Sat. Sep 24th, 2022

वाई (रूई)येथे केंन्द्रस्तरावरील क्रीडा स्पर्धा संपन्न

आज दिनांक 27/11/19 ला वाई (रूई)येथे मंगरूळ केंद्रातील 12 शाळेच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उमेश हेळगीर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वाई मराठी, उद्घाटीका सौ.कांताताई संजयराव कांबळे सदस्य पंचायत समिती यवतमाळ, प्रमुख पाहुणे श्री फिरोजभाई अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वाई उर्दू , श्री शंकरराव काळे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वाई,श्री इमरानभाई,श्री किशोर गोळे विस्तार अधिकारी शिक्षण परिसर मंगरूळ, श्री रामेश्वर कपाट केंद्र प्रमुख मंगरूळ, कु.वैशाली गायकवाड साधनव्यक्ती, सौ.कल्पना शेळके मुख्याध्यापक मंगरूळ, श्री किशोर सरोदे मुख्याध्यापक वाई मराठी व श्री हुसेन शेख मुख्याध्यापक वाई उर्दू हे उपस्थित होते.श्री अय्याज अहमद खान श्री शिवाजी उर्दू हायस्कूल रूई व श्री जावेद काझी अल्ताफ अली काझी इंग्लिश मिडीयम स्कूल रूई यांनी पंच म्हणून कार्य केले. कार्यक्रमाचे यशस्वीते साठी श्री दत्ता परतेती,यशोधरा काटकर,संजिवनी कांबळे, अनिता आगे,लता वानखेडे, तिलोत्तमा ठाकरे, समस्त गावकऱ्यांनी व केंद्रातिल सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *