Sat. Sep 24th, 2022

दिग्रस पंचायत समितीच्या समोर २ डिसेंबर पासुन भ्रष्टाचाराच्या विरोधात साखरा वासीयांचे आमरण उपोषण

यवतमाळ: दि.४ मागील १० वर्षांपासून तालुक्यातील ग्रामपंचायत साखरा येथे सरपंच, सचिव यांनी कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार संबंधित विभागांना देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने साखरा येथील राजू दयाराम पवार याने दि.२ डिसेंबर पासून पंचायत समिती समोर आमरण उपोषण मांडले असून मागील १० वर्षीच्या कालावधीत तत्कालीन सरपंच, सचिव यांनी ग्राम पंचायत अंतर्गत क्रीडांगनाचे बिल काढले आहे व मोक्यावर क्रीडांगण नाही,तंटामुक्त गाव समितीस ४ लक्ष रुपये मिळाले सदर बक्षीस निधीतून कोणतेही काम केले नाही. तसेच जी.प.शाळेतील एक खोलीचे बांधकाम व वॉल कंपाउंड बांधकाम झाले असे दर्शवून संबंधितांना शासकीय निधी काढला आहे. अंगणवाडी येथे शौचालयाचे बांधकाम कागदोपत्री दाखवून शासकिय निधी काढल्याचा आरोप

उपोषणकर्ते राजू पवार याने केला आहे. ग्रा.पं. अंतर्गत पाणी पुरवठा करीता दोन विहिरीचे खोदकाम व बांधकाम केल्याबाबत निधी काढला आहे.गावामध्ये विहिरी नाही ,जीवन प्राधिकरण अंतर्गत पाइप लाइनचे १ कोटी १४ लाख रुपयांचे बोगस काम केले असल्याच्याही आरोप निवेदनातून केला आहे.आमरण उपोषणकर्ते राजू पवार याने दि.२ डिसेंबर पासून न्यायासाठी पंचायत समिती समोर बसले असून जो पर्यंत या प्रकरणाची चौकशी होणार नाही व दोषींवर फौजदारी कारवाई होणार नाही तो पर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असे मत व्यक्त केले

रिपोर्टर, संजय राठोड यवतमाळ

1 thought on “दिग्रस पंचायत समितीच्या समोर २ डिसेंबर पासुन भ्रष्टाचाराच्या विरोधात साखरा वासीयांचे आमरण उपोषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *