Sat. Sep 24th, 2022

खेल

यवतमाळ येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा चे उदघाटन

आज यवतमाळ येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा चे उदघाटन करताना मा पालकमंत्री तथा वनमंत्री व भूकंप पुनवर्सन मंत्री संजय राठोड साहेब,विभागीय आयुक्त पियुष सिंह,जिल्हाधिकारी यवतमाळ देवेंद्र सिंग, सहायक जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते पोलिस अधीक्षक m एम राजकुमार व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होतेयावेळी विशेष सत्कार म्हणून भारतीय सेनेत सुभेदार म्हणून असलेले हॉकीपटू आकाश चिकटे यांचा सत्कार करण्यात आला.
सोबतच कबड्डीच्या सामन्याचे उदघाटन केले.

विदर्भ हॉकी असोसिएशनच्या सीनियर महिला नॅशनल करिता यवतमाळ हॉकी असोसिएशनचे पाच खेळाडू यांची निवड

विदर्भ हॉकी असोसिएशनच्या सीनियर महिला नॅशनल करिता यवतमाळ हॉकी असोसिएशनचे पाच खेळाडू यांची निवड मोनिका नागोसे रूपाली तिरपुडे तनवी बदकी कोमल कोतकर स्वामिनी कुलकर्णी या पाचही खेळाडूंची विदर्भ सिनियर महिला नॅशनल करिता निवड झाली आहे तरी होणाऱ्या स्पर्धा इंडिया तर्फे आयोजित केरला कोलम येथे 24 ते 1 फरवरी दरम्यान संपन्न होणार आहे तसेच यवतमाळ जिल्हा हॉकी असोसिएशनचे पाच खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले आहे अभिनंदन करताना यवतमाळ जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश नंदुरकर सचिव मनोहर भटकर उपाध्यक्ष मनोज इंगोले सहसचिव देवेंद्र पिरिया हॉकी मार्गदर्शक शाहेद सय्यद अविनाश जोशी धनंजय शेकदार अतुल येवले पूजा भोयर गौरव निंबाळकर सुरज तसेच सगळे असोसिएशनचे पदाधिकारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले

तानाजी चित्रपट करमुक्त करा: प्रहार जनशक्तीपक्षाची मागणी

 

यवतमाळ:दि.16 तानाजी हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली. मागणीचे निवेदन आज नायब तहसीलदार यांना देण्यात आले.

VID-20200116-WA0003

छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि स्वराज्यावर आपला जीव ओवाळून टाकणाऱ्या मावळयांपैकी ‘तानाजी मालुसरे’ एक व्यक्ती आहे. त्यांनी घरात मुलाचं लग्न असतानासुद्धा प्रथम प्राधान्य स्वराज्यासाठी दिले. त्यांनी केलेला पराक्रम, त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या विरतेची गाथा नव्या पिढीला अवगत व्हावी, यासाठी हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहणे गरजेचे आहे. तेव्हा अधिकाधिक लोकांनी हा चित्रपट पहावा याकरिता ‘तानाजी’ हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, असे निवेदन दिग्रस येथील नायब तहसीलदार यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आले. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये वडगाव शाळेचे सुयश

कोरपना तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा नुकतीच झाली त्या मध्ये जिल्हा परिषद शाळा, वडगाव ने घवघवीत यश संपादन केले,
माध्यमिक विभाग मुलींचा खो-खो प्रथम क्रमांक ,समूह गायन प्रथम क्रमांक, वैयक्तिक गायन प्रथम क्रमांक, प्राथमिक मुले लांब उडी उंच उडी 100 मीटर दौड प्रथम क्रमांक माध्यमिक मुले लांब उडी उंच उडी प्रथम क्रमांक थाळीफेक व गोळा फेक द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे यामध्ये सहभागी सर्व विजेत्या खेळाडूंचे शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक पांडुरंग बुरांडे यांनी स्वागत केले तर यशस्वीतेसाठी माध्यमिक विभागाचे क्रीडा प्रमुख शिवाजी माने आणि प्राथमिक विभागाचे क्रीडा प्रमुख अनिल राठोड यांनी प्रयत्न केले यशस्वीतेसाठी रामचंद्र रासेकर अशोक पडाल सुरेश टेकाम नितीन जुलमे यांनी प्रयत्न केले विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांनी कौतुक केले

रिपोर्टर ,मनोज गोरे चंद्रपूर

कच्छी मेमन जमात चे आयोजन यवतमाळात अखिल भारतीय क्रिकेट चे रात्रकालीन सामने

कच्छी मेमन जमात व यंग मेमन जमात यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ऑल इंडीया मेमन जमात फेडरेशन यांच्या सहकार्याने यवतमाळात रात्रकालीन टेनिस बॉल प्रिमीअर लिग सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सामने खेळण्यासाठी देशभरातून तब्बल 24 टिम यवतमाळात येत असल्याची माहिती कच्छी मेमन जमात यवतमाळ चे अध्यक्ष अशरफ फाजलानी यांनी पत्रकार परीषदेत दिली.

दिनांक 30 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 4 वाजता समता मैदान पोस्टल ग्राऊंड येथे नगराध्यक्षा कांचनताई चौधरी यांच्या हस्ते सामन्यांचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून हारुनभाई जीरावाला उपाध्यक्ष, विदर्भ मेमन जमात, सुभाष भाऊ राय, उपाध्यक्ष नगर परीषद, यवतमाळ, अनिरुध्द बक्षी, उपविभागीय अधिकारी, यवतमाळ, धनंजय सायरे, ठानेदार यवतमाळ, बाळासाहेब चौधरी माजी नगराध्यक्ष यवतमाळ, मुकूंद कुळकर्णी पोलिस निरीक्षक, सचिन लुले, ठानेदार लोहारा पोलिस स्टेशन, युसूफ भाई सलाट, कोषाध्यक्ष विदर्भ मेमन जमात, प्रो. अतिक मालाणी, प्रोफेसर, आयआयटी मुंबई, अडव्होकेट इमरान देशमुख, मक्की सेठ घाची, उपाध्यक्ष मेमन जमात यवतमाळ, अन्वरसेठ लोधा कार्यकारी अध्यक्ष, मेमन जमात यवतमाळ, इकबाल भाई नूर, विभागीय सचिव, अखिल भारतीय मेमन जमात फेडरेशन हे उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे यु टयुब वर प्रसिध्द असलेले गोट्या अम्पायर हे उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. हे सामने दिनांक 30 डिसेंबर ला सुरु होत असून 3 जानेवारी 2020 ला या सामन्यांचा समारोप होणार आहे. यवतमाळच्या मेमन जमात ने सन 2015 मध्ये विदर्भ स्तरीय त्यानंतर सन 2017 मध्ये राज्यस्तरीय आणि आता राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे. देशभरातील 24 टिम यवतमाळात येत असल्याने दर्जेदार क्रिकेटचे सामने यवतमाळकरांना बघायला मिळणार आहे. यासाठी आवश्यक उच्च दर्जाचे मैदान, पीच, पॅव्हेलिअन, डग आऊट तयार करण्यात आले आहे. कच्छी मेमन जमात ही व्यापारी आहे. त्यांचे मनोरंजन व्हावे तसेच खेळाच्या माध्यमातून समाज एकत्रित व्हावा यासाठी सामन्यांचे आयोजन करण्यात आल्याचे पदाधिका-यांनी सांगीतले. समारोपीय कार्यक्रमाला अखिल भारतीय मेमन जमात फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी इकबाल मेमन ऑफिसर, इमरान भाई फ्रुटवाला युथ विंग राष्ट्रीय अध्यक्ष, आसिफ अब्ब जुम्मा राष्ट्रीय अध्यक्ष स्पोर्ट्स विंग हे उपस्थित राहणार आहे. पत्रकार परीषदेला कच्छी मेमन जमात चे यवतमाळ अध्यक्ष अशरफ फाजलानी, हाजी मक्की सेठ, अन्वरसेठ लोधा, इकबाल भाई नूर, बाबुभाई विंधानी, लतीफ भाई मालानी, सिराजभाई अबला, फिरोजभाई दोसानी, इरफान लोधा, तौसीफ अलीयानी, दाऊद बेलानी, फिरोज बोथा, असलम लोधा, इरफान फाजलानी उपस्थित होते.

बक्षीसांची मेजवाणी

या सामन्यांमध्ये प्रथम बक्षीस पटकविणा-या टिमला 51 हजार, व्दितीय 41 हजार रोख बक्षिस देण्यात येणार आहे. याव्यतिरीक्त विनर ट्रॉफी, रनर अप ट्रॉफी, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर तसेच प्रत्तेक मॅच मधिल मॅन ऑफ द मॅच खेळाडूला मेमन जमात चे उपाध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांचेकडून ट्रॅकसूट देण्यात येणार आहे.

रिपोर्टर ,संजय राठोड यवतमाळ

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ज्योतिर्गमय स्कूल अव्वल

पुसद : येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये स्थानीक ज्योतिर्गमय स्कूलच्या विद्यार्थीनी नी प्राथमिक गटातून व माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावित पुसद तालुक्यात विज्ञान प्रदर्शनीत आपला दबदबा कायम राखला.
झी माऊंट लिटल ई स्कूलच्या भव्य प्रांगणात ४५ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे दि. १९ व २०डिसेंबर २०१९ला आयोजन करण्यात आले होते. पुसद तालुक्यात एकूण १८०विज्ञान प्रयोग प्रतिकृतीचे विद्यार्थ्या मार्फत सादरीकरण करण्यात आले. या सर्व स्पर्धकामधून प्राथमिक गटातून इयत्ता ७ व्या र्वगात शिकत असलेल्या वेदांत थोरात यांनी तयार केलेल्या स्मोक पार्टिकल अॅबझाॅबर या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला.
माद्यमिक गटामधून कु. मैथली प्रवीण तगडपल्लेवर व कु.श्रेया तगडपल्लेवर यांनी तयार केलेल्या ‘नाॅन पोलुटींग व्हेईकल,’ या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला.या विद्यार्थ्यांना श्री सय्यद हसिम विज्ञान शिक्षकाचे मुलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक शाळेचे प्राचार्य राजेश प्रजापती, उपप्राचार्य संजय सेंगर शाळेचे अध्यक्ष डॉ.सतीश चिद्दरवार सचिव डॉ. सौ. सुप्रिया चिद्दरवार सर्व शिक्षक वृंद यांनी केले.

राम राठोड
TV INDIA प्रतिनिधी
पुसद जि.यवतमाळ

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्य स्कॉलर्स सर्च अकॅडमी, कोरपना चा तिसरा क्रमांक प्राप्त

 

 

चंद्रपुर : पंचायत समिती कोरपना अंतर्गत ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सावित्रीबाई फुले महाविद्यालय , गडचांदूर येथे नुकतेच पार पडले . यामध्ये स्कॉलर्स सर्च अकॅडमी कोरपना येथिल इयत्ता ७ विचा विद्यार्थी पार्थ गिरीधर पानघाटे या विद्यार्थ्यांने ” पाण्याच्या टाकीवर नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणा ” या विषयावर प्रतिकृती सादर करून पाण्याचा अपव्यय टाळता येतो हे प्रतिकृती मधून दाखवले. तज्ञ परीक्षकांनी या कार्यक्रमाचे परीक्षण करून सदर प्रतिकृतीला तिसरा क्रमांक दिला आणि प्रतिकृती ची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदशनी करीत निवड झाली.
या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री आनंदजी धुर्वे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यासाठी सर्च फौंडेशन चे चेअरमन इंजी . श्री दिलीप झाडे सर , प्राचार्य ममता एस. एन. , विज्ञान शिक्षक श्री संदीप पिंपळकर याचे मार्गदर्शन लाभले .

रिपोर्टर मनोज गोरे चंद्रपुर जिल्हा

गडचांदूरच्या रोहिणीची जयपुर येथे होणाऱ्या टेबल टेनिस सामन्यांसाठी निवड

 

 

गडचांदूर: जयपुर येथे २० ते २२ डिसेंबर दरम्यान ‘पश्चिम झोन आंतरविद्यापीठ स्तरीय टेबल टेनिस’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विविध राज्यातील विद्यापीठांचा सहभाग राहणार असून गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व गडचांदूर येथील १९ वर्षीय विद्यार्थीनी रोहिणी लहूजी नवले करणार आहेत. ती सध्या एस.पी.विधि महाविद्यालय चंद्रपुर येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबत टेबल टेनिस या खेळात तिला विशेष आवड आहे. याआधी विद्यापीठा अंतर्गत झालेल्या स्पर्धेत देखील तिने विजय मिळवला होता. आता, जयपुर येथे होणाऱ्या सामन्यात मला विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करायला मिळत असल्याचा आनंद वाटतो. मी माझ्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद व आई-वडील यांना देते असे तिने सांगितले.

मनोज गोरे चंद्रपूर

गडचांदूर येथे मुलींच्या मॅरेथॉनमध्ये खुशी शेख व अंजली सलगर ने बाजी मारली

चंद्रपुर : महात्मा गांधी विद्यालयात शनिवारी मॅरेथॉन स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते, स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संचालक तथा गोंडवाना विद्यापीठ चे परीक्षा नियंत्रक डॉ, अनिल चिताडे यांनी हिरवी झेंडी दाखवून केले,याप्रसंगी मुख्याध्यापक गिरीधर बोबडे,उपमुख्याध्यापक प्रशांत उपलेंचवार, पर्यवेक्षक कृष्णा बततुलवार, पर्यवेक्षिका प्रा,स्मिता चिताडे उपस्थित होत्या,
मॅरेथॉनमध्ये माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक खुशी शेख हिने पटकीवला,द्वितीय, कल्याणी नवघरे, तृतीय, श्रुती लोहे,चतुर्थ सोनू आदे, पाचवा रुचिता फुलझेले आली,
पूर्व माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक अंजली सलगर,हिने पटकीवला,द्वितीय प्रीती जाधव,तृतीय स्मिता श्रीमंगल,चतुर्थ सोनल फाये, पाचवा क्रमांक अनुराधा हिरादेवे हिने पटकविला,
विजेत्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, कार्यक्रमाचे संचालन प्रशांत धाबेकर यांनी केले, स्पर्धेच्या यशस्वी ते साठी क्रीडा शिक्षक बबन भोयर, संजय झाडे,तथा इतरांनी परिश्रम घेतले,

रिपोर्टर, मनोज गोरे चंद्रपुर

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दीना नीमीत्य सायकल ऱ्यली चे आयोजन. -राष्ट्रीय हरित सेने च्या विद्यार्थीनी केले ऱ्यली चे आयोजन. -विविध संदेशांनी वेधले लक्ष.

चंद्रपुर :- बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ ,राजुरा द्वारा संचालित आदर्श हायस्कूल च्या राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या विध्यार्थीनी विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दीना नीमीत्य सायकल ऱ्यली चे आयोजन करण्यात आले. सायकल ऱ्यली ला आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यापीका नलीनी पिंगे व जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार ,हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर यांनी हिरवा ध्वज उंचाउन सुरुवात केली.
यावेळी सहभागी सर्व विद्यार्थीनी लाल रंगाची रीबीन हातावर बांधून एड्स जनजागृती चा संदेश दिला.शहरातील मुख्य बाजारपेठ मार्गांनी या ऱ्यली ने प्रदीक्षणा केली.औद्योगिक तसेच वैयक्तिक पातळीवरील प्रदुषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे.याचा विपरीत परिणाम माणसानंबरोबर इतर जीवसृष्टी ,नैसर्गिक संसाधने आणि हवामानावरही होत आहे.प्रदूषनाच्या दुष्परिणामाबाबत सर्वसामान्यांमधे जाकरूता वाढली पाहिजे याची गरज आता जगभरात निर्माण झालेली आहे. 2 डिसेंबर 1984 च्या रात्री भोपाळजवळील यूनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायुची गळती होऊन हजारो लोक म्रुटुमुखी पडले.या दुर्घटनेची आठवण विशेषता औद्योगिक क्षेत्राला रहावी आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी ,म्हणून हा दिवस भारतात पाडला जातो. या दिवसाचे औचित्य साधून आपण काय करू शकतो याविषयी सविस्तरपणे माहिती राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांनी दिली. ऱ्यली च्या यशस्वीते करीता इयत्ता आठवी चे वर्गशिक्षक संतोष वडस्कर ,स्कॉऊट यूनिट लिडर रुपेश चीडे, गाईड यूनिट लिडर सुनीता कोरडे ,शिक्षिका भाग्यश्री क्षीरसागर म केली.