Sat. Sep 24th, 2022

Main Story

Editor’s Picks

Trending Story

Blog

वाई रुई येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा ; 84 शेतकऱ्यांची उपस्थिती

 

यवतमाळ : लहान मुलांचा तान्हा पोळा सण वाई रुई या गावी अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून सुरक्षित अंतर ठेवत तान्हा पोळा साजरा झाला. यात एकूण 84 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यासाठी सुनिल टाले, शुभम ठक, अजिंक्य आरेकर, मनिष शिंदे, अमोल शिंगाडे, आदी गावकरी मंडळिनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले. शासनाने निर्बंध घालून देताना सुद्धा वाई येथे तान्हा पोळा साजरा करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष भावीक ठक यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला ‘स्टे’; श्याम जयस्वाल व निमिष मानकर यांनी घेतली होती न्यायलयात धाव

 

यवतमाळ : सत्ताधार्‍यांकडून निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य श्याम जयस्वाल व निमिष मानकर यांनी नागपूरच्या उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने निर्णय देत बुधवारी उद्या आयोजित सभेला स्टे दिला आहे. ऑनलाइन सभेत विरोधकांना बोलू दिले जात नाही. माईक म्युट केला जातो. विषय मार्गी लागत नाही, त्यामुळे सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्घतीने घेण्याची मागणी केली होती. दोन आर्थिक वर्षांत सर्वाधिक निधी दारव्हा, दिग्रस, नेर या मतदारसंघात देण्यात आला. भाजपच्या सदस्यांना कमी निधी मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत सर्वसाधारण सभेला स्टे दिला आहे.

Yavatmal : गणेशपूर रोडवरील खड्डे बुजवा अन्यथा खड्ड्यात बसून आंदोलन करणार छत्रपती महोत्सव समिती चा इशारा

वणी-गणेशपुर ला जोडनाऱ्या निगुडा नदीवरील पुलावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत। अपघाताची शाक्यता बावली असूनमतांना अतिनाय मनोमय और शारीरिक त्रास सहनशक्ति आहे। तत्काळ 2 दिन खड्डे बुजवे खर खड्डाडये बुजवे खुर खड्डाडयात बाव चाल करण्यात येल असाक्ष्रपती सम्मिती नेपोब्लिक आर्टवर्क कलापला अभिकल्पन आहे।

वणी तालुक्यातील रस्त्याची अतिशय दयनीय स्टेज झाली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डांकाची शृंखला निर्माण झाली आहे। वाहन चालन वाहन चालन आहे. लफानसहनअपघात नित्याचच असून मोठिया अपघाताची शक्यता बावली आहे। संबंधित विभाग कुंभकर्णी झोपेत असूननिगमनच्या पूर्वार्ती डागडजी करवी अशी मागणी होत आहे।

पूर येल्यलक्रापतीमसमिती ने असून गणेशते खड्डे टून आ केल्वस खतदयात बस अति उन्नत चाल करण्यात येल अकैक्टिवेटन प्रक्ट करण्याल। यावेई गणेश काकडे, गजानन चांदवार, आशिष बोबडे, खंडेज़ोडे यांच्या सहकार्ते.

शिवसेना शिवसंपर्क अभियान अंतर्गत आर्णी तालुक्यात पंचायत समिती गण निहाय 8 ठिकाणी शाखाप्रमुख यांची बैठक

रिपोर्टर, आर्यन राठोड, यवतमाळ

शिवसेना शिवसंपर्क अभियान अंतर्गत
आर्णी तालुक्यात पंचायत समिती गण निहाय 8 ठिकाणी शाखाप्रमुख यांची बैठक घेण्यात आली..
आणि आर्णी शहरातली शाखा प्रमुख ची बैठक सिहगढ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आर्णी येथे घेण्यात आली
प्रमुख उपस्थिती…
मा. विस्वास भाऊ नांदेकर शिवसेना जिल्हा प्रमुख
प्रवीण शिंदे शिवसेना उपजिल्हा प्रमुख
रवि राठोड शिवसेना तालुका प्रमुख,
सौ. सविता ताई राठोड शिवसेना
महिला आघाडी संघटिका,प्रवीण देशमुख शिवसेना शहर संघटक, विस्वजित् देवकर शिवसेना उप शहर प्रमुख, उमेश राठोड शिवसेना उप शहर प्रमुख, प्रवीण मुनगिनवार नगरसेवक,
लक्समन पठाडे सभापति न्.प्. आर्णी
रमेश ठाकरे मा.प्.स्. सद्दस्य्
स्वप्नील राऊत संचालक क्रू.उत्पन्न बा.समिती आर्णी
उत्तम राठोड शिवसेना उप तालुका प्रमुख, राहुल लाभसेटवार शिवसेना विभाग प्रमुख, प्रवीण भाकरे शिवसेना विभाग प्रमुख , दिलीप राठोड शिवसेना विभाग प्रमुख, दिनेश कर्नेवार् शिवसेना विभाग प्रमुख,
अमोल जाधव शिवसेना उप विभाग प्रमुख, किशोर चव्हाण शिवसेना उपविभाग प्रमुख, अतुल देठे शिवसेना उप विभाग प्रमुख, निखिल खरोळ शिवसेना उप विभाग प्रमुख, आशिष नागेलवार शिवसेना उपविभाग प्रमुख, स्वप्नील धोटे शिवसेना उपविभाग प्रमुख, दिनेश राठोड शिवसेना उपविभाग प्रमुख, पवन वाघमारे युवासेना तालुका अधिकारी, आशिष येलने युवासेना शहर अधिकारी, गणेश बोक्से भा. वि. सेना उपजिल्हा प्रमुख, प्रत्येक गावातील शाखा प्रमुख व् शिवसैनिक आणि सरपंच ,उपसरपंच ग्राम पंचायतचे सद्दश्य् प्रामुख्याने उपस्थित हाेते..

जन्मदाती आईच झाली मुलाच्या विकृत वासनेची शिकार ; वणी तालुक्यातील ब्राह्मणी येथे घडली पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना

रिपोर्टर, आर्यन राठोड, यवतमाळ

यवतमाळ : वणी तालुक्यातील ब्राह्मणी शिवारात आपल्या जन्मदात्रीला वासनेची शिकार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.घडलेल्या घटनेमुुुळे प्रचंड संताप निर्माण होत आहे, आरोपीला पीडित मातेच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र घडलेली घटना अतिशय लाजिरवाणी व संतापजनक आहे.

जन्म देताच गळ्याला नख लावले असते तर आज ही लाजिरवाणी घटना घडली नसती. जन्मदात्रीला वासनेची शिकार करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परंतु मानवजातीला काळिमा फासणारी ही घटना मनसुन्न करणारी आहे. त्या परिसरात वास्तव्यास असलेला 27 वर्षीय नराधम अविवाहित होता. लगतच असलेल्या कोलवाशरीत तो कामाला होता. त्याला दारूचे व्यसन होते घटनेच्या दिवशी तो मद्यधुंद अवस्थेत घरी पोहचला. मध्यरात्री त्याची नियत फिरली, जन्मदात्री एकटीच झोपलेली असताना तीच्यावर बळजबरीने अत्याचार केला. स्वतःच्या मुलानेच असले अश्लिल व घृणास्पद कृत्य केल्याने त्या मातेने भल्या पहाटे विष प्राशन केले. गंभीर अवस्थेत तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पीडित माता कमालीची अस्वस्थ होती, प्रकृती स्थिर होताच तिने थेट पोलीस स्टेशन गाठले. आपल्यावर घडलेली आपबिती तिने कथन केली. ठाणेदार वैभव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य बघता तात्काळ गुन्हा नोंद केला. आरोपीला ताब्यात घेत भारतीय दंड विधान कलम 376 (2) एफ एन 323, 506 नुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण नाकतोडे करीत आहेत. या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

शिवर तांडा येथे शेतीच्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला

 

 

सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा लगत असलेल्या शिवर तांडा येथे शेतीच्या वादातून, दोन गटात हल्ला झाला असून, दामासिंग चंदु राठोड,दारासिंग चंदू राठोड,विष्णू चंदु राठोड व आईसह आपल्या शेतीच्या या वादातून झालेल्या वादासंदर्भात तिघे भाऊ पारवा पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट देण्यासाठी जात असतांना,चिखलवर्धा ता.घाटंजी येथे गैरअर्जदारांनी या तिन्ही भावांना रस्त्यामध्ये अडऊन बेदम मारहाण केल्याची माहिती पारवा पोलीस स्टेशनला मिळताच,पारवा येथील ठाणेदार गोरख चौधर,ताले साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन,पंचनामा करून हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या,दामासिंग चंदु राठोड,विष्णू चंदु राठोड यांच्या डोक्याला मार असून,दारासिंग चंदू राठोड यांच्या पोटामध्ये चाकू वार करण्यात आलेले आहे,तिघांची ही प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे,त्यांना शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे हलवण्यात आले आहेत.

 

जिल्हा रिपोर्टर, रुपेश टाक आर्णी यवतमाळ

 

माजी वनमंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संजय राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माजी वनमंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संजय राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर परिषद अध्यक्षा कालींदाताई पवार

Breaking news : यवतमाळ आर्णी तालुक्यातील इचोरा ग्रामपंचायतीत लाखों रुपयांचा भ्रष्टाचार; ग्रामस्थाची तक्रार बेदखल

अर्धवट नालीचे बांधकाम काम नागरिकांचा आरोप

यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात येणाऱ्या इचोरा ग्रामपंचायतमध्ये जवळपास साडेचार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. गावातील नागरिक अजय राठोड यांनी मुख्यमंत्री पोर्टलसह जिल्हाधिकारी, सीईओ, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

         निसकृष्ट पुलाचे बांधकाम नागरिकांचा आरोप

इचोरा ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून अनेक कामे हाती घेण्यात आली. यात वृक्ष लागवड, उघडी गटार,पूर संरक्षक भिंत, नाला बांध आदी कामाचा समावेश आहे. वृक्ष लागवडीवर लाखो रुपयांचा खर्च झाला.मात्र हातावर मोजता येतील इतकेही झाडे जगली नाही. ठेकेदाराने इतर कामे अतिशय निकृष्ट दर्जाची केली आहे. पंचायत समितीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली नाही. या सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराची तक्रार करण्यात आल्यानंतर दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

सुरक्षा भिंतीमध्ये गैरव्यवहार नागरिकांचा आरोप

भाटुंबा ते पुसद जाणाऱ्या रस्त्यालगत वृक्षांची कत्तल; पर्यावरण दिनाला पर्यावरणप्रेमींची नाराजी

 

यवतमाळ : भाटुंबा ते पुसद जाणाऱ्या रस्त्यालगत असणार्‍या सर्व झाडांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. दोन विभागांमध्ये परस्पर समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येते. प्लॅनिंग करत असताना या झाडाच विचार करणे गरजेचे होते,असे पर्यावरण प्रेमींचे मत आहे. बेसुमार वृक्ष कत्तल होत असल्याने पर्यावरण दिनानिमित्त नाराजी व्यक्त होत आहे. विभागा विभागामध्ये एकमेकाच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण झाल्याने नियोजनाअभावी अमर्याद वृक्ष तोड झाली आहे. याच्यासाठी संबंधित विभागाकडून परवानगी घेतली आहे का हा मोठा यक्षप्रश्न आहे. एकीकडे ऑक्सिजन साठी आज संपूर्ण देशात हाहाकार उडालेला असताना ही वृक्षतोड होणे म्हणजे चिंतेचा विषय आहे.

मनीष जाधव पर्यावरणप्रेमी यवतमाळ

रमेश नेवासकर यांचे निधन

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त माहिती संचालक श्री रमेश नेवासकर यांचे पोटाच्या विकाराने नुकतेच निधन झाले.ते ८१ वर्षांचे होते.त्यांच्या मागे २ मुले,१ मुलगी,सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
*अल्प परिचय*
श्री नेवासकर यांनी १९५९ साली सर्व साधारण सहायक म्हणून जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथून आपल्या सेवेस प्रारंभ केला. पुढे १९७६ साली त्यांची माहिती सहायक तर १९८१ साली जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी रायगड, पुणे,अहमदनगर, सोलापूर येथे सेवा बजावली.१९९४ साली पुणे विभागाचे उपसंचालक म्हणून तर १९९५ साली राज्याचे माहिती संचालक म्हणून त्यांची पदोन्नती झाली.१९९८ साली ते निवृत्त झाले.
श्री नेवासकर हे अत्यन्त मितभाषी, कार्यतत्पर आणि नेहमी इतरांच्या मदतीला धावून जात. त्यामुळे ते सर्व सहकारी, पत्रकार यांच्यामध्ये लोकप्रिय होते.