Sat. Sep 24th, 2022

शिक्षा

पारवा येथील खून प्रकरणात दहा आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

यवतमाळ :दि.20 जिल्ह्याच्या बहुचर्चित पारवा गावातील महेश गावंडे खून प्रकरनातील 10 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आज जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.

– पारवा गावातील सरपंच नलिनी गावंडे यांचे पती महेश गावंडे यांची गावातील राजकीय आणि पूर्व वैमनस्यातून 27 मार्च 2018 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्ह्यात प्रथमच 10 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

या प्रकरणी 3000  पानांचे दोषारोपनपत्र या प्रकरणात होते. या प्रकरणचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी केला.

पीयूष जगताप,तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी

महेश ऊर्फ तुळशीराम हरिदास गावंडे , रा. पारवा यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी मृताची पत्नी नलिनी गावंडे यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून 16 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अरुण मोहोड, सरकारी वकील

मारहाणीत मृत्यू झाल्याने आरोपीला दहा वर्षे शिक्षा

यवतमाळ : दोनशे रूपयासाठी मारहाण केल्याने व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी आरोपीला दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. काल बुधवारी हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायीाश के. आर. पेठकर यांनी दिला.

किशोर वाकू ईव्हने वय 32, रा. सकादई, जि. बैतुल, मध्यप्रदेश असे आरोपीचे नाव आहे. वैभव रोहणकर याचा मारहाणीत मृत्यू झाला होता. 17 मार्च 2019 रोजी दुपारी अडीच वाजता वीरेंद्र चव्हाण व वैभव विनोद रोहणकर रा. अर्जुननगर, अमरावती हे दोघे मजुरांना पैसे देण्यासाठी राजुरवाडी येथे गेले होते. कवडू मारवाडे यांच्या शेतात असलेल्या कोठ्यामध्ये पोहोचले. तेथे मजूर असलेला किशोर इव्हने याने केवळ दोनशे रूपयासाठी वीरेंद्र चव्हाण याच्याशी वाद सुरु केला. हा वाद सोडविण्यासाठी वैभव रोहनकर गेला असता, आरोपीने पोळी लाटण्याचा पोळपाट छातीवर फेकून मारला. त्यामुळे तो खाली पडला. रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी वैभवला मृत घोषित केले. या प्रकरणी वीरेंद्र चव्हाण याने घाटंजी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप मसराम यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविस्ट केले. सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. पुरावे ग्राह्य मानून कलम 304 भाग-दोन अंतर्गत दहा वर्षांची सक्त मजुरी, पाचशे रूपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नरेंद्र पांडे यांनी काम बघितले.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय

माजी अर्थमंत्री तथा बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयात नव्‍याने उभारण्‍यात आलेल्‍या सैनिकी शाळेत मुलींना वर्ग सहावी करिता प्रवेश देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेण्‍यात आला आहे. सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्‍याचा हा निर्णय देशातील फक्‍त दोन शाळांकरिताच घेण्‍यात आला असून महाराष्‍ट्रात चंद्रपूर जिल्‍हयातील सैनिक शाळेसाठी हा निर्णय घेण्‍यात आला आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने वर्ष 2020 करिता मुलींना सैनिकी शिक्षण मिळण्‍याविण्‍याची दारे खुली झाली असून आता चंद्रपूर जिल्‍हयातील सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्‍यात येणार आहे. केंद्र सरकारने मुलींसाठी प्रथमच सैनिकी शाळेत प्रवेश देणे सुरू केले आहे. पश्चिम दक्षिण भारतात चंद्रपूर येथील सैनिकी शाळेपासुन ही सुरूवात होत आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयात अत्‍याधुनिक स्‍वरूपाची सैनिकी शाळा चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावर विसापूर गावानजिक उभारण्‍यात आली असून या सैनिकी शाळेत आता मुलींना सैनिकी शिक्षण घेण्‍याची मिळालेली संधी सुधीर मुनगंटीवार यांच्‍या महत्‍वपूर्ण पुढाकारांपैकी एक मानला जात आहे.

भोईसमाज कला गौरव पुरस्काराने प्राध्यापिका कुमारी राखी मेश्राम सन्मानित

नागपुर- नुकताच
डिसेंबर रोजी नागपूर येथे शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या समाजातील गुणवंताचा सत्कार समारंभ भोई गौरव मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आला या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य एकनाथ काटकर कोल्हापूर, प्रमुख अतिथी सहकार भारती राष्ट्रीय मत्स्य प्रकोष्ठ माननीय प्रकाश लोणारे

नागपूर, अर्थ व सांख्यिकी सहसंचालक नागपूर येथील प्रकाश डायरे, नलदमयंती मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष मा वासुदेवराव सुरजुसे माननीय चंद्रकांत लोणारे ,अर्जुन भोई नारायण अमझरे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते कला व सांस्कृतिक क्षेत्रात भोई समाजाचे नाव उंचावल्या बद्दल धामणगांव रेल्वे येथील प्राध्यापिका कुमारी राखी बाबूलाल मेश्राम यांना “भोई समाज कलागौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

प्राध्यापिका कुमारी राखी मेश्राम यांनी अभिनय नृत्य व सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी केली असून ,त्या समाजासाठी भूषण ठरत आहेत. पुढे त्यांना चित्रपट व अभिनय क्षेत्रात नावलौकीक करायचं असून भोई समाजाचे नाव सर्वत्र करायचे आहे ,अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारताना प्रा. राखींनी व्यक्त केली. हा पुरस्कार मिळाल्यामुळे भोई समाजात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बाल सप्ताह समारोप प्रत्येक बालकाला सर्वागीण विकासाची समान संधी मिळावी : पुष्पलता वाघ

चंद्रपूर : बालहक्क कायद्यानुसार मुलांना जगण्याचा आणि समतोल आहार मिळण्याचा अधिकार असून संयुक्त राष्ट्र संघातर्फे 1989 साली ” बालहक्क संहिता ” तयार करण्यात आली त्या घटनेला 20 नोव्हेंबर रोजी 25 वर्षे पूर्ण झालीत याच अनुषंगाने बालकांच्या न्यायिक हक्कासाठी बाल सप्ताहाचे आयोजन करुन विविध कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था, वाशिम व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ, मुंगळा यांच्या सहयोगाने आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील कार्यक्रमात एपीआय मालेगाव पोलीस स्टेशन पुष्पलता वाघ यांनी बालहक्काविषयी मत मांडले. बालकांची मूळ संकल्पना ही काही मानवी हक्कापेक्षा वेगळी नाही. समाजामध्ये मुलेही अजाण आणि परावलंबी असल्यामुळे बालकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येक व्यक्तीची असून बालकाला सर्वागीण विकासाची समान संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे मत नोंदवून बालकांच्या कायदेविषयक बाबीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला मालेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक तानाजी गव्हाणे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम राऊत, संचालक बबनराव वायकर , श्री मोरेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील खडसे, मुंगळा बिटचे जमादार संजय पिंपळकर यांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू युवा मंडळाचे नंदकिशोर वनस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन एन.के. बाविस्कर यांनी केले. तर आभार राजरत्न संस्थेचे विनोद पट्टेबहादूर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीसाठी किशोर राऊत, विकास पट्टेबहादूर ,नितीन अढाव, समाधान कर्डिले , विलास सोनोने, अनिल वाघ, अशांत कोकाटे, मनोज वनस्कर, आकाश खडसे, किरणताई गिर्हे, महादेव क्षीरसागर, वर्षा वाघ, स्नेहा क्षीरसागर, कांचन सहस्त्रबुध्दे, पायल अढाव, श्री मोरेश्वर विद्यालय शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.