Sat. Sep 24th, 2022

भ्रष्टाचार

ग्रा.पं.अतर्गत 14 व्या वित्त आयोगाच्या निधीमधील कामे दर्जाहीन

 

पुसद पासून जवळच असलेल्या वरुड ग्रा.पं.अंतर्गत चालु असलेल्या विहीरीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत आहे.असा आरोप गावकरी करीत आहेत.
शासनाच्या 14 व्या वित्त आयोग निधी मधून गावकर्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विहीर खोदकाम,बांधकाम सुरू आहे. विहीर बांधकाम करतांना निविदे मधिल नियम,अटी,निकषानुसार होत नसल्याचा आरोप होत आहे.

विहीर बांधकाम करतांना योग्य दर्जाचे बांधकाम साहित्य वापरावयास पाहीजे परंतू बांधकामामध्ये गावातील नाल्यामधील रेती,निकृष्ठ दर्जाचे डष्ठ वापरून विहीरीचे बांधकाम केल्या जात असल्याचे गावकर्यांचे निर्देशनास अाले अाहे.

विहिरीचे बांधकाम गावीतील काही कार्यकर्त्यांनी बंद करावे न्हणून प्रयत्न केले.शासनाची परवानगी नसतांना सबंधीत बांधकाम कंत्राटदारानी रेती कोठून आनली?संबंधित कंत्राटदार रेतीची शासनाला राँयल्टी न देता शासनाची सुद्धा आर्थीक फसवणूक करीत आहे असा सुद्धा आरोप नागरीक करीत आहेत.
ठेकेदार व सबंधित अभियंता संगनमतानी 14 व्या वित्य आयोगाच्या निधीचा आपहार करीत आहेत अशी गावकरी चर्चा करीत आहेत.
या पुर्वी ग्राम पंचायत चे सचिव यांनी 2,95000 कीमतीचा रपडा आणी नालीचे बांधकामाचे बिल काढल्याचे निवेदनात म्हटले आहे,पंरतु प्रत्यक्षात या प्रमाणे कोणतेही काम गावात करण्यात आलेले नाही. केवळ कागदोपत्री घोडे नाचवुन त्या रक्कमेचा अपहार करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. या संदर्भात दि,03 मार्च 2020 रोजी पुसद पंचायत समीतिचे गटविकास अधिकारी शिवाजी गवई यांना निवेदन देण्यात आले आहे.ग्राम पंचायत वरूड पाणी पुरवठा योजने करीता 14 वित्त आयोगातुन मंजुर करण्यात आलेले विहीरीचे बांधकामात लोखंडी गज,सिमेट,नाल्याची रेती,अतिशय निकृष्ठ दर्जाची वापरली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
संबंधित कामाची चौकशी तात्काळ करुन ठेकेदार व जेई यांच्यावर कडक शासण करण्यात यावे अशीही मागणी तक्रारकर्त्यनी केली आहे.

राम राठोड
T V INDIA न्यूज प्रतिनिधी
पुसद जि.यवतमाळ

सुखकर्ता चिटफंड संचालक, खातेदारांसोबत एसडीपीओंची बैठक.

 

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील सुखकर्ता चिटफंड प्रकरणात उशीरा का होईना मात्र कारवाईचे सुत्र हालायला सुरुवात झाली असून १ जानेवारी रोज बुधवारला उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या आदेशान्वये ठाणेदार गोपाल भारती यांनी सुखकर्ता चिटफंड संचालक व ग्राहकांना बैठकीसाठी पाचारण केले. एडीपीओ यामावार यांनी चिटफंड प्रकरणा संबंधी सखोल माहिती घेऊन येत्या ६ जानेवारी रोज सोमवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास चिटफंडचे आॅडीट तसेच व्यवहाराचे संपूर्ण दस्तावेज घेऊन येण्याचे चिटफंड संचालकांना सांगितले. या घडामोडींमुळे सदर प्रकरणात उशिरा का होईना परंतु कारवाईला सुरुवात झाल्याचे लक्षात घेऊन चिटफंडात गुंतवलेली रक्कम ग्राहकांना परत मिळणार असल्याची अशा पल्लवित झाली आहे. यानंतरही न्याय न मिळाल्यास आत्मदहनाच्या दिलेल्या ईशाऱ्यावर आम्ही ठाम असल्याची माहिती चिटफंड ग्राहक दीपक वर्भे यांनी tv India ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. सुखकर्ता चिटफंडच्या अनेक ग्राहकांचे पैसे संचालक रोहित शिंगाडेसह इततर संचालक देत नसल्याने शेवटी ग्राहकांनी चंद्रपूर जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली होती. याचबरोबर वर्भे यांच्या नेतृत्वात नुकतेच गडचांदूर येथील गांधी चौकात थकीत रक्कम मिळावी आणि गुंतवणूक कायदा १९९९ अंतर्गत सुखकर्ता चिटफंड संचालकांवर पोलिस कारवाई व्हावी या मागणीला घेऊन एकदिवसीय अन्न त्याग आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते हे मात्र विशेष. सदर बैठकीत सुखकर्ता चिटफंड संचालक रोहीत शिंगाडे,रोहन काकडे, बंडू वैरागडे, दीपक वर्भेंसह इत्यादींची उपस्थिती होती. चिटफंट ग्राहकांनी दिलेल्या ईशाऱ्यामुळेच पोलिस प्रशासनाकडून सदर प्रकरणाची दखल घेण्यात आल्याचा अंदाज वर्तविला जात असून आगामी काळात सर्व ग्राहकांची थकीत रक्कम परत मिळणार असे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे.

रिपोर्टर, मनोज गोरे चंद्रपूर

वरुड ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणे करिता साखळी उपोषणा

वरुड ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणे करिता दिनांक 16/12/19 पासून साखळी उपोषणाला बसलेले बाबाराव उबाळे, विलास राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आज दिनांक 24 डिसेंबर 2019 रोजी आमदार निलय नाईक यांच्या हस्ते हे उपोषण सोडविण्यात आले याप्रसंगी गटविकास अधिकारी शिवाजी गवई, उपसभापती पागिरे ,जि प सदस्य अमेय नाईक, पंचायत समिती सदस्य गटनेते किसन मळघने, पंचायत समिती सदस्य मोतीराम राठोड, सुधाकर कांबळे ,रुपेश जाधव ,शरद बाबुराव पुंडे,नारायण सुर्वे विस्ताराधिकारी मुंडे साहेब तसेच पत्रकार महोदय उपस्थित होते.

 

रिपोर्टर राम राठोड पुसद यवतमाळ

आमदार संदिप दुर्वे यांचा प्रयत्नाला यश

 

नागपूर : येथे हिवाळी अधिवेशनात आज आ.डॉ.संदीपभाऊ धुर्वे यांनी आर्णी येथील नगर परिषद ची पाणी पुरवठा योजना जी बऱ्याच वर्षांपासून रखडलेली आहे.ती योजना सुजल निर्मल योजना या नावाने 2013 मध्ये 41.81 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती, व त्या योजनेवर 9 कोटी रुपये पहिला टप्पा पण आला होता पण काही अपरिहार्य कारणामुळे ती होऊ शकली नाही.नन्तर 2015 मध्ये ती योजना बंद करण्यात आली. त्यानंतर सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत प्रस्ताव पाठवण्यात आले व त्या प्रस्तावास मंजुरी पण मिळाली होती पण प्रशासकीय मंजुरीसाठी ती प्रलंबित होती. आज या मुद्यावर आमदार डॉ.संदीपभाऊ धुर्वे यांनी प्रशासकीय मंजुरी मिळावी व उर्वरित रक्कम 40.81 कोटी वळती करावी याबद्दल विधानसभा अधिवेशनात बोलले.

वरुड ग्रामपंचायत मधे लाखोंचा भ्रष्टाचार

 

 

पुसद: पासून अवघ्या 4 किमी अंतरावर असलेल्या वरूड ग्रामपंचायत मधील विविध कामांमध्ये लाखो रुपयांचा अपहार करून भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
झाल्याची कथीत भ्रष्टाचाराची योग्य ती चौकशी होण्यासाठी रितसर तक्रार 20 ऑगस्ट 2019 ला देण्यात आली होती. परत 5/11 2019 ला सुद्धा तक्रार देण्यात आली. परंतु आज पर्यंत
कोणतीही चौकशी न झाल्यामुळे पंचायत समिती कार्यालयासमोर दिनांक 16 12 2019 पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
वरुड येथील दलित वस्ती मध्ये समाज कल्याण विभागामार्फत पाणीपुरवठा करण्यासाठी नऊ लाख रुपये मंजूर झाले होते. त्यामध्ये फक्त पाईप लाईन टाकून जमिनीवर टाके बांधले आहे त्या पाईपलाईन ला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचा कोणताही स्त्रोत्र नसताना पाइप टाकण्याची ग्रामपंचायतने घाई का केली पिण्याच्या पाण्याची कोणती व्यवस्था नसताना सुद्धा ग्रामपंचायत कडून कोणताही ठराव नपास करता फक्त जमिनीमध्ये पाईप टाकुन नऊ लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे दलित वस्तीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी कोणताही स्त्रोत्र विहीर विंधन विहीर काही नाही मग फक्त पाइप टाकून तेही फक्त 180 पाईप साठी नऊ लक्ष खर्च येतो कसा असे दलित वस्तीच्या नावावर फक्त खर्च दाखवून नऊ लाख उखळण्याचे काम केले आहे.त्याच बरोबर अश्विन पूर येथील सुद्धा 5 लक्ष रुपये खर्च करून त्या ठिकाणीसुद्धा वरचेवर पाइपलाइन टाकून त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.
अश्विनपूर येथे संपूर्ण गावांमध्ये पाईपलाईन असतानासुद्धा फक्त पैसा हडप करण्यासाठी पाण्याअभावी फक्त पाईप टाकण्याचे काम वरूड ग्रामपंचायत ने केले असे उघडकीस आले आहे.
हा लाखोंचा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे.ग्रामपंचायत वरुड येथील सचिव यांच्या मनमानी कारभारामुळे

याचे चौकशीसाठी वारंवार तक्रार करून सुद्धा वरिष्ठ अधिकारी या ग्रामपंचायतच्या सचिवाला पाठीशी घालत आहे. असा सवाल नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा ग्रामसभा घेण्यात आली नाही. त्यामुळे तंटामुक्ती अध्यक्षाचे निवड ही त्याठिकाणी करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतच्या सचिवाच्या या मनमानी कारभारामुळे लोकशाहीची थट्टा केल्यासारखे वागत असलेले हे अधिकारी यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
जुलै 2019 ला 5 ग्रामपंचायत सदस्यांनी सचिव श्री सोनटक्के मासिक सभेमध्ये हिशोब घेत नाही कोणत्याही सदस्याला विश्वासात घेत नाही ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समिती पुसद यांच्याकडे तक्रार देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची सोनटक्के यांची चौकशी झालेली नाही. अश्विनपूर येथील गोरगरिबांसाठी सेवा भवन बांधावयाचे होते त्यासाठी शासनाकडून निधी सुद्धा मंजूर झाला होता जागा उपलब्ध होती सेवा भवनासाठी ह्या सेवा भवनाचे पाच लाख रुपये निधी मंजूर असताना त्याठिकाणी सेवा भवन न बांधता सर्व निधी हडप केला आहे. या सर्व निधीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. असे तक्रारकर्ते बाबाराव नामदेव उबाळे व विलास उत्तम राठोड सामाजिक कार्यकर्ते यांनी दिनांक 16 12 2019 पासून पंचायत समिती पुसद या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
वरूड ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपोषण करते करीत आहेत.

राम राठोड
न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी
पुसद जि.यवतमाळ

चौपदारीकरणाचे काम निकृष्ट : महामार्गावरील रस्त्याला तडे

 

– यवतमाळ :दि.१७ बोरी- तुळजापूर महामार्ग रस्ते चौपदारीकरणाचे काम सुरू आहे. यावर हजारो कोटींचा खर्च होत आहे. या रस्त्याचे काम झाल्यानंतर काही दिवसात तडे जात आहे. हे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असा आरोप नागरिक करीत आहे.

 

– रस्ते विकासाचे पाहिले पाऊल असे म्हटले जाते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारने महामार्ग चौपदारीकरणाचे काम सुरू केले आहे. त्यासाठी नेमलेले ठेकेदार निकृष्ट काम करत आहे. कामाचा कोणताही दर्जा राखला जात नाही. त्यामुळे रस्त्याला काही दिवसात तडे जात आहे. क्वालिटी कंट्रोल द्वारे तपासणी करून संबंधित कंपणीविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.

रिपोर्टर संजय राठोड यवतमाळ

जिल्ह्यात अनेक बोगस आश्रमशाळांचा सुळसुळाट

समाजकल्याण सह आयुक्तांचा आशीर्वादबनावट पटसंख्या दाखवून लाटतात लाखोंचे अनुदानकोडशी (बु.) येथील आश्रम शाळेचा गैरप्रकार चव्हाट्यावरविद्यार्थ्यांचा जीव धोक्यात /संस्थाचालक मालामाल

विमुक्त जाती , भटक्या जाती , इमाव व विमाप्र समाज कल्याण मंत्रालया मार्फत चंद्रपूर जिल्ह्यात २५ ते २६ आश्रम शाळा सुरू अाहे यापैकी अनेक आश्रम शाळा कागदोपत्रीच असून बोगस विद्यार्थी हजेरी पटावर दाखवून शासनाकडून करोडो रुपयांचे अनुदान संस्थाचालक व समाज कल्याणचे अधिकारी संगनमत करून लाटत आहे असा खळबळजनक आरोप तक्रारकर्त्याने केला असून कोरपना तालुक्यातील नदीकाठावरील कोळशी (बु.) येथील स्व.चमनसेठ प्राथ. आश्रमशाळेत सुरु असलेला गैरप्रकार उघडकीस आणत जिल्हाधिकारी यांचेकडे केलेल्या तक्रारीत सर्व आश्रम शाळांची पडताळणी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे

कोरपना तालुक्यात कोडशी ( बु.) येथे स्व. चमनसेठ प्राथ.आश्रम शाळेत १ ते ७ पर्यंत वर्ग भरतात हजेरी पटावर ७१ निवासी विद्यार्थी दर्शवितात मात्र आश्रम शाळेत फक्त ७ विद्यार्थि उपस्थित असतात शाळेत कुठल्याही सोयी सुविधा नसून विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सातही विद्यार्थ्यांचे जीवन असुरक्षित दिसते वसतिगृह अधीक्षक संस्थाचालकाचा नातेवाईक असल्याने घरी बसूनच पगार लाटतात अशी माहिती आहे
समाजकल्याण विभागाद्वारे प्रत्येक महिन्याला आश्रमशाळेला भेट देवून तपासणी केली पाहिजे असा नियम आहे असे असतांनाही अधिकारी मात्र कार्यालयात बसूनच तपासणी करीत असल्याने समाजकल्याण विभागाच्या आशीर्वादानेच जिल्ह्यात अशा अनेक बोगस आश्रम शाळांचा सुळसुळाट असून अधिकारी व संस्थाचालकाचे संगनमताने शासनाचे करोडो रुपयांचे अनुदान लाटले जाते
सन २०१८-१९ मध्ये महाराष्ट्रातील सर्व आश्रम शाळांची पडताळणी जिल्हाधिकार्‍यांनी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने दिले होते चंद्रपूर जिल्ह्यात अनेक बोगस आश्रमशाळा असल्याने या शाळांना वाचविण्यासाठी एका मंत्रीमहोदयाच्या राजकीय दडपणाने जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील आश्रमशाळांची पडताळणी केली नाही जिल्ह्यातील बोगस आश्रमशाळेपासुन मिळणारी माया व मंत्री महोदयांचे निकटवर्ती असल्याने समाजकल्याणचे सह आयुक्त चंद्रपूर जिल्ह्याची खुर्ची सोडण्यास इच्छुक नसल्याची धक्कादायक माहीती आहे सहआयुक्तांची बदली काही महीन्या पूर्वी वर्धा येथे झाली होती
परंतु राजकीय वजन वापरुन चंद्रपूर सोडले नाही आश्रमशाळांना समाजकल्याण विभागाचा आशीर्वाद असुन संगनमताने अनुदान लाटण्याचा प्रकार सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांनी तात्काळ जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांची पडताळणी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे

कोळशी येथील आश्रमशाळेत बोगस विद्यार्थी दाखवून मागील वर्षी अनुदान लाटल्याची गुप्त माहिती होती याबाबत खात्री करण्याकरिता शाळेला भेट दिली असता शाळेत ७ विद्यार्थी अंत्यत निकृष्ट दर्जाचे जेवन करीत होते अधिकक्ष , मुख्याध्यापक हजर नव्हते ए.आर.शेख व व्ही.बी. गायकवाड शाळेत हजर होते त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यांचे नोकरीचा प्रश्न आहे असे सांगितले शाळेत कुठल्याही सोयी सुविधा नाही आश्रम शाळेतील हजर सातही विद्यार्थांना जेवण करताना त्यांचे ताटातील भात व निव्वळ तेल तिखट टाकलेली बरोबर न शिजलेली दाळ बघितल्यावर चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ खेळला जातो असे वाटले अशा बोगस आश्रम शाळा चालविणार्‍या संस्थाचालकांसह शाळेचे मुख्याध्यापक , अधीक्षक , शिक्षक व समाजकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांना दंडीत करुन त्यांचेवर शासनाने कठोर कारवाई केली पाहीजे
अभय मुणोत
सदस्य ग्रामपंचायत नांदा अशी मागणी यांनी केली

रिपोर्टर, मनोज गोरे चंद्रपुर

वणी मार्गावरील खड्डयांमुळे वाहन चालकांची कसरत

चंद्रपुर : कोरपना बस स्थानक ठिकाणी वनि मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत मुख्य रस्त्यावरच मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहेत बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करीत आहेत तेव्हा रोज त्या खड्ड्यांमुळे येत लहान छोटे मोठे अपघात होत आहेत मात्र वनी मार्गावरील रस्त्यांमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेत याच खड्ड्यातून विद्यार्थी युवकांना प्रवास करावा लागतो शाळकरी विद्यार्थ्यांना सायकल चालवणे कठीण झाले आहेत एकांदा पाऊस आल्यास या खड्ड्यांमध्ये संपूर्ण पाणी साचलेला असतात या पाण्यामुळे चालणाऱ्या प्रवाशांना मोठा सामना सहन करावा लागतो तो शेतकरी वर्ग यांनासुद्धा या खड्डे मय रोड वरून बैलबंडी आणणे अनेक कठीण झाले आहेत बैलबंडी नेत असताना कधी पडली मारेल याची शाश्वती नाहीत कोळशी खुर्द येथील बस स्थानकाजवळ खड्ड्यांमुळे महामंडळ बस दिनांक 3 डिसेंबरला जवळपास दीड तास त्या खड्ड्यात फसल्यामुळे महामंडळ च्या बस् निघण्यास वेड लागला कोळशी डाकोरे बोरी कोरपना तांबडी कुरे याठिकाणी संपूर्ण रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत कोरपना अंतर चाळीस किलोमीटरचा असताना तीन तास बस पोहोचण्यास लागत आहेत त्यामुळे संपूर्ण रस्ता रोखला त्यामुळेच हा रस्त्या वरील खंडे तात्काळ तात्काळ बुजवण्यात यावे करिता मागणी जोर धरत आहेत तेव्हा बांधकाम विभागाने याकडे जातीने लक्ष घालावे व हा नागरिकांना होणारा त्रास तात्काळ दूर करावा अशी मागणी होत असताना याकडे जाणीवपूर्वक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत तर नाही ना असा प्रश्न सामान्य नागरिकांना भेडसावत आहेत तेव्हा या विभागाने लक्ष घालून रस्ता सुरळीत करावा

रिपोर्टर, मनोज गोरे चंद्रपुर जिल्हा

दिग्रस पंचायत समितीच्या समोर २ डिसेंबर पासुन भ्रष्टाचाराच्या विरोधात साखरा वासीयांचे आमरण उपोषण

यवतमाळ: दि.४ मागील १० वर्षांपासून तालुक्यातील ग्रामपंचायत साखरा येथे सरपंच, सचिव यांनी कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार संबंधित विभागांना देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने साखरा येथील राजू दयाराम पवार याने दि.२ डिसेंबर पासून पंचायत समिती समोर आमरण उपोषण मांडले असून मागील १० वर्षीच्या कालावधीत तत्कालीन सरपंच, सचिव यांनी ग्राम पंचायत अंतर्गत क्रीडांगनाचे बिल काढले आहे व मोक्यावर क्रीडांगण नाही,तंटामुक्त गाव समितीस ४ लक्ष रुपये मिळाले सदर बक्षीस निधीतून कोणतेही काम केले नाही. तसेच जी.प.शाळेतील एक खोलीचे बांधकाम व वॉल कंपाउंड बांधकाम झाले असे दर्शवून संबंधितांना शासकीय निधी काढला आहे. अंगणवाडी येथे शौचालयाचे बांधकाम कागदोपत्री दाखवून शासकिय निधी काढल्याचा आरोप

उपोषणकर्ते राजू पवार याने केला आहे. ग्रा.पं. अंतर्गत पाणी पुरवठा करीता दोन विहिरीचे खोदकाम व बांधकाम केल्याबाबत निधी काढला आहे.गावामध्ये विहिरी नाही ,जीवन प्राधिकरण अंतर्गत पाइप लाइनचे १ कोटी १४ लाख रुपयांचे बोगस काम केले असल्याच्याही आरोप निवेदनातून केला आहे.आमरण उपोषणकर्ते राजू पवार याने दि.२ डिसेंबर पासून न्यायासाठी पंचायत समिती समोर बसले असून जो पर्यंत या प्रकरणाची चौकशी होणार नाही व दोषींवर फौजदारी कारवाई होणार नाही तो पर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असे मत व्यक्त केले

रिपोर्टर, संजय राठोड यवतमाळ

मारेगाव तहसील कार्यलयात शेतीचा नवीन फेरफार घेताना घेतले जातात हजारो रुपये !

 

शेतकऱ्यांनी केली ग्राहक प्रहार संघटना मारेगाव कडे तक्रार दाखल !
यवतमाळ: मारेगाव तहसील कार्यलयात तहसीलदार तथा दुय्यम अधिकारी फार कमी उपस्थित असतात त्यामुळे तहसील कार्यलयात कोणाचेच नियंत्रण नाही .अनेक कामे प्रलंबित आहे .बरेच लोक साहेब नाही म्हणून वापस जाताना दिसतात .त्यामुळे शेतकऱ्यांचा फेरफार करण्यासाठी संबंधित अधिकारी रु 5000 ते रु 20000 घेत आहे .एखाद्या शेतकऱ्याने म्हटले की तुमची तक्रार करतो तर ते असे काही सांगतात की शेतकरी गप बसतो त्या अधिकाऱ्याचे एकाच म्हणणे ,आम्ही सर्व वाटून घेतो .असे सागण्यास ते भीत नाही.त्यामुळे येथील काही शेतकऱ्यांनी ग्राहक प्रहारचे मारेगाव तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम ह्यांचे कडे तक्रार दाखल केली असून ती तक्रार ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ह्यांचे कडे पाठविण्यात आली असुन त्यावर कार्यवाही करून जिल्हाधिकारी ह्यांचे कडे पाठविण्यात आली असून ह्या निवेदनावर
ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम,जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर, जिल्हा संघटक बंडुभाऊ लवटे, जिल्हा कार्याध्यक्ष दामोधर बाजोरीया,उपाध्यक्ष यशवंत काळे ,कोशाध्यक्ष सुनील धवने,सहसचिव भैय्यासाहेब ठमके,पाटनबोरी सर्कल प्रमुख जयवंत बावणे,झरी जामनी सर्कल प्रमुख मनोहर गेडाम,राळेगाव सर्कल प्रमुख दिलीप वाढई,घाटंजी सर्कल प्रमुख कृतनजय देशपांडे ,आर्णी चे अध्यक्ष शेख सत्तार शेख रज्जाक , मारेगाव सर्कल प्रमुख सचिन मेश्राम ,शिबला सर्कल प्रमुख धनराज तिरमनवार अजय दुम्मनवार, विनोदसेठ चमेडीया ,प्रदीप भानारकर आदी च्या सह्या आहेत.
आपला

रिपोर्टर, सचिन मेश्राम मारेगांव यवतमाळ