Sat. Sep 24th, 2022

राजनीति

ब्रेकिंग न्यूज : भाजपा युवा मोर्चा यवतमाळ च्या वतीने दारव्हा येथे नगडा बजाव आंदोलन

यवतमाळ : पूजा चव्हाण हिला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने दारव्हा येथे नगाडा बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दारव्हा हा संजय राठोड यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़.

आकाश धुरट,
भाजप युवा मोर्चा, पदाधिकारी, यवतमाळ.

ब्रेकिंग न्यूज : पूजा चव्हाणच्या आई,वडील आणि बहिणीनी घेतली मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट !

या प्रकरणी विरोधी पक्ष गलिच्छ राजकारण करत असून पूजा चव्हाण हिचे आई-वडील आपल्याला भेटले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या भेटीत त्यांनी माझ्याकडे एक पत्र दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या पत्रात पूजाच्या आई-वडिलांनी घेतलेल्या भूमिकेची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
यावेळी पूजाच्या आई-वडिलांनी दिलेल्या पत्राने संपूर्ण प्रकरणाला मिळाली कलाटणी !

 

भाजप युवा मोर्चा पदाधिकार्‍यांनी वनमंत्री राठोड यांना दाखविले काळे झेंडे ; पूजा चव्हाणला न्याय देण्याची मागणी

 

यवतमाळ : पंधरा दिवसापासून सातत्याने चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवी येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर धामणगाव देव येथेही दर्शन घेतले. तेथून ताफ्यासह यवतमाळ शहरात येत असताना मृत पूजा चव्हाण हिला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चासह महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी वनमंत्री संजय राठोड यांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविला. त्यामुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.

वनमंत्री संजय राठोड ताफ्यासह पोहरादेवीसाठी निघाले

 

यवतमाळ : मागील पंधरा दिवसांपासून नॉट रीचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड आज सकाळी साडे नऊ वाजता एमएच 04 एफबी 567 क्रमांकाच्या वाहनात बसून पोहरादेवीसाठी ताफ्यासह निघाले. पोहरादेवी बंजारा समाजाची काशी असून, तेथे 11 वाजता दर्शन घेऊन वनमंत्री संजय राठोड समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत. नेमके काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आर्णी दिग्रस मार्गे जाणार असून पोहरादेवी येथे दर्शन घेऊन दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे मुंगसाजी माऊलीचे दर्शन घेऊन यवतमाळला वनमंत्री राठोड परत येणार आहेत.

घाटंजी तालूक्यातिल पंच्यायतिचे संरपंच उपसंरपंच निवडीत ससानी येथील लोकांनी केला राडा 33 लोकांवर गुन्हे दाखल

घाटंजी तालूक्यातिल ससानी ग्राम पंचायत मध्ये संरपंच व उपसंरपंच पदची निवड मंडोले अधीकारी याच्यां मार्गदरशनाखाली चालू असतांना संरपंच व ऊपसंरपंच पदाचे फार्म दीलीप नगराळे यांनी 11. 15 वाजे च्या दरम्यान अधीकारी मंडोले याच्या स्वाधीने केला असता पोच पावती देण्यात आली पण फार्म वर सूचक आणी ऊमेद्वारा ची सहीच नसल्याची बाब ऊमेद्वारांना लक्षात आल्यावर वेळ निघून गेली मंडोले साहेबानी पाऊन तास

फोन वरच बीझी असल्याचा आरोप दीलीप नगराळे यांनी केला आहे . अमेद्वार व गावकर्यानी ग्राम पंच्यायत आँफीस मध्ये एकच राडा करण्यात येवून आँफीसरांचे हजेरी रजीस्टर कामकाज रजीस्टर मोबाईल नाम निर्देशन फार्म आणी जिल्हा अधीकारी व तहसीलदार यांच्या आदेशाच्या फाईली आणी ईतर फाईली गर्दीतिल लोकांनी केल्या गायब याची रितसर तक्रार तहसीलदार ठाणेदार यांना.करण्यात आली असता पुढील आदेशा पर्यतं निवड कार्यक्रम रद्ध करण्यात आला पुढील कार्यव्हाई घाटंजी पोलीस करीत आहे 353 395 143 147 149 188 279 270 135 7 /अ

प्रतिनीधी संजय ढवळे घाटंजी

पंधरा दिवसात भरपाई न दिल्यास पिकविमा कंपणीला घेराव खा. भावनाताई गवळी यांचा अंतिम इशारा

 

अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्हयातील शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबिनचा तर लागवड खर्च सुध्दा निघणे कठीन झाले आहे. अशा परीस्थितीत पिकविमा कंपण्यांनी बोटावर मोजण्याइतक्यात शेतक-यांना पिकविमा दिला आहे. जिल्हयातील सर्वच शेतक-यांचे प्रचंड नुकसान झालेले असल्यामुळे विमा काढलेल्या सर्व शेतक-यांना पिकविमा नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा पिकविमा कंपणीला घेराव घालू असा इशारा खासदार भावनाताई गवळी यांनी दिला आहे.

कोरोना मुळे राज्याचीच नव्हे तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कोरोना पाठोपाठ अतिवृष्टी चे संकट आले. शेतकऱ्यांच्या शेतातील फळे, भाजीपाला इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर संततधार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर जमिनीवरील सोयाबीन, धान, मका, कापूस, ज्वारी, तूर, या पिकांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने तर कहरच केला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिकही परतीच्या व ढगफुटीच्या पावसाने नष्ट झाले. शेतकरी हा नैसर्गीक आपत्ती ओढवल्यास आर्धिक मदत मिळावी व झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी या करीता पीक विमा काढत असतो. यवतमाळ जिल्ह्यातील 4 लाख 67 हजार 21 शेतक-यांनी प्रधानमंत्री पिकविमा काढला आहे. या करीता केन्द्र शासन, राज्य शासन तसेच शेतक-यांनी इफको टोकीयो विमा कंपणीकडे 35 कोटी 75 लाख 1 हजार 251 रुपयांचा विमा हप्ता भरला. संपुर्ण जिल्हयात शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले असतांना विमा कंपणीने मात्र फक्त ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करणा-या फक्त 9 हजार 547 शेतक-यांनाच विम्याला लाभ दिला आहे. वास्तविक एवढा मोठा जिल्हा असतांना विमा कंपणीने सोळा तालुकयात फक्त 100 प्रतिनिधी सर्वेक्षण करण्याकरीता नेमणूक केली. त्यामुळे लाखो शेतकरी नुकसानीचा दावा दाखल करु शकले नाही. विशेष म्हणजे यवतमाळच्या कृषी विभागाने सुध्दा जिल्हयातील साडे चार लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधीत झाल्याचा अंदाज प्राथमिक सर्वेक्षणात नोंदविला आहे. त्यामुळे या सर्व शेतक-यांना पिकविमा नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी केली आहे. या सर्व शेतक-यांना पंधरा दिवसाच्या आत पिकविमा नुकसान भरपाई न मिळाल्यास पिकविमा कंपणीला घेराव घालण्याचा इशारा खासदार भावनाताई गवळी यांनी दिला आहे.

पिकविमा कंपणीला घेराव

शेतक-यांना पिकविमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी पिकविमा कंपणीचे अधिकारी तसेच कृषी विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली होती. यानंतर 9 हजार 547 शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. प्रत्यक्षात लाखो शेतक-यांचे नुकसान झाले असतांनाही त्यांना पिकविम्याचा लाभ मिळालेला नाही. नियमांवर बोट ठेऊन टाळाटाळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतक-यांना सोबत घेऊन पिकविमा कंपणीला घेराव घालण्याचा आमचा निर्णय आता पक्का झाला आहे.

भावनाताई गवळी
खासदार यवतमाळ-वाशिम

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजपचा पराभव मोदी विरूध्द जनमत – किशोर तिवारी

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांना शेतकरी नेते व महाराष्ट्राच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे राज्य मंत्री दर्जा प्राप्त अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पुन्हा एक खुले पत्र लिहीले आहे. या पत्रात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील पदवीधर व शिक्षक मतदारसंघात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव म्हणजे पंतप्रधान नरेन्द मोदी विरूध्द जनमत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे किशोर तिवारी यांनी मोदीजींच्या कारभारावरून सहा ज्वलंत प्रश्न या प्रत्रात उपस्थित केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. परंपरागत मतदार संघात सुसंस्कृत शिक्षित लोकांत झालेला दारुण पराभव म्हणजे मोदी यांचे धोरणाविरोधात एक व्यापक लाट दिसून येत असल्याचे तिवारी यांनी सप्रमाण विशद केले आहे.

आपल्या मुद्देसूद पत्रात तिवारी यांनी म्हंटले आहे की राष्ट्राच्या आणि विशेषत: महाराष्ट्र आणि आता उत्तर प्रदेश राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षातील हे त्यांनी डॉ मोहन भागवत यांना लिहिलेले ५ वे पत्र आहे. पत्र पुढे म्हणते की “आपण माझी मते किंवा ही पत्रे सार्वजनिक करण्याच्या माझ्या हव्यासाशी सहमत किंवा सहमतही होऊ शकणार नाही, परंतु संघाचा एक जुना स्वयंसेवक म्हणून आपल्या भारत मातेप्रती असलेले राष्ट्रीय हित आणि कर्तव्य म्हणून हा माझा प्रपंच व प्रयत्न असतो, जेणे करून सर्व सामान्य लोकांच्या आणि स्वयंसेवकांच्या भावना आपणा पर्यंत आणि सर्व समाजा समोर ठेवूनच व्यापक सर्व समावेशक चर्चा होवू शकते. म्हणून कुणीही माझ्या या प्रयासास अन्यथा घेवू नये. आज हे पत्र लिहिण्याचे कारण अत्यंत गंभीर आणि आवश्यक आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकाला मधे उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन प्रमुख राज्यांमध्ये आपला व्यापक जनाधार असलेल्या सुशिक्षित पदवीधर व शिक्षक मतदारांच्या तीव्र भावना प्रतिबिंबित झाल्याबद्दल, सर्व संघ स्वयंसेवक आश्चर्यचकित झाले आहेत. यातील विशेष संदर्भ हा पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ वाराणसी – (बनारस), अलाहाबाद-झांसी, गोरखपूर (उत्तर प्रदेश) – नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि अमरावती (महाराष्ट्र), इ. ठिकाणी झालेल्या पानिपताशी आहे ”

तिवारी यांनी कटाक्ष साधताना पुढे लिहिले आहे की भारतीय जनसंघाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून हे सर्व विधान परिषद मतदार संघात परंपरागत पने निवडल्या गेलेल्या संघ परिवार स्वयंसेवकांचा महान इतिहास आणि त्यांची परंपरा प्रत्येकाला लक्षात घ्यावी लागेल. या पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद जागांद्वारे स्वयंसेवकांचा विधिमंडळात प्रवेशाचा पूर्वी एकमेव मार्ग असायचा. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील उच्च सदनात या महत्वपूर्ण जागा भाजपने गमावल्या आहेत आणि ते देखील केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूपी मधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांच्या सरकार समक्ष आणि महाराष्ट्रातही, नागपुरातील सर्वात मजबूत संघ आणि नेटवर्क असल्यानंतर ही ! वाराणसी, अलाहाबाद-झांसी आणि गोरखपूरमध्ये भाजपाचे राज्य सरकार आणि नागपूर संघ मुख्यालयाची जागा आणि पुणे आणि अमरावती येथील दोन्ही जागा केंद्रीय आणि राज्य भाजपक्षांच्या घटकांना भारी झटका आहेत. हे पदवीधर आणि शिक्षक हे विचारवंत घटक आहेत. म्हणून हे एक प्रकारे, आपण हे समजून घेतले पाहिजे की हे एक “मिनी जनमत” यूपी व महाराष्ट्राच्या सुमारे ६० लाखांहून अधिक लोकांची संख्या असलेल्या समाजातील अत्युत्तम वर्गाच्या भावनांचा नमुना सर्वेक्षण आहे. तिवारी यांनी पुढे म्हंटले आहे की माझ्या नम्र मते, हे एक आव्हान आहे, कारण हे मतदार भारतीय समाजा चा सुसभ्य वर्ग आहेत – सुशिक्षित आणि सुजाण सुधारक, तसेच कर देणारे जे नेहमीच संघ-भाजपला पाठिंबा देत आले आहेत. ते दूर जाणे फार चिंतेचे कारण जरूर असावे. यावर व्यापक मंथन हवेच असेही ते म्हणाले. या भारी दारुण पतनास “सामान्य पराभव” मानले जाऊ शकत नाही, यदपी भाजपच्या मीडिया व्यवस्थापकांनी जातीय रंग देवून खरे कारण दडपून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु काही महत्त्वपूर्ण प्रश्न उभे राहतात , ते पुढील प्रमाणे : १. या सर्वात मोठ्या ६० लाख बुद्धिजीवी सॅम्पल सर्वेक्षणातून प्रतिबिंबित झाल्यानुसार भारतीय समाजातील पदवीधर व शिक्षक या बुद्धिजीवी समाजाचा विश्वास आणि भरोसा भाजपाने गमावला आहे काय ? २. सुशिक्षित गरीब / मध्यमवर्गीय घटकांना पोळणारी पंतप्रधानांची धोरणे आणि मोठे आर्थिक संकट याचा हा परिणाम आहे का ? ३. पंतप्रधान मोदी पासून मोठ्या लोकसंख्येच्या वर्गाचा हळूहळू मोह भंग झालेला असून निष्कर्षांशिवाय उंच, पोकळ दावे, विरोधाभासी विधानांमुळे जनता आता कंटाळली आहे ? ४. भाजप केवळ अंबानी / अदानी इत्यादी मोठ्या भांडवलदारांना / कॉर्पोरेट्सना मदत करत असल्याच्या संदेशामुळे पंतप्रधानांच्या प्रतिमेला मोठे ग्रहण लागले आहे काय ? ५. खासकरुन कोविड (साथीच्या) साथीने ज्या पद्धतीने हाताळले गेले होते, त्या नंतर सामान्य जनतेला वेठीस धरून ते बरबाद होताना आपण मुक दर्शक झालो होतो काय ? ६. पंतप्रधानांच्या तथाकथित ‘जादू’ने देशाला अपयशी ठरवले आहे – विशेषत: मुक – कट्टर धर्मनिरपेक्ष हिंदू, ज्यांनी आतापर्यंत जातीयतेवरील आणि लोकसंख्येच्या घटकांना लक्ष्य बनविणाऱ्या ‘लव्ह-जिहाद ‘सारख्या अत्यंत जातीयवादी फूट पाडणा धोरणांचा पाठपुरावा केला नाही, ते आता जातीय धर्मांध शक्तींना कंटाळून भाजपला धडा शिकवत आहेत काय ? या प्रश्नावर चर्चा करावीच लागेल ! या पैलूंचे मूल्यांकन केले पाहिजे आणि संघ परिवार- थिंक टँक मध्ये गंभीरपणे विचार झाले पाहिजेत, अन्यथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपावरील प्रभाव नाहीसा होऊन एक बेछूट बेलगाम उन्माद माजण्याचा प्रकार घडेल, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.

आपल्या पत्रात त्यांनी पुढे लिहिले आहे की “माझ्या शेवटच्या पत्रांमध्ये मी स्पष्टपणे

माजी मंत्री अनिल बोंडे यांची उद्या यवतमाळ येथे पत्रकार परिषद

 

भारतीय जनता पार्टी प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष माजी मंत्री श्री डॉ. अनिलजी बोंडे* यांचे कृषि कायद्यासंदर्भात माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष नितीनजी भुतडा उपस्थित राहणार आहे. तरी आपण आपल्या वृत्तपत्रातुन आपण किंवा प्रतिनिधींना पाठवावे ही विनंती

दिनांक :- 15 डिसेंबर 2020
वेळ दुपारी 1 वाजता

 

-राजू पडगिलवार , जिल्हा महामंत्री यवतमाळ

भाजपच्या मुंबईतील बैठकीला यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित

 

यवतमाळ : भारतीय जनता पक्षाची बैठक काल मुंबईत पार पडली. या बैठकीला यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील,योगेश टिकेकर आणि ,
यवतमाळ येथून ओबीसी जिल्हाध्यक्ष सुनील समदूरकर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यावेळी उपस्थित होते.

भाजपच्या मुंबईतील बैठकीला यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित

 

यवतमाळ : भारतीय जनता पक्षाची बैठक काल मुंबईत पार पडली. या बैठकीला यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील,योगेश टिकेकर आणि ,
यवतमाळ येथून ओबीसी जिल्हाध्यक्ष सुनील समदूरकर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यावेळी उपस्थित होते.