Sat. Sep 24th, 2022

TV INDIA

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लोकनेते नानाभााऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन किसान काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष देवानंद पवार यांची माहिती

 

१) गरजु कोविड रुग्णांकरिता काँन्संट्रेटरचे वितरण.
२) कोरोनाने मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या गरजु कुटुंबियांना बी-बियाणे वाटप.
३) कोरोनाने मरण पावलेल्यांचा अंत्यसंस्कार करणाऱ्या कोविड योद्धा यांचा सन्मान राशीसह सत्कार.
४) गरजु सलून कारागिरांना अन्न धान्याचे वाटप.
५) स्व.वसंतराव नाईक शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या सबोतच्या नातेवाईकांना जिवनावश्यक वस्तुचे वाटप.
*दिनांक 05 जुन 2021 वेळ:दुपारी 2.00 वाजता*

*स्थळ: जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय आर्णी रोड यवतमाळ*

*विनीत: डॉ. वजाहत मिर्झा, अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ*

………आयोजक……..
*देवानंद पवार*
*अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस कमिटी*

*जावेद भाई अन्सारी*
*उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ तथा नगरसेवक*

कन्यारत्न प्राप्त झाल्याच्या आनंदात वाटली निराधार महिलांना साडी चोळी.

 

 

उमरखेड प्रतिनिधी -आज मुलगी झाली म्हणजे ओझं समजणाऱ्या समाजात काही असे सुद्धा व्यक्ती असतात की, मुलगी झाली की त्याचा आनंदोत्सव साजरा करतात आणि त्यात समाजातील दुर्बल घटकांना सुद्धा सामील करून आनंद द्विगुणित करतात.
ढाणकी पासून जवळ असलेल्या सावळेश्वर येथील विक्रांत देविदास रावते यांना प्रथम कन्यारत्न प्राप्त झाल्याने त्यांनी त्या आनंदात इतरांना सहभागी करण्यासाठी आणि आपण सुद्धा समाजाचे काही देणे लागतो या हेतूने गावातील निराधार महिलांना साडी चोळी चा आहेर करून आपला आनंद व्यक्त केला.
आज फक्त पहिला मुलगाच पाहिजे या मानसिकतेत असणाऱ्या समाजात मुलगी झाली की काही लोक आपली नाक मुरडतात. विक्रांत रावते यांनी मात्र या मानसिकतेला फाटा दिला आणि मोठ्या उत्सहात पहिल्या मुलीचे स्वागत केले. त्यांच्या या कार्याचे इतरांनी सुद्धा बोध घेऊन मुलींच्या जन्माचे स्वागत करायला हवे असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी दत्तराव पाटील रावते, महेश रावते, दिनेश रावते, दत्तराव रावते, ज्ञानेश्वर देवसरकर , गजानन दिवटेवाड, उपस्थित होते.

 

रिपोर्टर, मोहन कळमकर, बिटरगाव ढाणकी

खनिज निधीमधून विहीर व पाईपलाईनची कामे करा दातोडी ग्रामस्थांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

 

 

यवतमाळ : जिल्ह्यात अनेक भागात उन्हाळ्या पूर्वीच जलसंकट निर्माण होते. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता आर्णी तालुक्यातील दातोडा येथे खनिज निधीमधून विहीर व पाईपलाईनची कामे करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत आज जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

 

 

जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात येत असलेल्या दातोडी येथे गेल्यावर्षी रेतीचा लिलाव झाला. त्यानंतर प्रशासनाकडून खनिज निधीमधून 17 लाख 50 हजाराचा निधी प्राप्त झाला. सदर निधीमधून गावाचा विकास होणे अपेक्षित आहे. परंतु ग्रामसभा न झाल्यामुळे हा निधी तसाच पडून आहे. त्यामुळे सध्या गावात पिण्याच्या पाण्याचे टंचाई निर्माण होत असून हा निधी विहीर व पाईपलाईनची कामे करण्यासाठी वापरण्यात यावा. अशी मागणी गावातील समस्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

रिपोर्टर, संजय राठोड, टीव्ही इंडिया न्यूज यवतमाळ

 

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यानी गरिबांना निकृष्ट दर्जाचा ‘मका’ का दिला – स्वामिनी चे अध्यक्ष महेश पवार यांचा आरोप

यवतमाळ : गरिबांच्या कुटुंबाला पोषणासाठी शासनाच्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ गेल्या कित्येक वर्षापासून सुरळीत सुरू होता. मात्र शासन आणि प्रशासनाच्या संगनमताने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमाने गव्हाच्या जागेवर निकृष्ट दर्जाचा मका देऊन गरिबांची थट्टा केली आहे. अशा या मुजोर प्रशासनाने गरिबाच्या तोंडातून घास काढल्याने सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी प्रशासना विरोधात एल्गार उगारला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
गरिबांना मका ऐवजी तात्काळ गहू पुढच्या महिन्यापासून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा रस्त्यावर येऊन आंदोलनाशिवाय दुसरा एकही पर्याय नाही असा इशारा महेश पवार, सुधाकर दिडशे, विष्णु शिंदे, अशोक नांदेकर यांनी दिला आहे.

हरहुन्नरी समाज योद्धा विजयकुमार रतनचंद बुंदेला यांचा ५१ वा वाढदिवस 

प्रत्येक जन्माला येणारा जीव हा प्रत्येक क्षणाला बदलत असतो,अगदी आईच्या उदरात असतानापासुनच. मानसशास्त्र म्हणतात की माणसाला घडविण्यात सगळ्यात मोठा वाटा हा त्याच्या भोवतालचा म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीचा असतो.पण तुम्ही तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला या अथवा झोपडी जन्म घ्या, भविष्य घडविणे आणि दुनिया बदलवले हे मात्र संपूर्णतः माणसाच्या हातात असते…. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण नक्की ‘कोण’ बनायचे हे जाणीव असणं अत्यंत महत्त्वाच असतं.
उदाहरणा विजयकुमार बुंदेला.यांचा आज ५१ वा वाढदिवस साजरा करत असतांना त्यांच्या कार्याची
प्रशंसा होणे नक्कीच अभिमानस्पद आहे.विजयकुमार बुंदेला यांचा जन्म यवतमाळ या ठिकाणी झाला असून त्यांच्या वडिलांचा मूळ व्यवसाय हुंडी चिठ्ठी व्यवसायाच्या माध्यमातून जन सेवा करणे तसेच गरजवंताला वेळोवेळी मदत करणे.गोरगरीब अनेक जणं यांच्या संपर्कात येत असे त्यामुळे सर्वसामान्यांना काय त्रास सहन करावा लागतो हे त्यांनी अगदी जवळून पाहिले.याच व्यवसायाच्या माध्यमातून त्याचा परिचय तत्कालीन दैनिक मातृभूमीची आवृत्ती संपादक शरद करवा यांच्याशी झाला व तेव्हापासून पत्रकारिता क्षेत्राशी प्रत्यक्ष संपर्क आला असून सर्वप्रथम वाणिज्य प्रतिनिधी म्हणून कार्याची सुरुवात केली व बुंदेला ॲड्सच्या माध्यमातून यवतमाळ शहरांमध्ये जाहिराती संकलनाचा व्यवसाय सुरू केला.त्यांनी आपले महाविद्यालयाचे शिक्षण आबासाहेब पारवेकर मधुन सुरु केले व अमरावती विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडणूक जिंकली व आबासाहेब पारवेकर महाविद्यालयाचे विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून नेतृत्वही केले.आपण सहज म्हणून जातो हा भला माणूस आहे.भल्या माणसाची व्याख्या काय ?
जो स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून दुसऱ्याच्या भलाईचा विचार करतो तो भला माणूस.मनुष्यप्राणी जन्मता भलताच असतो.त्याची जशी समज वाढत जाते, वय जसे वाढत जाते तशी स्वार्थी प्रवृत्ती पण जोर धरू लागते.ज्याच्या अंगी चांगुलपणा हे सात्विकता आहे.तो भला माणूस भला माणूस दुसऱ्याची कधी वाईट चिंतीत नाही मला माणूस दुसऱ्याच्या अध्यात-मध्यात पडत नाही.आपले काम बरे आणि आपण बरे अशी त्यांची भूमिका असते तो कधीही मोठेपणा मिरवीत चुकीचे सल्ले देत फिरत नाही.पैशाचा माज त्याला कधी शिवत नाही.कठीण समय येता कोण कोणास कामास येतो याचे उत्तर मला माणूस आहे. कुठलाही विचार न करता धावून जाणे एवढेच त्याला माहीत असते. यामुळे कधी कधी तो संकटात सापडतो भल्या माणसात माणुसकी भरलेली असते भला माणूस वेळ प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याची जीव वाचवतो भल्या माणसाच्या रक्तात लोकांचे हित जपणे सर्वतोपरी असते त्याची जीवन हे आदर्शवत असते. दुसऱ्याचे भले करता नाही आली तरी चालेल परंतु कुणाचे वाईट करता कामा नाही हीच शिकवण भला माणूस देत असतो असाच एक विजयकुमार बुंदेला
विजयकुमार बुंदेला हे एक हरहुन्नरी समाजयोध्दा असुन त्यांनी पत्रकार क्षेत्रामध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष पद भूषवित असून यवतमाळ जिल्ह्यातील लोकप्रिय दैनिक सिंहझेप या वृत्तपत्राचे ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून निर्भीडपणे पत्रकारिताकरित क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटविला आहे.आजपर्यंत विविध त्यांनी आपली समाजसेवेची कामगिरी उत्कृष्टपणे बजावत सामाजिक कार्यात नेहमी सक्रीय सहभाग नोंदवितात.त्यांच्या सामाजिक अनेक रक्तदान शिबिराचे आयोजन केले.यवतमाळ शहरातील विविध परिसरामध्ये वृक्षारोपण करणे,लायसन्स शिबिराचे आयोजन करणे,उपवर-वधू परिचय संमेलनाचे आयोजन करणे,नेत्रदान संकल्प अभियान राबविणे,त्यांचे कोरोणाच्या काळात केलेले कार्य अविस्मरणीय आहे.शेकडो गरजवंतांना वेळोवेळी मदत केली.
त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १३० च्या जवळपास मुला-मुलींना भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून पुणे येथील वाघोली प्रकल्प येथे शिक्षणासाठी पाठविण्यात आले. त्यावेळीचे जिल्हाधिकारी मा.सचिंद्र प्रताप सिंह,निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खेवले यांनी त्यांच्या केलेल्या या उपक्रमाबद्दल मुक्तकंठाने प्रशंसा सुद्धा करण्यात आली.तसेच आज पर्यंत त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून तसेच भारतीय जैन संघटना या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी समाज कार्य अविरत सुरू ठेवले त्यांनी भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष पद व नंतर विदर्भ अध्यक्ष पद भूषविले.आजपर्यंत त्यांना विविध सामाजिक संस्थांच्या दीडशेच्या वर वतीने सन्मान चिन्ह भेट वस्तू,सन्मानपत्र देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.अष्टक्षेत्रीय गौरव पुरस्कार,मानव सेवा पुरस्कार,वकृत्व स्पर्धेत जिल्हास्तरीय पुरस्कार त्यांनी प्राप्त करुन आपल्या जिल्ह्याचे नावलौकिक केले.अशा या हरहुन्नरी समाजयोध्दा विजयकुमार बुंदेला यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

नांदेडमद्धे हल्ला मह्ल्ला मिरवणुकीत पोलिसांवर हल्ला

 

नांदेडमद्धे हल्ला मह्ल्ला मिरवणुकीत पोलिसांवर हल्ला करण्यात आला.पोलीस अधीक्षक यांच्यावर तलवारीने करण्यात आलेल्या हल्ल्यात त्यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांनी आपल्या अंगावर घेतला आणि दिनेश पांडे गंभीर जखमी झाले आहेत.सोबतच पोलिसांच्या अनेक गाड्या जमावातील काही जणांनी फोडून टाकल्या आहेत.
कोवीड नियमावली जाहीर असतांना आलेला शिमगा सण पोलिसांच्या जीवावर बेतला होता. आज गुरुद्वारामध्ये दरवर्षी प्रमाणे होळी आणि हल्ला मह्ल्ला साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक बैठकांचे आयोजन केले होते.त्यात गुरुद्वारा परिसरात प्रतीकात्मक हल्ला मह्ल्ला सण साजरा करू असे सर्वानी बैठकीत सांगितले होते. त्यानुसार होळी सण साजरा झाला पण आज निघणारी हल्ला मह्ल्ला मिरवणूक आणि शिमगा पोलिसांच्या जीवावर बेतला. दुपारी नेहमी प्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले. गुरुद्वाराची सर्व गेट कुलूप लावून बंद करण्यात आली होती.सर्व धार्मिक प्रक्रिया पार पडल्यानंतर काही टोळक्याने तेथे संतांसोबत सुद्धा अभद्र व्यवहार करून बंद गेटचे कुलूप तोडले. आणि हल्ला मह्ल्ला मिरवणूक बाहेर आली.रस्ते सुनसान होते. तरीही हल्ला मह्ल्ला मिरवणूक बाहेर आल्यावर अनेक जण त्यात सहभागी झाले.
रस्त्यावर आलेल्या मिरवणुकीत सामील असलेल्या टोळक्यातील एका समाजकंटकाने पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यावर तलवारीने प्रहार केला.त्यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांनी अत्यंत जलदगतीने मध्ये धाव घेतली आणि ती तलवार दिनेश पांडे यांच्या पाठीला चिरून गेली.जखमेतून दिनेश पांडे यांचे फुफ्फुस दिसत होते यावरून जखमेची तीव्रता लक्षात येते. त्यांनतर अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,विजय कबाडे,पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर,संदीप शिवले यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी या हल्ल्यात थोडक्यात वाचले. पोलिसांच्या अनेक गाड्या कंटकांनी पूर्णपणे फोडून टाकल्या आहेत.घडलेली घटना समजताच पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,जिल्हाधिकारी डॉ.विपीन साहेब सुद्धा चिखलवाडी कॉर्नर येथे पोहचले होते….
काळजी घ्या…

YAVATMAL : ढाणकी परिसरात बिबट्याची दहशत. दोन दिवसात दोन वासरे केले फस्त.

 

उमरखेड – तालुकयातील ढाणकी शेत शिवारात बिबट्याची दहशत वाढत असून काल दिनांक 13 मार्च रोजी भीमराव नाईकवाडे यांच्या शेतातील वासरावर हल्ला करून फस्त केले तर 15 मार्च रोजी रामचंद्र चिंचोलकर यांच्या शेतातील वासरावर हल्ला केला व ठार केले.
परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचे जनावरावर हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. कालच पैनगंगा अभयारण्यात दोन वाघाचे दर्शन झाले होते. त्यामुळे बंदी भागातील वातावरण भीतीदायक झाले होते. दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत असून या आधी सुद्धा बिबट्याने अकोलीं शिवारात गाय ठार केली होती. सदर घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना तात्काळ शासकीय मागणी मिळण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
या मुळे शेतकऱ्यांनी जागरूक राहणे गरजेचं असून रात्री अपरात्री शेताकडे जाऊ नये तसेच आपली गुरे, ढोरे सुरक्षित ठिकाणी बांधण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

 

रिपोर्टर, मोहन कळमकर ढाणकी

YAVATMAL : जिल्ह्यात तीन मृत्युसह 346 पॉझेटिव्ह 224 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 13 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 346 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 224 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 80 पुरुष आणि 72 वर्षीय महिला तसेच दिग्रस येथील 70 वर्षीय पुरुष आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 346 जणांमध्ये 198 पुरुष आणि 148 महिला आहेत. यात यवतमाळातील 90, पुसद 70, महागाव 64, उमरखेड 37, दिग्रस 22, पांढरकवडा 17, दारव्हा 14, बाभुळगाव 5, घाटंजी 6, मारेगाव 3, नेर 4, राळेगाव 8, वणी 5 आणि झरीजामणी येथील 1 रुग्ण आहे.
शनिवारी एकूण 2668 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 346 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2322 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2477 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 21265 झाली आहे. 24 तासात 224 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 18287 आहे. तर जिल्ह्यात एकूण 501 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 182435 नमुने पाठविले असून यापैकी 181248 प्राप्त तर 1187 अप्राप्त आहेत. तसेच 159983 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
०००००००

राज्यात सुरु असलेली वीज तोडणी थांबवा किसान काँग्रेसची मागणी

यवतमाळ : महावितरण कंपनीतर्फे थकीत वीजबिलामुळे सुरु असलेली विजतोडणी थांबवून त्यावर योग्य व शेतकऱ्यांना परवडण्यासारखा तोडगा काढण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी केली आहे.

राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या अडचणीत आहेत. सततची नापिकी, गुलाबी बोंडअळी, कधी अतिवृष्टी तर कधी अवर्षण अशा विविध संकटांशी शेतकरी सामना करत आहेत.

कोरोनामुळे तर शेतीव्यवसाय आणखीच डबघाईला आला आहे. आता कुठे शेतकरी यामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक चणचण व वीजबिलात असलेल्या तफावतीमुळे अनेकांनी वीजबिल भरले नाहीत. पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरु झाले आहे.

त्यामुळे या कालावधीत वीज तोडणी करणे योग्य नाही. उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांनी विधिमंडळात वीज तोडणी होणार नाही असे आश्वासन दिले होते. त्याचे पालन होणे आवश्यक आहे. शासनाने याबाबत सहानुभूतीपूर्वक व गांभीर्याने विचार करून वीज तोडणी थांबवावी असे आवाहन देवानंद पवार यांनी केले आहे.

विजातोडणीबाबत महावितरण कंपनीचे अधिकारीवर्ग अतिशय कठोरपणे वागत आहेत. अनेक शेतकऱ्यांना व घरगुती वीज ग्राहकांना आलेल्या अवास्तव बिलाचाही विचार न करता विजतोडणी केल्या जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी थांबली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरासरी वीजबिले देऊन पठाणी वसुली त्यावेळी करण्यात आली होती. कृषिपंप जास्त क्षमतेचे दाखवून त्यावेळी मोठा घोळ करून ठेवण्यात आला आहे. वाढीव वीजबिलासाठी यापूर्वीच्या सरकारची पापे देखील तितकीच कारणीभूत आहे. शेतकऱ्यांना अवास्तव बिले देऊन वीज बिल माफीच्या नावाखाली ते पैसे लुटण्यात आले असा आरोप पवार यांनी केला. या लुटीचा परिणाम आता शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. महाविकास आघाडी सरकारने या प्रकारची सखोल चौकशी करावी अशी मागणीही देवानंद पवार यांनी केली.

कोरोनाच्या काळात शेतीव्यवसायाने सर्वांना तारले. सगळंकाही बंद असतांना शेतकरी राबत होता. आज तो संकटात आहे त्यामुळे त्याला दिलासा देणे हे शासन व प्रशासनाचे काम आहे. विजतोडणी मोहिमेला थांबवून या विषयावर ठोस तोडगा काढावा अशी आग्रही मागणी पवार यांनी केली आहे.

YAVATMAL : पक्षी वाचवा अभियानश सेल्फी विथ पक्षी पाणपोई २.०’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

उन्हाळ्यात बहुतांश पक्षी अन्न आणि पाण्याअभावी तडफडून मरतात. या बाबीला पायबंद घालण्यासाठी आणि निव्वळ पक्षी संवर्धनासाठी *’सेल्फी विथ पक्षी पाणपोई’* हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.गतवर्षी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान,मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातून प्रचंड यशस्वी प्रतिसाद मिळाला होता.

*करायचे काय?*
आपल्या घराच्या अंगणात,खिडकीत, झाडावर, शेतात,रस्त्याने,जेथे पक्षी नित्यनेमाने येतात.अशा ठिकाणी पक्ष्यांसाठी जलपात्र(मातीचे,स्टीलचे भांडे) ठेऊन तीत दररोज न चुकता पाणी टाकावे.सोबतच भरड स्वरूपातील दाणे ठेवावे.आणि एक सेल्फी घेऊन *9657255065* या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवावे.आपल्या सेल्फीला सोशल मीडियावर प्रसिद्धी देण्यात येईल.सोबतच आकर्षक सहभाग *ई-प्रमाणपत्र* दिले जाणार आहे.तर चला मग या तप्त उन्हात पक्ष्यांसाठी दानापाण्याची सोय करून त्यांचा जीव वाचवू या..!आणि सेल्फीला सामाजिकतेची किनार देऊ या…!