Sat. Sep 24th, 2022

स्वास्थ्य

इंजापूर येथे अंगणवाडीत निकृष्ट दर्जाची केळी वाटप,, कारवाईची मागणी

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

इंजापूर येथिल अंगणवाडी केंद्रात आज दिनांक 5 मार्च ला केळी वाटप करण्यात आली त्यात सडलेली निकृष्ट दर्जाची केळी वाटप करण्यात आली ,
आदीवासी पेसा गावात ए पी जे अब्दूल कलाम पोषण आहार योजनाच्या नावाखाली निकृष्ठ केळी देण्यात येत आहे ,ही मोठी गंभीर बाब आहेत,अंगणवाडी सेविका सो मीराबाई चिंचोलकर व मदतनीस सो गीता पिंगे यांनी ही केळी वाटप केल्याचे समजते,हा प्रकार नेहमीस सुरू आहे असे गावकऱ्यांनी सांगितले,याच गावातील कमळ रामा पेंदोर ,धनेश्वर धुर्वे ,कविता काबडे , रुखमाबाई राऊत , यांनी याची माहिती युवक कांग्रेस चे राजुरा विधानसभा महासचिव विलास मडावी यांना दिली त्यानी सदर अंगणवाडी केंद्राला भेट दिली , असता निकृष्ठ केळी आढळून आली,इंजापूर येथिल लोकांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे हा प्रकार लहान मुलांच्याआरोग्य वर तसेच गरोदर माता च्या आरोग्य वर परिणाम करणारा असून यातील दोषींवर कार्यवाही करून निलंबीत करण्याची कार्यवाही करावी अशी ग्रामग्रस्तांची मागणी आहे

सुसाट वेग भेटतोय जीवावर: दरवर्षी तीनशेपेक्षा जास्त मृत्यू

 

यवतमाळ : लवकर पोहोचण्यासाठी वाढविण्यात येणारा वाहनाचा वेग जिवावर बेतत आहे. रस्त्यावर होणार्‍या अपघातांत जिल्ह्यात वर्षाला 350 च्या आसपास मृत्यू होतात.

गेल्या काही वर्षांत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्तेही चकाचक झालेले आहेत. त्यामुळे वाहनचालक कोणतीही पर्वा न करता भरधाव वाहने चालवितात. निष्काळजीपणामुळे आपला किंवा दुसर्‍या व्यक्तीचा जीव जाईल, याचा विचार करीत नाहीत.

बहुतांश चालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. हेल्मेट अपवादानेच वापरले जाते. जास्तीत जास्त मृत्यू हे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानेच होत असल्याचे वास्तव आहे. महामार्गाचे रुंदीकरण झाल्यापासून सिमेंट रोडवर होणार्‍या अपघातांत डोक्याला दुखापत होऊनच मृत्यू होत असल्याचे पोलिस सांगतात. सन 2018 या वर्षात एक हजार 401 अपघात झाले. त्यात 350 जणांचे मृत्यू झाला. 2019मध्ये झालेल्या एक हजार 48 अपघातांत 366 मृत्यू झाले. आपला आणि दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षित वाहन चालवण्याला प्राधान्य द्यायला पाहिजे.

घाटंजीत व्यसन मुक्ती रँलीने नवीन वर्षाचे केले.स्वागत

थर्टिफस्टच्या दारु पार्ट्यानां शातंता मार्गाने विरोध करून घाटंजीत व्यसन मुक्ती रँलीने नवीन वर्षाचे केले.स्वागत

 

घाटंजी शहरात जून्या वर्षात प्राऊटीस्ट ब्लाँक ईडीया चे नेत्रुतवात व्यसनमुक्त रँली काढून थर्टीफस्ट च्या रात्री दारू पिऊन केला जानारा धिगांना रोखण्या साठी शातंता.मार्गाने नव वर्ष साजरे करण्याचे नागरीकांना आव्हाण करण्यात आले

प्राऊटिस्ट ब्लाँक ईडीया च्या नेत्रुर्वात या शाळकरी मुलांची भव्य रँली काढून नशामुक्ती वीषयाचे घोषणा करुन जनजागरण करण्यात आले या र्यालीमध्ये संघमीत्रा व प्रिय दर्शनी मुलींचे वसतीग्रुह समर्थ वसतीग्रुह . सिधार्थ वसतिग्रुह . एस पि एम वसतीग्रुह यांनी सहभाग घेऊन ह्या कार्यक्रमास मधुकर निस्ताने यांनी नशामुक्ती साठी जनतेस मोलाचे मार्गदर्शन आपल्या मुलाखतीत दीले

 

रिपोर्टर, संजय ढवळे घाटंजी
ता. घाटंजी  यवतमाळ

वीद्यार्थानां दीले जात आहे वीवीध माध्यमाची थेरी आणी प्राक्टीकल प्रशिक्षण

 

 

 

घाटंजी येथील एस पी एम गीलानी महावीध्यालयातील विध्यार्थानां शाळेच्या अभ्यास क्रमा व्यतिरीक्त जसे क्रुषि ऊत्पन्न बाजार समीती . हाँरटीकलचर . ईलेकट्रानीक. शेती वीषयक ईत्यादी विषयाची माहीती ही प्रत्येक आँफीसला भेटी देऊन थेरी आणी प्राक्टीकल च्या रुपातून विद्यार्थानां दीली जात आहे घाटंजी क्रुषी मार्केट ला विध्यार्थानां क्रुषी मार्केट चे अधीकारी यांनी शेतकर्याचां शेतीमालाचा हर्रास कश्या पध्दतीने केल्या जाते ह्याचे प्रात्यक्षीक करून दाखवीले शाळेचे प्राध्यापक श्री डोहळे सर काँटन मार्केट चे अधीकारी यांनी अथक परीश्रम घेऊन विध्यार्थानां मार्गदर्शन केले

 

प्रतिनीधी संजय ढवळे घाटंजी  यवतमाळ

जी .यवतमाळ

योगामुळे उत्तम आरोग्य ,उत्तम उर्जा

आ.संजय राठोड : 38 व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन: 700 योगापटूंचा सहभागयवतमाळ : भारताने जगाला दिलेली उत्तम देणगी म्हणजे योगा आहे. या योगामुळे आपल्याला उत्तम आरोग्य ,उत्तम उर्जा ,उत्तम उत्साह आणि उत्तम शरीर प्राप्त होते. म्हणून प्रत्येक विद्यार्थी व व्यक्तीने दैनंदिन रूपात योगासन करावे व उत्तम जीवन जगावे, असे प्रतिपादन 38 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पर्धेच्या

उद्घाटन प्रसंगी आ.संजय राठोड यांनी केेले. बृहन महाराष्ट्र योग परिषद ,सत्चिकित्सा प्रसारक मंडळ यवतमाळ व यवतमाळ जिल्हा योग परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धा यवतमाळ येथील सत्यसाई क्रीडारंजन सभागृह डॉ.नंदुरकर विद्यालय येथे दि.14 ते 15 डिसेंबर घेण्यात येत आहे.या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला .या उद्घाटन सोहळयाप्रसंगी उद्घाटक म्हणून आ.संजय राठोड, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.प्रकाश नंदुरकर ,डॉ.अरूण खोडस्कर, सतीष मोहगावक, प्रा.शशिकांत येवतकर ,पांडुरंग खांदवे, वसंतराव घुईखेडकर ,शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,जि.प.सदस्या रेणूताई शिंदे , प्राचार्य एस.एन.तिवारी,दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते डॉ.उल्हास नंदुरकर,डॉ.प्रियंका धवणे,यवतमाळ जिल्हा योग परिशदेचे सचिव प्रा.डॉ.साहेबराव साखरे आदि मान्यवर उपस्थित होते.

अखेर मारेगाव रुग्णालयात 108 रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध

 

 

प्रहार संघटनेच्या प्रयत्नांना यश,
मारेगावचे ठाणेदार जगदीश मंडलवार ह्यांचा संघटनेने केला सत्कार…!!
-सचीन मेश्राम
मारेगांव ग्रामीण रूग्णालयाची108 रूगवाहिका बनली शेंभेची वस्तु ह्या आशयाच्या बातम्या माध्यमातून मांडल्या व दखल न घेतल्यास उपोषणास बसणार असा इशारा देण्यात आला. बातमीचा हवाला देत कायदा व सुव्यवस्था उपोषणास बसल्यास भंग होईल ह्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी ह्यांची राहील. परिणामी सहाव्या दिवशी येथे रुग्णवाहिका 108 वर डॉक्टर रुजू झाले.

या बातमीला tv indiaच्या दुजोरा दिला आहे.
ग्रामीण भागात ही रुग्णवाहिका अत्यंत प्रभावी असून चार महिन्यापासून प्रलंबित काम केवळ सहा दिवसांत झाले. जिल्हा आरोग्य अधिकारी ह्यांनी हया कामाला प्राधान्य देऊन मारेगाव येथे डॉक्टर उपलब्ध करून दिला. त्यांचे सुद्धा संघटनेने आभार मानले असून मारेगाव येथील ठाणेदार जगदीश मंडलवार व जमादार राहुल ओंबे यांचा सत्कार ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सहसचिव भैय्यासाहेब ठमके ह्यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी.आपल्याकडे असलेले काम जवाबदारी म्हणून करीत असताना बाहेरील कार्य जर करता आले तर अधिक महत्वपूर्ण आहे. असे मत सत्काराला उत्तर देताना ठाणेदार जगदीश मंडलवार ह्यानी व्यक्त केले. मारेगाव ग्राहक प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम ह्यांचे अभिनदंन ठाणेदार जगदीश मंडलवार ह्यांनी केले. वारंवार स्थानिक विषय संघटनेच्या व tv india न्यूजच्या माध्यमातून चव्हाट्यावर मांडल्याबाबत त्यांच्या कामाची दखल घेत हा सत्कार करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ.राजेंद्र आत्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ह्यांनी केले. मारेगाव तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम यांनी प्रास्ताविक केले तर आभार जिल्हा संघटक बंडू भाऊ लवटे ह्यांनी मानले.

या कार्यक्रमाला जिल्हा कार्याध्यक्ष दामोधर बाजोरीया, उपाध्यक्ष यशवंत काळे, कोशाध्यक्ष सुनील धवने, सहसचिव भैय्यासाहेब ठमके, पाटनबोरी सर्कल प्रमुख जयवंत बावणे, झरी जामनी सर्कल प्रमुख मनोहर गेडाम, राळेगाव सर्कल प्रमुख दिलीप वाढई, घाटंजी सर्कल प्रमुख कृतनजय देशपांडे, आर्णी चे अध्यक्ष शेख सत्तार शेख रज्जाक, शिबला सर्कल प्रमुख धनराज तिरमनवार, पांढरकवडा तालुका उपाध्यक्ष सज्जन सोयम, मारेगाव तालुका सचिव सचिन काकडे, मारेगाव उपाध्यक्ष अनंत गोवर्धन, मारेगाव सहचिव पंकज नेहारेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित

 

रिपोर्टर सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ

रास्तभाव दुकानदारा विरोधात जांब येथील महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

 यवतमाळ :दि. १४ जांब येथे असलेल्या रास्तभाव दुकानदार माल देत नसल्याचा आरोप करत महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. रास्तभाव धान्य दुकानातील कार्ड कमी करुन ती दुसऱ्या रास्तभाव दुकानाला जोडण्यात यावी, अशी मागणी महिलानी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

 

 

जांब येथील ज्या परवानाधारकाकडे नोंदी आहेत. ते रास्तभाव दुकानदार साहित्य देत नाही. संबंधित रास्तभाव दुकानदार माल काळयाबाजारात नेत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीे होती. तरी परवाना निलंबित करण्यात आला नाही. अशा रास्तभाव दुकानदाराकडील कुपनाची नोंद काढून गावातील दुुसऱ्या रास्तभाव दुकानदाराकडे ती करण्यात यावी, सदर दुकानदार उद्धट वागणूक देतो, असा आरोप महिलांनी केला. या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. यावेळी बैठकीसाठी आलेले आमदार मदन येरावार यांनी महिलांसोबत भेट घेतली. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले.यावेळी जांब येथील अनेक महिला उपस्थित होत्या. महिलांनी रास्तभाव दुकानदार विरोधात आरोप केले, त्याचीही दखल घेण्याची मागणी केली.

रिपोर्टर संजय राठोड यवतमाळ

मुख्यमंत्री : यांच्या हस्ते एंडोस्कोपी ऑन व्हील्स म्हणजेच फिरत्या पोटविकार केंद्राचे उद्घाटन

मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे यांनी आज विधानमंडळाच्या प्रांगणात एंडोस्कोपी ऑन व्हील्स म्हणजेच फिरत्या पोटविकार केंद्राचे उद्घाटन केले.अमित मायदेव जी यांच्या संकल्पनेतली फिरती वैद्यकीय व्हॅन गरीब व गरजू रुग्णांना पोटविकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार देईल असे त्यांनी सांगितले या केंद्रात अद्ययावत सोयी सुविधांनी सज्ज

ऑपरेशन थिएटर आहे तसेच व्हॅनमधील २ तज्ज्ञ डॉक्टर आणि टेक्निशियन रुग्णांना वैद्यकीय सुविधा देतील. एच-पायलोरी, कॅन्सरचे निदान, आतड्यांचे अल्सर, बायोप्सी, अॅसिडिटीची तपासणी आणि इतर वैद्यकीय सुविधा या केंद्राच्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहे. रुग्णांचे निदान तत्काळ व्हावे आणि उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सोयी सुविधा त्यांना मोफत मिळाव्यात यासाठी ‘एंडोस्कोपी ऑन व्हील्स’ ची सुरुवात करण्यात आली असून राज्यभर हे केंद्र फिरणार आहे.

 

मुंबईत १० रुपयांत शिवथाळी अगोदर माऊली थाळी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० रुपयांत पोटभर जेवण देण्याची घोषणा निवडणुकीपूर्वी केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकारच्या १० रुपयांच्या थाळीची प्रतीक्षा असताना शिवसेनेनं माऊली थाळी सुरू केली आहे. मुलुंडचे शिवसैनिक जगदीश शेट्टी यांनी रयत माऊली अन्न रथाच्या माध्यमातून दहा रुपयात थाळी उपलब्ध करून दिली आहे. यात वरण भात, चपाती भाजी असं या थाळीचं स्वरुप आहे.

येत्या काळात राज्यात सगळीकडं १० रुपयांची शिवथाळी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

१० रुपयातली शिवथाळी लोकप्रिय होईल यात वाद नाही. पण ही शिवथाळी झुणकाभाकरच्या मार्गानं जाऊ नये अशी सर्वसामान्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

ग्रामीण भागात हागणदारीमुक्त अभियानाचा फज्जा, गावच्या गावांना स्वच्छतेचे वावडे

यवतमाळ : हागणदरी मुक्त अभियान सुरू होण्यापूर्वी गावागावात सर्रासपणे रस्त्याच्या कडेलाच उघड्यावर नैसर्गिक विधी कळविण्यात येत होती. या मोहिमे विरुद्ध शासनाने गंभीर पावले उचलीत हागणदारी मुक्त गाव करण्याचा विडा उचलला.लाखो-करोडो रुपये शासनाने या योजनेवर खर्च केलीत. परंतु आजही तालुक्यातील गावागावात कोणत्याच प्रकारचा बदल झालेला दिसून येत नाही.
हागणदारी मुक्त गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या गावात ह्या योजनेचा फज्जा उडालेला दिसून येतो.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे केवळ फलकावरच हागणदारीमुक्त गावे शिल्लक राहिलेली आहेत. प्रत्यक्षात वेगळेच वास्तव्य असून पूर्वीपेक्षाही भयावह चित्र पाहावयास मिळत आहेत.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रामीण भागात हागणदारीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे भयावह चित्र पहावयास मिळत आहे. हागणदरी मुक्त गाव म्हणून शासनाने काही गावांना पुरस्कृत करून पुरस्कारही दिलेली आहेत. सचिव सरपंच यांना सन्मानित ही करण्यात आलेले आहे. हे मानसन्मान फक्त गावच्या फलकावरच शिल्लक राहिलेली आहेत.
ग्रामीण भागात सकाळच्या प्रहरी गावकरी मनसोक्त रोडच्या कडेलाच सकाळची विधी उरकवित असल्याचे विदारक दृश्य दिसून येते. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे फलका पुरतीच हागणदारीमुक्त अभियानाची शोभा शिल्लक राहिली असल्याचे गावागावातील वास्तविक परिस्थितीची पाहणी केली असता दिसून येते.
गावचे सरपंच सचिव यांनाच स्वच्छतेचे वावडे असल्याचे वास्तव्य हागणदारीमुक्त पुरस्कार प्राप्त गावात दिसून येत आहेत. हागणदारी मुक्तीचा पुरस्कार घेऊनी फज्जा उडविणाऱ्या गावचे सरपंच, सचिव यांना शासनाने जाब विचारून त्यांचेवर कठोर कार्यवाही करून परत हागणदारी मुक्त गाव अभियान यशस्वी रित्या राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत अशी मागणी शासनाने पुरस्कृत केलेल्या गावातील सुज्ञ नागरिकांकडून केल्या जात आहे.

रिपोर्टर , राम राठोड पुसद