Sat. Sep 24th, 2022

अपघात

ब्रेकिंग न्यूज : पालकमंत्री सुनिल केदार यांनी केली रात्री गोल मार्केट परिसराची पाहणी

वर्धा शहरात गोल मार्केट परिसरात लागलेल्या भीषण आगीत आज तब्बल 10 ते 15 दुकाने संपूर्ण जळून खाक झाले. यात भाजी व्यवसायिक आणि फ्रूट व्यवसायिक यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. सांगितले गेले तब्बल वीस ते पंचवीस लाख रुपयाचे नुकसान या संपूर्ण भागामध्ये या आगीमुळे झाले.
या परिसराची संपूर्ण पाहणी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी आज रात्रीच्या ११.३० वाजता वाजताच्या सुमारास केली असता ते म्हणाले पहिले प्राधान्य मी नुकसान झालेल्या व्यवसायिकांना कशा स्वरूपात मदत करता येईल याकडे बघेल आणि नंतर री स्ट्रक्चर कडे वळणार.
विशेष करून पालक मंत्री म्हणाले मी आज मुंबईत होतो परंतु मला या घटनेबद्दल माहिती मिळताच मी थेट इथे पोचलो आणि हे सरकार महा विकास आघाडीचे सरकार आहे आणि त्या नात्याने मी नक्की आश्वासन देतो की ज्यांचे नुकसान झाले ते भरपाई नक्कीच मिळणार परंतु हे भरपाई कशा स्वरूपात मिळेल हे मी आत्ताच सांगू शकणार नाही.
संपूर्ण घटनेचे तपास करून ही आग कशामुळे लागली किंवा लावल्या गेली हे बघितलं जाणार असेदेखील पालकमंत्री म्हणाले.

 

दुचाकीच्या धडकेत एक गंभीर

यवतमाळ : भरधाव जात असलेले एका बुलेट चालकाने वळण रस्त्यावर दुचाकीस्वार एकाला जबर धडक दिली. यामध्ये संबंधिताला गंभीर दुखापत झाली. ही घटना 21 फेब्रुवारीला सकाळी 9.00 वाजताच्या सुमारास आर्णी रोड वरील एसएसडी कलेक्शन पुढे घडली.
पवन कुमार नंदलाल इसरानी (41) रा.वैद्य नगर यवतमाळ असे अपघात जखमीचे नाव आहे. ते आपल्या ऍक्टिवा क्रमांक एमएच 29 एसी 8011 ने जात होते. याच दरम्यान विरुद्ध दिशेने भरधाव येत असलेल्या बुलेट क्रमांक एमएच 26 एक्यू 6333 चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून त्यांना जबर धडक दिली. घटनेनंतर इसरानी यांनी अवधूत वाडी पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून बुलेट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
_______________

ट्रक अपघातात दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू

यवतमाळ : सावरगड येथे जात असताना ट्रक अपघातात दुचाकीस्वार दोघा तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजता दरम्यान सावरगड रोडवर घडली.

शेख जाहीद शेख जाकीर (वय 21, रा. अमराईपुरा), केतन पुंडलिक राठोड (वय 24, रा. सुदर्शननगर, वडगाव), अशी मृतांची नावे आहेत. रविवारी जाकीर शेख यांच्या नातेवाइकांचे यवतमाळ येथे लग्न होते. सावरगड येथून पाहुण्यांचा फोन आला. त्यामुळे जाहीद मित्र केतनच्या दुचाकीने सावरगड येथे जाण्यासाठी निघाले. ट्रकच्या मागील चाकात आल्याने दोघेही गंभीर झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी जाकीर शेख पीर मोहम्मद यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ट्रक चालकाविरुद्घ गुन्हा नोंदविला.

यवतमाळात आयुषी इलेक्ट्रो होमिओपॅथी दुकानाला आग; दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

यवतमाळ : दत्त चौकात असलेल्या नगर परिषदेच्या गाळ्यातील आयुषी इलेक्ट्रो होमिओपॅथी दुकानाला आग लागल्याने जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजता दरम्यान घडली.

भाजी मंडीतील गाळ्यात आयुषी इलेक्ट्रो होमिओपॅथी नाचाचे दुकान आहे. आगीची घटना लक्षात येताच दत्त चौकात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग दुसर्‍या माळ्यावर धुमसत असल्याने विझविताना अग्निशमन दलाच्या पथकाला चांगलीच कसरत करावी लागली. आगीत पाच लाखांचे फर्निचर, होमिओपॅथी जिमचे साहित्य, काही मशिनरी, पाच लाखांची औषधी जळून खाक झाली. आयुषी होमिओपॅथीच्या संचालक ममता बैस यांचे सेंटर असून, प्रदीप मेंडे यांच्या नावे दुकान आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जखमी

यवतमाळ : भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण जखमी झाला. ही घटना आज दुपारी किन्ही येथील सामत धाब्याजवळ दुपारी तीन वाजता दरम्यान घडली.

गणेश नाटकर ,रा. किन्ही,असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. महामार्गावर दिवसभर सुसाट वेगाने वाहने धावतात. त्यातून अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण जखमी झाला. अपघात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

नागपूर ते तुळजापूर महामार्गावर बस व ट्रक्टर चे अतिशय भिषण अपघात

नागपूर ते तुळजापूर चौपरीकरणाचे रोड चे काम नुकतेच पूर्णत: होत आले असुन
नांदेड ते आर्णी मार्ग जात असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन ची बस आर्णी कडून वेगाने जात असलेल्या एका ट्रक्टर ची जबर समोरासमोर धडक झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील नांदेड माहुर मार्गावरील सुकळी या गावाजवळ सुमारे वेळ ५:४४ हा अतिशय भिषण अपघात घडला सुदैवाने जिवीतहानी टळली ट्रक्टर चालक किरकोळ जखमी बस क्रमांक,एम एच २० बि एल ३५३४, ट्रक्टर क्रं अद्रुश्य असल्याने दिसू शकले नाही.

शकील शेख
ता, दिग्रस यवतमाळ

शेततळ्यात बुडून एकाचा मृत्यू

शेततळ्यातील मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या तरुण युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना एकोडी शेत शिवारात रविवारी दुपारच्या 3 वाजतच्या सुमारास घडली. दिलीप उर्फ सुभाष भोयर (26) रा. भोयगाव ता.कोरपना असे मृताचे नाव आहे. तो भोयगाव येथे गाडी दुरुस्ती चे काम करीत होता. दिलीप व त्याचे मित्रा सोबत एकोडी येथील शालीकराव पोवार यांच्या शेतालगत असलेल्या शेततळ्यातील मच्छी पकडण्यास गेले असता अचानक पाय घसरून खोल पाण्यात पडले मात्र दिलीप यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून आकस्मिक मृत्यू झाला. त्यांच्या सोबत गेलेल्या मित्रानी आरडाओरड करायला सुरुवात केली. इकडे-तिकडे बघीतले पण त्यावेळी शिवारात कुणी नसल्याने दिलीपच्या मदतीला कुणीही धावून जाऊ शकले नाही. अखेर दिलीपचा शेततळ्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
घरचा कमावता मुलगा गेल्याने आई वडिलांवर उपासमारीची पाळी आली आहे शासनाने काही तरी मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याबाबत पोलीसांना माहिती दिली घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी दिलीपचा मृतदेह पाण्याबाहेर काढून तपासणीसाठी गडचांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला सदर घटनेमुळे भोयर परिवारासह गावात सर्वत्र शोककळा पसरली. या प्रकरणी गडचांदुर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास गडचांदुर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गोपाल भारती करीत आहे.

मनोज गोरे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

BREAKING – यवतमाळ -टाटा मॅजिक वाहन उलटून अपघातात…६ जण जागीच ठार तर १५ जखमी

BREAKING – यवतमाळ -टाटा मॅजिक वाहन उलटून अपघातात…६ जण जागीच ठार तर १५ जखमी…जोडमोहा येथील घटना…

यवतमाळ : कळंब पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या जोडमोहा येथे टाटा मॅजिक वाहन उलटून अपघातात  जागीच 6 ठार तर 15 जखमी झाल्याची घटना घडली आहे.
ही घटना जोडमोहा जवळ वाढोणा खुर्द गावाजवळ हा भीषण अपघात झाला.
वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन झाडावर आदळून खोल नाल्यात पलटी झाले.
हे सर्वेजण अंत्यविधीसाठी कोटेश्वर येथून परतताना झाला अपघात झाला.
जोडमोहा येथील मय्यत बाबाराव वानखडे यांची राख शिरवण्यासाठी सर्व जण कोटेश्वरला गेले
होते.
या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गंभीर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात

 

रीपोर्टर ,सचिन मेश्राम मारेगाव

भर वस्तीत भरधाव कार उलटून एक ठार, तीन जखमी अँकर:- जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरात संदयाकाली भरधाव असलेली सिफ्ट कार चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात पडल्यानं झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण यात जखमी झाले आहे.

 

भर वस्तीत भरधाव कार उलटून एक ठार, तीन जखमी

जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरात संदयाकाली भरधाव असलेली सिफ्ट कार चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात पडल्यानं झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण यात जखमी झाले आहे.

जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरात संदयाकाली भरधाव असलेली सिफ्ट कार चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात पडल्यानं झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण यात जखमी झाले आहे.