Sat. Sep 24th, 2022

अपराध

ब्रेकिंग न्यूज : संपत्तीच्या वादातून काकान जाळली पुतण्याची जिनिंग फॅक्टरी, पुतण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न 

वर्धा : पुतण्याची जिनिंग फॅक्टरी जाळली.. सोबतच पुतण्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय… वर्ध्याच्या आर्वी इथं ही घटना घडलीय.. दीपक त्र्यंबक देशमुख राहणार वाढोना असं जिनिंग जाळणाऱ्या काकाच नाव आहेय.. आर्वी येथील कौस्तुभ देशमुख हा त्याच्या जिनिंगमध्ये काम करत होता.. यावेळी तलवार घेऊन आलेला काका दीपक देशमुखन कौस्तुभला धमकावल.. पेट्रोल टाकून कापसाची जिनिंग जाळली.. कौस्तुभन कस तरी जीव वाचवून पोलीस ठाण गाठलं.. पोलिसांनी दीपक देशमुख तसच गाडीचालकाला ताब्यात घेतलं.. यात जिनिंगच 40 ते 50 लाखांचं नुकसान झालं..

ब्रेकिंग न्यूज : यवतमाळ येथे अवैध दारुविक्रेते तिघे गजाआड शहर पोलिसांची कारवाई

यवतमाळ ) : संचारबंदीचे आदेश धुडकावून सर्रास अवैधरित्या दारुविक्री करणा-या तिघांना यवतमाळ शहर पोलिसांनी अटक केली. यामध्ये देशी विदेशी दारुसाठ्यासह 51 हजार 290 रूपयाचा मुदे्माल जप्त करण्यात आला. ही कारवाई छोटी गुजरी, पिंपळगाव परिसरात आज करण्यात आली.
कमलेश गणेशलाल पातालबंशी, शैलेश महादेव पातालबंसी, दोघेही रा. छोटी गुजरी चौक, तसेच नरेंद्र राजेंद्र जयस्वाल, रा. पिंपळगाव असे अटक करण्यात आलेल्या दारु विक्रेत्यांची नावे आहेत. जिल्ह्यामध्ये वाढत्या कोवीड संक्रमणामुळे जिल्हाधिकारी साहेब, यवतमाळ यांचे आदेशान्वये आज संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान पोलिस अधिक्षक दिलिप भुजबळ पाटील यांनी यवतमाळ शहरासह इतर ठिकाणी सुरु असलेल्या अवैधदारु विक्री अड्यावर धाडसत्र राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज  शहरात विविध भागात धाडसत्र राबविण्यात आले. यामध्ये पिंपळगाव व छोटी गुजरी परिसरातुन 51 हजार 210 रुपयाचा मूद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच संबधीत तिन्ही आरोपींना ताब्यात घेवुन गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मनोज केदारे, सपोनि भाकडे, पोलिस उपनिरीक्षक  बोरकर, सफौ क्षिरसागर आदींनी केली.

Breaking news Yavatmal बाल संरक्षण कक्षाने रोखला बालविवाह मुलीने शिक्षण पूर्ण करू देण्याची केली विनंती

 

यवतमाळ, दि. 24 : घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा खुर्द येथे सोळा वर्षाच्या व 10 वी मध्ये शिकत असलेल्या मुलीचे वडिलाचे छत्र हरवल्यामुळे लग्न करून लवकर जबाबदारी मधून मुक्त व्हावे, म्हणून बाल विवाहाचा घाट घातला होता. मात्र जबाबदार व्यक्तीने सदर मुलीचे भविष्य अंधारात जाण्यापासून वाचवले व जिल्हा बाल संरक्षण कक्षास माहिती दिली. त्यानंतर तत्परतेने बाल संरक्षण कक्षाची चमू गावात धडकली.
बालिकेच्या कुटुंबाला सदर बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. पालकांना मुलीचे लग्न सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समजावून सांगितले. तसेच बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 पेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बाल विवाह प्रतिबंध अधिनिमय 2006 अन्वये दखल पात्र गुन्हा आहे, याबाबत माहिती देण्यात आली. शेवटी मुलीच्या कुटुंबियाकडून बाल विवाह न करणे बाबत लेखी बंधपत्र उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या समक्ष लिहून देण्यात आले. यावेळी बालिकेने शिक्षण पूर्ण करू द्या मला दहावीची परीक्षा द्यायची आहे, पुढे शिक्षण घेऊ द्या अशी विनवणी उपस्थितांना केली.
सदर बालविवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर यांच्या मार्गदर्शनात बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी माधुरी पावडे, आकाश बुर्रेवार, नायब तहसिलदार डी.एम. राठोड, संरक्षण अधिकारी एस.बी.राठोड, ग्रामसेविका मिना मिसाळ, तलाठी एस.पी.राऊत, अंगणवाडी सेविका मिना देठे यांनी कार्यवाही पार पाडली.
बाल विवाहबाबत नागरिकांनी दक्ष राहावे, तसेच बाल विवाह बाबत माहिती असल्यास आपल्या गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दगडी इमारत, टांगा चौक, यवतमाळ अथवा चाईल्ड लाईन 1098 यांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.
००००००

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लॉटरी सेंटरमध्ये तोडफोड आर्णी नाका परिसरातील घटना

यवतमाळ : दारूपिण्याकरिता पैसे न दिल्याच्या कारणातून मद्यपी एकाने ऑनलाइन लॉटरी सेंटरच्या दुकानात असलेल्या व्यक्तीसोबत वाद उपस्थित केला. एवढेच नव्हे तर त्यांने दुकानातील संगणक, टीव्ही, टेबल-खुर्चीची तोडफोड करून नुकसान केले.तसेच गल्यातील 35 हजार रुपये हिसकावून पळ काढला. ही घटना 21 फेब्रुवारीला महावीर ऑनलाइन सेंटर आर्णी रोड येथे घडली.राजेंद्र देवराव झाडे ( 35) राहणार वडगाव असे फिर्यादीचे नाव आहे. घटनेनंतर त्यांनी अवधूत वाडी पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी लखन उमेश खरूले 25 रा. नेताजी नगर व त्याच्या एका साथीदारा विरुद्ध गुन्हा दाखल केला.
___________

आठवडी बाजारात खिसा कापून पाकीट मारले अवधूत वाडी पोलीसात गुन्हा दाखल

यवतमाळ : लग्नाचे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका 53 वर्षीय व्यक्तीचे काही अज्ञात महिलांनी पाकीट मारले. ज्यामध्ये त्यांची 9 हजार 700 रुपयांची रोकड होती. ही घटना 21 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास बाजार परिसरात घडली.
गजानन मनोहर डगमावर (53) रा. रामकृष्ण नगर वडगाव असे पाकीट मारलेल्या व्यक्तीचे नाव आहे.घटनेनंतर त्यांनी अवधूत वाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात महिला चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
__________

बोरगाव शिवारातून मोटर लंपास यवतमाळ ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

यवतमाळ : तालुक्यातील बोरगाव शेतशिवारातुन एका शेतकऱ्याच्या विहिरीवरील मोटर पंप 80 फूट पाइप अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. ही घटना 21 फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
प्रियंका संदीप धवणे( 39) रा. यवतमाळ असे फिर्यादी महिलांचे नाव आहे. घटनेनंतर त्यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अतिक्रमणाच्या कारणावरून नगरपरिषद कर्मचाऱ्याला मारहाण शहर पोलिसात गुन्हा दाखल

यवतमाळ : शहरातील अतिक्रमणाच्या कारणावरून वाद उपस्थित करीत एका नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याला संगनमत करून मारहाण करण्यात आली. ही घटना 21 फेब्रुवारीला सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास नगर परिषद कार्यालयापुढे घडली.
प्रदिप वासुदेवराव बोपचे ( 48) रा. शास्त्री नगर गोदाम असे मारहाण करण्यात आलेला कर्मचाऱ्याचे नाव आहे.घटनेनंतर त्यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून ते सकाळच्या सुमारास पाच कंदील चौक येथे जात असताना संबंधित आरोपीनी अतिक्रमण काढल्याच्या कारणावरून वाद उपस्थित केला.एवढेच नव्हे तर संगणमत करून लोखंडी रॉड व फावड्याने पायावर डोक्यावरून मारून कर्मचाऱ्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी महम्मद ईरफान अब्दुल रहेमान (50), महम्मद नौशाद महम्मद इरफान (20) तसेच एक महिला सर्व राहणार तारपुरा यवतमाळ यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

______________________

गदाजीबोरि मध्ये अवैध विक्री होत असलेली देशी दारू पोलिसांनी केली जप्त

रिपोर्टर, सचिन मेश्राम मारेगाव ,यवतमाळ

 

 

देशी दारूच्या 205 बाटल्या अंदाजे किंमत 20500 रूपयांचा मुद्देमाल जप्त

मारेगांव। अवैधरीत्या दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी गदाजी बोरी येथे पोलिसांनी धाड टाकून विस हजार पाचेशे रुपयांची देशी दारु जप्त केली असून एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ताब्यातुन देशी दारूच्या 205 बाटल्या जप्त केल्या असून आरोपीला अटक केली असुन.
मारेगांव तालुक्यातील गदाजी बोरी येथील होळीच्या पर्वावर नागरिकांची होणारी मोठी गर्दी पाहता या दिवशी गांवात देशी दारु विकण्यासाठी ही दारू दडवून ठेवण्यात आली होती ही अवैध दारू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जगदीश मंडळवार यांना मिळाली. या माहितीवरून पोलीस जमादार भालचंद्र मांडवकर यांनी सोमवार दिनांक 9 रोजी सायंकाळी सहा वाजता धाड टाकली. धाडीच्या ठिकाणी पाच बॉक्स देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. परंतु अवैध देशी दारू विक्रेता कुंदन जानबाजी नान्हे याला अटक करुन देशी दारूच्या 205 बाटल्या त्याचे अंदाजे किंमत 20500 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून मारेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा 65(ई)कलमे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बिट जमदार भालचंद्र मांडवकर करीत आहेत.

आर्णीत अवैध व्हिडिओ गेम जोमात सुरु, विद्यार्थ्यांचा होत आहे शैक्षणीक नुकसान

 

*महसूल विभागाचे होत आहे दुर्लक्ष,पालक मात्र चिंतेत*

आर्णी शहरातील मध्यवस्तीत शास्त्री नगर येथे व्हिडिओ गेम पार्लर स-हास सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे
त्यामुळे पालक चिंतेत असुन त्यांना आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे
सध्या परीक्षेचे दिवस सुरु आहे
वर्षभर पालक व शिक्षक विद्यार्थ्यांवर मेहनत घेत असतात त्या मेहनतीचे चिज करण्याची हिच वेळ असुन त्यांचे भविष्याला या परिक्षेतुन दिशा मिळते परंतु आर्णी शहराच्या मधोमध माहेश्वरी कॉम्पलेक्स मध्ये असलेल्या व्हिडिओ गेम पार्लर मुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य पाण्यात दिसत आहे
अनेक विद्यार्थी अभ्यास/ परिक्षा सोडून व्हिडिओ गेम खेळायला येत असल्याने याचा पालकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे
तसेच विद्यार्थ्यां जवळ खेळण्यासाठी पैसे नसल्यास विद्यार्थी पालकांचे पैसे चोरुन खेळण्यासाठी येत असल्याचे ही अनेक प्रकार या आधी येथे घडले आहे
त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पैश्याच घोडे बाजार सुरु असुन संबंधीत व्हिडिओ गेम चालक मात्र स्वत: च्या स्वार्थापोटी विद्यार्थ्यांच्या भवीष्याशी खेळतांना दिसत आहे
दिवस भरात हजारो रुपयाची उलाढाल येथे होत आहे
कोणत्याही प्रकारचा करमणुक कर सदर दुकानदार भरत नसुन महसूल प्रशासन ही या कडे तिळमात्र लक्ष द्यायला तयार नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
त्यामुळे शासनासह विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे
या व्हिडिओ गेम पार्लर मुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पडत असलेल्या प्रभावाला संबंधीत विभाग किती गांभीर्याने घेते व पार्लर वर काय कार्यवाही करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

बेरोजगारी मुळे घाटंजी तालूक्यात दारू विक्री ला आला ऊत

घाटंजी तालूक्यात मागील हपत्यात एस डी पि ओ कोळी साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पारवा घाटंजी आणी पाढंरकवडा येथील पोलीस स्टाप मिळून दोन खेड्यातून पंचविस हजाराची दारू जप्त केली होती एक हप्ता होत नाही तोच ह्याच पथकाने दी. 24/1 ला कीन्ही तिवसाळा व आसोली तांडा येथे मोहा ची हातभट्टवर धाडी मारुन 57390.रुपयाची देशी व मोहाफुल दारु जप्त करून बारा आरोपिस गजाआड केले. घाटंजी तालूका हा मागास वर्गिय आदीवासी तालूका म्हणून ओळखला जातो ईथे ना कोणते मोठे ऊध्धोग ना कारखाने फक्त शेती च्या भरोशावर चालतो त्यातही नापीकी मग व्यवसाय कोणया करायचा ऊदरनिरव्हाह कसा चालवायचा त्यामुळे ईथे बेरोजगाराची संख्या मोठी त्यामुळे ईथे दारु विक्री चोरी करणे अश्या धंद्या शिवाय पर्याच नाही असे येथील जनता बोलून दाखवित आहे . पोलीसा च्या धाडी नेहमीच पडतात पण दारु विक्री काही बंद होत नाही हे कित्येक वर्शा पासून ईथे पाहायला मिळत आहे
बाईट कीन्ही गावातील रहवासी
दारू विक्रीतिल आरोपि

प्रतिनीधी संजय ढवळे घाटंजी
ता. घाटंजी
जि. यवतमाळ