Sat. Sep 24th, 2022

जन्मदाती आईच झाली मुलाच्या विकृत वासनेची शिकार ; वणी तालुक्यातील ब्राह्मणी येथे घडली पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना

रिपोर्टर, आर्यन राठोड, यवतमाळ

यवतमाळ : वणी तालुक्यातील ब्राह्मणी शिवारात आपल्या जन्मदात्रीला वासनेची शिकार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.घडलेल्या घटनेमुुुळे प्रचंड संताप निर्माण होत आहे, आरोपीला पीडित मातेच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र घडलेली घटना अतिशय लाजिरवाणी व संतापजनक आहे.

जन्म देताच गळ्याला नख लावले असते तर आज ही लाजिरवाणी घटना घडली नसती. जन्मदात्रीला वासनेची शिकार करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परंतु मानवजातीला काळिमा फासणारी ही घटना मनसुन्न करणारी आहे. त्या परिसरात वास्तव्यास असलेला 27 वर्षीय नराधम अविवाहित होता. लगतच असलेल्या कोलवाशरीत तो कामाला होता. त्याला दारूचे व्यसन होते घटनेच्या दिवशी तो मद्यधुंद अवस्थेत घरी पोहचला. मध्यरात्री त्याची नियत फिरली, जन्मदात्री एकटीच झोपलेली असताना तीच्यावर बळजबरीने अत्याचार केला. स्वतःच्या मुलानेच असले अश्लिल व घृणास्पद कृत्य केल्याने त्या मातेने भल्या पहाटे विष प्राशन केले. गंभीर अवस्थेत तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पीडित माता कमालीची अस्वस्थ होती, प्रकृती स्थिर होताच तिने थेट पोलीस स्टेशन गाठले. आपल्यावर घडलेली आपबिती तिने कथन केली. ठाणेदार वैभव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य बघता तात्काळ गुन्हा नोंद केला. आरोपीला ताब्यात घेत भारतीय दंड विधान कलम 376 (2) एफ एन 323, 506 नुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण नाकतोडे करीत आहेत. या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *