Sat. Sep 24th, 2022

Breaking news : यवतमाळ आर्णी तालुक्यातील इचोरा ग्रामपंचायतीत लाखों रुपयांचा भ्रष्टाचार; ग्रामस्थाची तक्रार बेदखल

अर्धवट नालीचे बांधकाम काम नागरिकांचा आरोप

यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात येणाऱ्या इचोरा ग्रामपंचायतमध्ये जवळपास साडेचार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. गावातील नागरिक अजय राठोड यांनी मुख्यमंत्री पोर्टलसह जिल्हाधिकारी, सीईओ, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

         निसकृष्ट पुलाचे बांधकाम नागरिकांचा आरोप

इचोरा ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून अनेक कामे हाती घेण्यात आली. यात वृक्ष लागवड, उघडी गटार,पूर संरक्षक भिंत, नाला बांध आदी कामाचा समावेश आहे. वृक्ष लागवडीवर लाखो रुपयांचा खर्च झाला.मात्र हातावर मोजता येतील इतकेही झाडे जगली नाही. ठेकेदाराने इतर कामे अतिशय निकृष्ट दर्जाची केली आहे. पंचायत समितीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली नाही. या सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराची तक्रार करण्यात आल्यानंतर दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

सुरक्षा भिंतीमध्ये गैरव्यवहार नागरिकांचा आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *