Sat. Sep 24th, 2022

भाटुंबा ते पुसद जाणाऱ्या रस्त्यालगत वृक्षांची कत्तल; पर्यावरण दिनाला पर्यावरणप्रेमींची नाराजी

 

यवतमाळ : भाटुंबा ते पुसद जाणाऱ्या रस्त्यालगत असणार्‍या सर्व झाडांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. दोन विभागांमध्ये परस्पर समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येते. प्लॅनिंग करत असताना या झाडाच विचार करणे गरजेचे होते,असे पर्यावरण प्रेमींचे मत आहे. बेसुमार वृक्ष कत्तल होत असल्याने पर्यावरण दिनानिमित्त नाराजी व्यक्त होत आहे. विभागा विभागामध्ये एकमेकाच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण झाल्याने नियोजनाअभावी अमर्याद वृक्ष तोड झाली आहे. याच्यासाठी संबंधित विभागाकडून परवानगी घेतली आहे का हा मोठा यक्षप्रश्न आहे. एकीकडे ऑक्सिजन साठी आज संपूर्ण देशात हाहाकार उडालेला असताना ही वृक्षतोड होणे म्हणजे चिंतेचा विषय आहे.

मनीष जाधव पर्यावरणप्रेमी यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *