Sat. Sep 24th, 2022

रमेश नेवासकर यांचे निधन

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त माहिती संचालक श्री रमेश नेवासकर यांचे पोटाच्या विकाराने नुकतेच निधन झाले.ते ८१ वर्षांचे होते.त्यांच्या मागे २ मुले,१ मुलगी,सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
*अल्प परिचय*
श्री नेवासकर यांनी १९५९ साली सर्व साधारण सहायक म्हणून जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथून आपल्या सेवेस प्रारंभ केला. पुढे १९७६ साली त्यांची माहिती सहायक तर १९८१ साली जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी रायगड, पुणे,अहमदनगर, सोलापूर येथे सेवा बजावली.१९९४ साली पुणे विभागाचे उपसंचालक म्हणून तर १९९५ साली राज्याचे माहिती संचालक म्हणून त्यांची पदोन्नती झाली.१९९८ साली ते निवृत्त झाले.
श्री नेवासकर हे अत्यन्त मितभाषी, कार्यतत्पर आणि नेहमी इतरांच्या मदतीला धावून जात. त्यामुळे ते सर्व सहकारी, पत्रकार यांच्यामध्ये लोकप्रिय होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *