. तर जिल्ह्यात एकूण 467 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 164838 नमुने पाठविले असून यापैकी 164313 प्राप्त तर 525 अप्राप्त आहेत. तसेच 146227 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००

ब्रेकिंग न्यूज : जिल्ह्यात तीन मृत्युसह 186 जण पॉझेटिव्ह  131 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 28 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 186 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 131 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ येथील 76 वर्षीय पुरुष, महागाव येथील 62 वर्षीय पुरुष आणि मारेगाव तालुक्यातील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 186 जणांमध्ये 112 पुरुष आणि 74 महिला आहेत. यात यवतमाळातील 82 रुग्ण, पुसद येथील 60, दिग्रस 12, पांढरकवडा 15, वणी 5, दारव्हा 1, घाटंजी 4, महागाव 3, नेर 2, उमरखेड़ 1 आणि 1 इतर रुग्ण आहेत.
रविवारी एकूण 1112 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 186 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 926 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1554 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 17516 झाली आहे. 24 तासात 131 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15500 आहे. तर जिल्ह्यात एकूण 462 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 162899 नमुने पाठविले असून यापैकी 161117 प्राप्त तर 1782 अप्राप्त आहेत. तसेच 143601 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
00000000

जिल्ह्यात तीन मृत्यु, 140 जण पॉझेटिव्ह 90 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 25 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 140 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 90 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष, पुसद येथील 65 वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 140 जणांमध्ये 87 पुरुष आणि 53 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 45 रुग्ण, पुसद 32, दारव्हा 19, बाभुळगाव 14, महागाव 8, पांढरकवडा 6, वणी 5, दिग्रस 3, घाटंजी 3, कळंब 2, उमरखेड 2 आणि इतर ठिकाणचा 1 रुग्ण आहे.
गुरूवारी एकूण 1371 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 140 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1231 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1343 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16856 झाली आहे. 24 तासात 90 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15059 आहे. तर जिल्ह्यात एकूण 454 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 158453 नमुने पाठविले असून यापैकी 156950 प्राप्त तर 1503 अप्राप्त आहेत. तसेच 140094 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००००

ब्रेकिंग न्यूज जिल्ह्यात 215 जण पॉझेटिव्ह, 56 जण कोरोनामुक्त एकाचा मृत्यु

यवतमाळ, दि. 24 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 215 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 56 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 71 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 215 जणांमध्ये 121 पुरुष आणि 94 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 100 रुग्ण, दारव्हा 28, पुसद 22, दिग्रस 17, पांढरकवडा 16, वणी 12, नेर 10, झरीजामणी 3, बाभुळगाव आणि उमरखेड प्रत्येकी 2, आर्णि, राळेगाव आणि इतर ठिकाणचा प्रत्येकी 1 रुग्ण आहे.
बुधवारी एकूण 1271 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 215 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1056 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1296 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16716 झाली आहे. 24 तासात 56 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14969 आहे. तर जिल्ह्यात एकूण 451 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 156701 नमुने पाठविले असून यापैकी 155579 प्राप्त तर 1122 अप्राप्त आहेत. तसेच 138863 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००००

ब्रेकिंग न्यूज जिल्हाधिका-यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस इतरांनीही घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला दारव्हा येथून सुरवात झाली आहे. सुरवातीला शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना लस देण्यात येत असून याच अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज (दि.24) कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली.
पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागासह महसूल, पोलिस, नगर पालिका यंत्रणा, पंचायत राज व्यवस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांना लस देण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत एकूण 28324 जणांची नोंदणी झाली असून यापैकी 16133 जणांचे लसीकरण झाले आहे. तर उर्वरीत 12191 जणांचे लसीकरण बाकी आहे. जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी 57 असून सर्वाधिक लसीकरणाची टक्केवारी पोलिस विभागाची आहे. कोव्हीडची लस ही पूर्णपणे सुरक्षित असून नोंदणी झालेल्या सर्वांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
००००००

योगेश साहेबराव पाळेकर यांचे निधन

यवतमाळ : पांढरकवडा पंचायत समितीमध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी योगेश साहेबराव पाळेकर (४३) रा. माईंदे चौक, यवतमाळ यांचे दीर्घ आजाराने नागपूर येथील खासगी रूग्णालयात आज मंगळवारी पहाटे ५ वाजता निधन झाले. त्यांच्यावर नागपूर येथील गणेशपेठ मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई-वडील, तीन बहिणी, जावई असा आप्त परिवार आहे.

नियम न पाळल्यास पाच तालुक्यात लॉकडाउन : वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांचा इशारा

यवतमाळ : कोरोना बाधितांच्या संख्येचा आकडा फेब्रुवारी महिन्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली. यवतमाळ, पुसद, दारव्हा, नियम न पाळल्यास पाच तालुक्यात लॉकडाउन : वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांचा इशारा

यवतमाळ : कोरोना बाधितांच्या संख्येचा आकडा फेब्रुवारी महिन्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली. यवतमाळ, पुसद, दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस या पाच तालुक्यात सर्वाधिक संख्या आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करावे, 26 फेब्रुवारीनंतर परिस्थिती आटोक्यात न आल्यास पाच तालुक्यात लॉकडाउन करण्याचा इशारा पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांनी दिला. पोहरादेवी येथून दर्शन घेवून आल्यावर मंत्री राठोड यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

बाईट…

संजय राठोड, वनमंत्री तथा पालकमंत्री, यवतमाळ., दिग्रस या पाच तालुक्यात सर्वाधिक संख्या आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करावे, 26 फेब्रुवारीनंतर परिस्थिती आटोक्यात न आल्यास पाच तालुक्यात लॉकडाउन करण्याचा इशारा पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांनी दिला. पोहरादेवी येथून दर्शन घेवून आल्यावर मंत्री राठोड यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

 

जिल्ह्यात एका मृत्युसह 210 जण पॉझेटिव्ह  107 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 22 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 210 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 107 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ येथील 87 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 210 जणांमध्ये 129 पुरुष आणि 81 महिला आहेत. यात यवतमाळातील 114 रुग्ण, पुसद येथील 41, पांढरकवडा 33, दारव्हा 17, वणी 3, राळेगाव 1 आणि झरीजामणी येथील 1 रुग्ण आहे.
सोमवारी एकूण 1113 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 210 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 903 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1052 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16255 झाली आहे. 24 तासात 107 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14755 आहे. तर जिल्ह्यात एकूण 448 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 153588 नमुने पाठविले असून यापैकी 152969 प्राप्त तर 619 अप्राप्त आहेत. तसेच 136714 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००००

तब्बल एकाच वेळी 89 डॉक्टरांनी दिले राजीनामे

 

यवतमाळ : न्याय मागण्यासंदर्भात महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारीजिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी कार्यालय गाठले. मात्र, काहीही ऐकूण न घेता अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप करीत एकाच दिवशी 89 डॉक्टरांनी राजीनामे दिले.

आरोग्य विभागात 50 टक्केपेक्षा जास्तपदे रिक्त आहेत. फेब्रुवारीपासून सर्व डॉक्टर मार्गदर्शक सूचनानुसार काम करीत आहेत. सात महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या समस्यांची कुठेही दखल घेण्यात आली नाही. प्रशासनाकडून सन्मानजनक वागणूक मिळत नाही, असा मॅग्मोचा आरोप आहे. कोविड-19च्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा धाक दाखविला जातो. त्यामुळे मनोबल खचत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आरोग्य अधिकारी वेळेचे कोणतेही बंधन न पाळता काम करीत आहेत. कोविडविषयक अहवाल गाव पातळीवरून तालुका व जिल्हास्तरावर पाठविण्यात येतात. कार्यालयीन काम संपल्यावर अहवाल तयार करणे शक्य होत नाही. इतर विभागाचे सहकार्य मिळत नाही. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी मॅग्मोचे काहीही ऐकूण घेतले नाही. आम्हाला कुटुंब नाही का, असा प्रश्‍न उपस्थित करीत तब्बल 89 वैद्यकीय अधिकार्‍यांनी राजीनामे दिले.

TV INDIA NEWS : डॉक्टर डे निमित्य डॉक्टर्स ना पुष्पगुच्छ देऊन भारतीय जनता युवा मोर्चा ने मानले आभार

 

 

आज संपुर्ण जगामध्ये कोरोना मूळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे,लाखो लोग या कोरोना मुळे मृत्युमुखी पडले आहेत तर लाखो लोकांचे जीवन आताही धोक्यात आहे.अशा भीषण परिस्थिती मध्ये संपुर्ण जगातील डॉक्टर हे आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या परिवारपासून दूर राहून देवदूत म्हणून काम करत आहेत त्यांच्या या सेवेला सलाम म्हणून, त्यांच्या या सेवेसाठी धन्यवाद देण्याकरिता डॉक्टर डे च्या दिवशी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे करण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुरज गुप्ता, उ.भा.आघाडी चे जिल्हा सचिव सुरज विश्वकर्मा, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुरज जैन, योगेश पाटील,युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष स्वप्नील उल्लंगवार,अभिलाष ठाकरे,तसेच युवा मोर्चा चे पदाधिकारी जय चौधरी, समर बोबडे,सुधाकर गोरफडे आदी उपस्थिती होते