Sat. Sep 24th, 2022

सांस्कृतिक

ब्रेकिंग न्यूज : ओंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीचा यात्रा महोत्सव रद्द जिल्हाधिकारी यांचे आदेश

हिंगोली जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढतच आहे देशातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री महोत्सवा निमित्त मोठी यात्रा भरते जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यात्रा रद्द करण्याचे आदेश काढले आहेत देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त मोठी यात्रा असते रथ उत्सव कार्यक्रम यात्रेतील प्रमुख आकर्षण असून नागनाथ मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात सुमारे दोन लाख भाविकांची उपस्थिती असते मात्र यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आलीये.

शिक्षण विभाग एम.ऐ. च्या अभ्यास क्रमास असलेली शिधार्थ भगत यांची गझल,जखमा अजुन ओल्या,

 

 

या गझलेचे नुकताच नेर तालुक्यातील खोलापुरी टेंभी, दोनद परीसरात करण्यात आले,
या गझल चित्रिकरणाचे निर्माता, दिग्दर्शक जनार्दनजी राठोड यांनी केले असुन या गझलेचे गझलकार प्रा. शिधार्थ भगत हे आहेत. गजलेला सुमधुर संगीत व गायण प्रसिद्ध गायक गौतमजी पाढेण यांनी केलेले आहे, कलाकार म्हणुन मुख्य भुमिकेत चंदण अवजाडे, तेजस्वीनी पाढेण, यांची असुन साहेबराव येवले, सिमी बेलसरे, कुणाल पाढेण,आरती बेलखेडे वृतुजा येवले, मिलन गावंडे स्वप्निल ठवकर इत्यादी कलावंताचे सहभाग आहे अत्यंत वेदना मांडणारी गझल असुन लवकरच आपल्या सेवेत प्रस्तुत होणार आहे.

 

यवतमाळ शहरात महाआरती : फटाके फोडून जल्लोष

 

 

– यवतमाळ : अयोध्या येथे राम मंदिराची पायाभरणी आज करण्यात येत आहे. त्या पश्वभूमीवर यवतमाळ येथे उत्साह बघायला मिळत आहे.

भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते दत्त चौकात
उपस्थित झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. महाआरती देखील होणार आहे. यावेळी जय श्रीराम ची घोषणाबाजी करण्यात आली.

बोरी गदाजीत खेळली जाते रक्त रंजित होळी ; नागरिक होतात जखमी

यवतमाळ : एकमेकांवर दगडफेक करून खेळल्या जाणाऱ्या होळीत नागरिक जखमी होतात. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातल्या बोरी गदाजी गावात रक्ताची होळी खेळली जाते.

होळीची धुळवड म्हंटल की विविध रंग छटा आणि असंख्य रंगांनी माखुन गेलेले चेहरे अशीच कल्पना आपल्या डोळ्यासमोर येते. मागील पन्नास वर्षापासून या गावात ही परंपरा चालू आहे. होळीच्या दिवशी या गावात तुफान दगडफेक होते. ही दगडफेक आकसापोटी किंवा

भांडणातून नव्हे तर परंपरेचा एक भाग म्हणून केली जाते.. होळीच्या दिवशी गावात गदाजी महाराज यांची यात्रा भरते. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यात्रेत आलेले भाविक एकमेकांवर तुफान दगडफेक करतात ही दगडफेक श्रद्धेचा भाग म्हणून पाळला जाते. विशेष बाब अशी की एकमेकांचे रक्त निघेपर्यंत ही दगडफेक सुरूच असते.

 

होळीच्या दिवशी सकाळी गावकरी मिळून प्रतिकात्मक शवयात्रा काढतात. त्यानंतर संस्था प्रांगणात जाऊन अंघोळ व पूजा विधि आटोपतात. त्यानंतर दोन-तीन भाविक जवळील एका टेकडीवर जाऊन दगडांचा मारा सुरू करतात. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गावकरी

 

दगडफेक सुरू करतात. ही दगडफेक तोपर्यंत सुरू असते जोपर्यंत तिथे उपस्थित भाविक रक्त बंबाळ होत नाही. प्रशासकीय पातळीवरून ही परंपरा बंद करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने मात्र गावकऱ्यांचा विश्वास या परंपरेवर कायम राहिला आणि रक्तरंजित होळी खेळणे मात्र अजूनही सुरूच आहे.

 

रिपोर्टर ,सचिन मेश्राम मारेगाव, यवतमाळ

बोरी गदाजीत खेळली जाते रक्त रंजित होळी ; नागरिक होतात जखमी

यवतमाळ : एकमेकांवर दगडफेक करून खेळल्या जाणाऱ्या होळीत नागरिक जखमी होतात. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातल्या बोरी गदाजी गावात रक्ताची होळी खेळली जाते.

 

होळीची धुळवड म्हंटल की विविध रंग छटा आणि असंख्य रंगांनी माखुन गेलेले चेहरे अशीच कल्पना आपल्या डोळ्यासमोर येते. मागील पन्नास वर्षापासून या गावात ही परंपरा चालू आहे. होळीच्या दिवशी या गावात तुफान दगडफेक होते. ही दगडफेक आकसापोटी किंवा

भांडणातून नव्हे तर परंपरेचा एक भाग म्हणून केली जाते.. होळीच्या दिवशी गावात गदाजी महाराज यांची

 

यात्रा भरते. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यात्रेत आलेले भाविक एकमेकांवर तुफान दगडफेक करतात ही दगडफेक श्रद्धेचा भाग म्हणून पाळला जाते. विशेष बाब अशी की एकमेकांचे रक्त निघेपर्यंत ही दगडफेक सुरूच असते.

होळीच्या दिवशी सकाळी गावकरी मिळून प्रतिकात्मक शवयात्रा काढतात. त्यानंतर संस्था प्रांगणात जाऊन अंघोळ व पूजा विधि आटोपतात. त्यानंतर दोन-तीन भाविक जवळील एका टेकडीवर जाऊन दगडांचा मारा सुरू करतात. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गावकरी दगडफेक सुरू करतात. ही दगडफेक तोपर्यंत सुरू असते जोपर्यंत तिथे उपस्थित भाविक रक्त बंबाळ होत नाही. प्रशासकीय पातळीवरून ही परंपरा बंद करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने मात्र गावकऱ्यांचा विश्वास या परंपरेवर कायम राहिला आणि रक्तरंजित होळी खेळणे मात्र अजूनही सुरूच आहे.

 

रिपोर्टर, सचिन मेश्राम मारेगांव, यवमाळ

वसंतरावजी नाईक यांच्या स्मृती स्थळाचा विकास आता जनतेच्या हातात”

 गोर बंजारा समाजाच्या नव्हे तर बहुजनांच्या सामाजिक,राजकीय व सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक, वसंतरावजी नाईक यांच्या स्मृतिस्थळासोबतच झिलकरींचे मानधन व नागपूरचे सभागृह या मागण्या आता जनतेच्या हातात आहे,त्यामुळे या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जनतेने 19 फेब्रुवारी 2020 ला एक दिवसासाठी प्रेरणा यात्रेमध्ये मोजता येणार नाही एवढ्या संख्येमध्ये उपस्थित राहणे गरजेचे आहे असे आवाहन तांडा सुधार समितीचे मुख्य संयोजक नामा बंजारा यांनी कोरपना तालुक्यातील धानोली येथील व विद्यानगरी गडचांदूर या दोन्ही सभेतून महाराष्ट्रासह भारतातील तमाम जनतेला केले. संत सेवालाल महाराज ज्यांतिप्रीत्यर्थ धानोली तांडा येथे आयोजित आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.शासन या मागणीच्या मागे किती जनरेटा आहे याचा विचार करत असते. त्यासाठी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया व टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आपली मागणी व त्या मागणीमध्ये असलेला जनतेचा सहभाग शासनापर्यंत पोहोचवणे आवश्यक असून सगळी कामे एका दिवसासाठी बाजूला ठेवून विधानभवन नागपूर ते प्रेरणा भुमी गहुली या रॅलीमध्ये सहभागी होऊन आपले वसंतरावजी नाईकांवरचे प्रेम जनतेने दाखवून द्यावे असेही आवाहन नामा बंजारा यांनी विद्यानगरी गडचांदूर येथे आयोजित गोर सेनेच्या सेवालाल महाराज जयंती महोत्सवात केले.

संत सेवालाल महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमली यवतमाळ नगरी

 

रँली मार्गातील सर्व थोर पुरुषांच्या प्रतिमा,पुतळ्यांना हार अर्पण..

सद्गुरू सेवालाल महाराज यांच्या 281 व्या जयंतीनिमित्त काल यवतमाळ शहरात भव्य टु व्हीलर रॅलीचे आयोजन करण्यात आले अकराशे टू व्हीलर, ” बेटी बचाव बेटी पढाव ” “झाडे लावा झाडे जगवा ” “जल है तो कल है” संत सेवालाल महाराजांचे अमृतवचन अशा विविध विषयाच्या आशयपूर्ण असलेल्या संदेशासह परंपरागत बंजारा वेशभूषेतील महिला व तरुणींची रॅली विशेष आकर्षीत करणारी होती.रॅलीला डॉ.टी.सी.राठोड,श्री अनिल आडे,श्री मोहन राठोड डॉ. महेश चव्हाण, श्री.जगदीश पवार प्रा.प्रेम जाधव यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली.रँली मार्गातील सर्व पुतळ्यांना हार अर्पण करून एकता-समतेचा संदेश बंजारा बांधवांनी दिला.स्थानिक राजीव नगर आर्णी रोड यवतमाळ येथील जयंती उत्सव कार्यक्रमात बंजारा संस्कृतीक कार्यक्रमात सुरुवातीला पुलवामा येथे शहीद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली संत सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्ताने संत सेवालाल जयंती सजावट, नृत्य स्पर्धेचे तसेच संत सेवालाल जयंती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर टू व्हीलर रॅली प्रबोधनपरभजनाचा कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आला.सायंकाळी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परमपूज्य संत सेवालाल महाराज जयंती व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.नृत्य स्पर्धेतील.विदयार्थ्यांना बक्षीसे देवून कौतुक करण्यात आले.सेवालाल जयंती सजावट स्पर्धेच्या विजेत्या प्रथम पुरस्कार सौ.ज्योती राजेश चव्हाण व्दितिय पुरस्कार सौ.सुजाता रविंद्र जाधवतृतीय पारितोषिक विभागून सौ.वीणा अशोक जाधव व सौ.सविता शेखर राठोड प्रोत्साहनपर सौ.प्रणीता गजानन राठोड, यांना अनुक्रमे रोख 2001 ,1501,1001,प्रमाणपत्र वृक्ष देवून सन्मानित करण्यात आले तसेच पोलीस सेवेतील उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीपदक प्राप्त झाल्यामुळे श्री साहेबराव राठोड यांना ,राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्यामुळे श्री आसाराम चव्हाण यांना डीआरडीओ मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल श्री संकेत आडे तसेच स्वप्निल जगदीश पवार यांची इस्रो मध्ये निवड व चंद्र यान मोहीमेतील यशस्वी सहभागासाठी ‘सेवा सन्मान” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी बंजारा गोर विचारपीठावर ती अध्यक्ष म्हणून समाज कल्याण सभापती मा.विजय राठोड तर अतिथी म्हणून मा.डॉ. मोहन राठोड डॉ.वीरेंद्र राठोड डॉ. महेश चव्हाण,डॉ.विनायक राठोड डॉ.दिलीप चव्हाण श्रीमती मधुमतीताई चव्हाण श्री.एल.एच.पवार श्री गजानन राठोड अध्यक्ष संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती यांची उपस्थिती होती. संत सेवालाल महाराज जयंती उत्सव व बंजारा टीचर्स असोसिएशन दारा मागील 13 वर्षापासून संत सेवालाल महाराज यांची जयंती चे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री गजानन राठोड उपाध्यक्ष श्री रवींद्र जाधव श्री ज्ञानेश्वर चव्हाण सचिव प्रा. राजेश चव्हाण कोषाध्यक्ष प्रा. डी एस चव्हाण व समस्त जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकरत्यांनी परिश्रम घेतले.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविनाश राठोड व सौ.ज्योती चव्हाण यांनी तर जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले.

संत सेवालाल महाराज यांची 281 जयंती मोठ्या थाटात संपन्न

इटावा वार्ड पुसद येथील मैनाबाई नगर, स्नेह नगर, येरावार ले आऊट, गडदे नगर आदी परिसरातील नागरिकांनी फार मोठ्या उत्साहात संत सेवालाल महाराज यांची 281 वी जयंती 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधून परिसरामध्ये सात दिवसीय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील सर्वच जातीधर्माच्या नागरिकांनी या सप्ताहामध्ये सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्य़ासाठी सहकार्य केले.
15 फेब्रुवारी 2020 रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीमध्ये पारंपारिक बंजारा वेशभूषे मध्ये महिलांनी, शाळकरी मुलींनी वेशभूषा परिधान करून शहरवासीयांचे लक्ष वेधले. लहान लहान शाळकरी मुलींनी परंपरागत बंजारा वेशभूषा परिधान करून कळस रॅली काढली. पारंपारिक वाद्याच्या गजरात महिलांनी पारंपारिक बंजारा नृत्य रॅलीमध्ये सादर केलीत.
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीचा समारोप फुलसिंग नाईक महाविद्यालय जवळील सुधाकरराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोर भोग-भंडारा करण्यात आला. युवकांचे आदर्श यातील नाईक यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भोग लावण्यात आला. कार्यक्रमाला परिसरातील सर्वच जाती धर्माच्या नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून एकतेचे दर्शन घडविले.

राम राठोड
TV INDIA प्रतिनिधी
पुसद जि.यवतमाळ

संत गजानन महाराज प्रगट दीना निमित्याने घाटंजी शहरात भव्य यात्रेचे आयोजन

श्री गजानन महाराज मंदीरात पाच दीवस भजन कीर्तन होम हवन होऊन 15/2 ला दहीहांडी काला व महाप्रसादाने सागंता केली जाते . शहरात या यात्रेच्या निमीत्याने ठीकठीकानी भाविकां तर्फे अन्न दानाचे स्टाल ऊभारण्यात येते

घाटंजी येथील गजानन महाराजांच्या भव्य अश्या मंदीरात श्रीच्या आकर्शक मुर्तीने मन भारावून जाते. प्रगट दीना निमीत्याने हजारो भक्तगन एकत्र येवून जनू भव्य यात्रेचे स्वरुप प्रात होते या एक दीवशिय यात्रेत खेळण्या पासून ते मनोरंजना पर्यतं सगळ्या मंडळीची ऊपस्तिती ईथे पहावयास मिळते. तिस हजाराच्यावर दीवसभर चालणारा महाप्रसादाचा लाभ भाविक घेतो. सायंकाळी च्यार च्या सुमारास भव्य दीडीं सपूर्ण शहराला विळखा घालीत वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात टाळ म्रुदंग गाच्या तालात हजारो च्या संखेने असलेली भजनी मंडळी नाचत गात चालते. ते द्रुश्य डोळ्याचे पारणे फेडल्या शिवार राहत नाही

प्रतिनीधी, संजय ढवळे

घाटंजी यवतमाळ

जयगुरू चा गजर.. संपूर्ण नांदा मध्ये जय गुरू चा जल्लोप

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 51 वी व वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांचा 63 व्या पुण्यतिथी दोन दिवसीय भरगच्च असा कार्यक्रम गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामवासीय नांदा यांनी आयोजित केला होता. पहिल्या दिवशी दिनांक 18 जानेवारी 2020 ला सामुदायिक ध्यानपाठा व घटस्थापना करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली भजन स्पर्धा व अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमानि नांदा नगरी भिन्न झाली .

राष्ट्रसंतांचे विचार आपण स्वतःमध्ये अंगिकारावे आपण कुठल्याही धर्माचे असलो तरी आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय आपण सर्व धर्म बांधवांनी एकत्र येऊन गाव असो जिल्हा असो वा राष्ट्र असो त्या सर्व धर्म संभावाने असणे काळाची गरज आहे सगळ्या संतांचे विचार सुद्धा एक आहेत.

माणसांनी माणसावर प्रेम करावे माणसांनी आपल्या शरीरावर प्रेम करावे माणसाला लागलेल्या वाईट सवयी गुटखा तंबाखू सेवन करणे टाळावे तंबाखू युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे कॅन्सर सारखे भयानक रोग होतात त्या रोगांवर मठ करणे अशक्य आहे त्या मुळे गावात दारू मुक्त तंबाखू मुक्त गाव करावे असे आपल्या कीर्तनातून ह.भ.प. शरद वैद्य महाराज यांनी नागरिकांना संबोधित केले.

दुसऱ्या दिवशी सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली व रामधून म्हणून तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांचा पालखी सोहळा काढण्यात आला. यावेळी या पालकी सोहळयात बाहेरगावील भजन मंडळींनी सहभाग घेतला होता. त्यात त्यांनी तुकडोजी महाराज यांचे भजन गीत गाऊन संपुर्ण गावाला भजनात रंगवून टाकले. भजना सोबत गावातील स्वच्छता करून संपूर्ण पालखी सोहळ्यातील समस्त ग्रामवासीय या पालखी सोहळ्यात जय गुरूच्या च्या उदघोषणा संपूर्ण ग्रामवासी रंगले होते. त्या नंतर सायंकाळी काल्याचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण ग्रामवासी आणि बाहेरील आलेल्या पाहुण्यांनी काल्याचा आस्वाद घेतला. श्री गुरुदेव सेवा मंडळ याचे सदस्यगण व ग्रामवासीयांनी परिश्रम घेतले.

 

रिपोर्टर, मनोज गोरे चंद्रपुर