Sat. Sep 24th, 2022

Uncategorized

सुपर स्प्रेडर व्यक्तींची कोरोना चाचणी; वाढता संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना

बाईट…कुणाल झाल्टे
तहसीलदार, यवतमाळ

 

यवतमाळ : जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा दर हा 13 टक्क्यांवर पोहचला आहे. हा दर पाच टक्क्यांपर्यंत खाली आणायचा असेल तर चाचण्यांची संख्या वाढविणे हा एकमेव पर्याय आहे.त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी तालुकानिहाय चाचण्यांचे उद्दिष्ट निर्धारीत करून दिले आहे. या उद्दिष्टांची गांभिर्यपूर्वक पुर्तता करण्यासाठी सुपर स्प्रेडरसह बाजारपेठ तसेच विविध आस्थापनांमधील सर्व कर्मचा-यांची कोरोना चाचणीला आज पासून

यवतमाळ: तालुक्यात सुरुवात झाली. तहसील कार्यालय, भूमी अभिलेख, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी कॅम्प लावण्यात आला होता. यावेळी ऑटो चालक, व्यावसायिक यांनी देखील तहसील कार्यालयात येऊन चाचणी केली. शहरातील विविध भागात कॅम्प लावून कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

रिपोर विजय राठोड यवतमाळ

पैनगंगा अभयारण्यात झाले दोन पट्टेदार वाघाचे दर्शन ; नागरीकांना सतर्क राहण्याचे वनविभागाचे आवाहन

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील घनदाट अशा विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा अभयारण्यात वनविभागाच्या पथकाला गस्त घालत असताना दोन पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. माहिती नुसार त्यामधील एक नर तर दुसरी मादी आहे.

 

VO :- पैनगंगा अभयारण्यात सध्या जंगली प्राण्याचा वावर वाढला असून वाघ तसेच बिबट्यांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसापूर्वीच तालुक्यातील जेवली येथे अंगणात झोपलेल्या मुलावर वाघाने हल्ला केला होता. तर खरबी रेंजमध्ये या दोन वाघाचे दर्शन झाल्याने अभयारण्यातील नागरिक घाबरले असून नागरिकांनी सतर्क राहून जंगलात गुरे घेऊन तसेच लाकडे आणण्यासाठी जाऊ नये असे वनविभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

 

रिपोटर, मोहन कळमकर, उमरखेड

ना रस्ता, ना घरकूल, पाण्यासाठीवणवण भटकंती ; स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर ही गोकुळ हेटीवासी सोयी सुविधांपासून वंचित

यवतमाळ : देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत. शहरी भागाचा विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही सोयी सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत.ना रस्ता, ना घरकूल, पाण्यासाठी वणवण भटकंती, अशा भयावह अवस्थेत स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही गोकुळ हेटीवासीयांना जगावे लागत आहे.

यवतमाळ तालुक्यात बोथबोधन हे गाव आहे. येथूनच एक किलोमीटर अंतरावर गोकूळ हेटी आहे. बोथबोडन ग्रामपंचायत येथे नळ योजना आहे. लगत असलेल्या गोकूळ हेटी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांची पायपीट सुरू झाली आहे. पाईपलाइन टाकून आहे. विहिरीला पाणी आहे. पण एक किलो मीटरवरील गोकूळ येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. महिलांच्या सोबत लहान मुलांना पाण्यासाठी जावे लागते. पाच ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने नागरिकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. येथे गवळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा दूधाचा व्यवसाय आहे . प्रत्येक व्यक्तिकडे 50ते100 जनावर आहे. दुभत्या जनावरांना कसे जगावावे असा प्रश्न त्यांना पडला आहे . बोआर ड्रा झाले आहे.2005मध्ये पाइप लाइन टाकून नळ कनेक्शन दिले होते. गावातील विहिरी वरुन येथे योजना आहे. पूर्वी1987 मध्ये या विहिरी वरुन बोथबोडन व हगोकूळ हेटी येथे या योजनेतुन पाणी पुरवठा होता. आता पाईपलाईन चोकअप झाल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी सरपंच यांची भेट घेऊन व्यथा मांडली. मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप नागरीकांनी केला आहे. गावात रस्ता नाही. स्थानिक आमदारांनी तीन वर्षांपूर्वी रस्ता मंजूर करून निधी दिला होता. कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले. त्यामुळे आता या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. गरजू लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. दहा वर्षांपूर्वी शाळेसाठी जोता बांधण्यात आला होता. त्यापुढे शाळा बांधकामाचे घोडे कुठे अडले, हे कुणालाच माहिती नाही. डीपीही सताड उघडी राहत असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच विकासाचा गाजावाजा केला जात असला तरी गोकूळ हेटी येथील समस्या बघून सरकारचा दावा किती फोल आहे, हे दिसून येते.

वनमंत्रीपदावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा दावा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले पत्र

यवतमाळ : संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दावा केला आहे. तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. हरीभाऊ राठोड हे भटके विमुक्त आणि बहुजन समाजाचे नेते आहेत.

राज्यात शिवसेनेची सत्ता यावी यासाठी त्यांनी ओबीसी नेत्यांची मोट बांधून शिवसेनेला पाठिंबा देऊन प्रचार केला होता. त्यामुळे आमदारकीची टर्म संपल्यावर काँग्रेसकडून दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही. शिवसेनेकडून हरिभाऊ राठोड यांना वनमंत्री पद मिळाल्यास राज्यात शिवसेना अधिक मजबूत होईल, असा दावा केला आहे.

 

YAVATMAL : जिल्ह्यात पाच मृत्युसह 429 जण पॉझेटिव्ह 282 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 10 : गत 24 तासात जिल्ह्यात पाच मृत्युसह 429 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 282 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 28, 71 आणि 78 वर्षीय पुरुष, तसेच पुसद येथील 43 आणि 57 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 429 जणांमध्ये 246 पुरुष आणि 183 महिला आहेत. यात यवतमाळातील 133, दिग्रस 110, बाभूळगाव 71, पांढरकवडा 28, पुसद 24, दारव्हा 20, महागाव 15, अर्णी 8, नेर 8, कळंब 5, घाटंजी 2, वणी 2, उमरखेड़ 1 आणि 2 इतर शहरातील रुग्ण आहेत.
बुधवारी एकूण 1865 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 429 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1436 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2072 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 20172 झाली आहे. 24 तासात 282 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 17611 आहे. तर जिल्ह्यात एकूण 489 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 176891 नमुने पाठविले असून यापैकी 175792 प्राप्त तर 1699अप्राप्त आहेत. तसेच 155020 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

यवतमाळ ब्रेकिंग : जिल्ह्यात तीन मृत्युसह 301 जण पॉझेटिव्ह 236 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 7 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 301 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 236 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 61 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष आणि पुसद येथील 62 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 301 जणांमध्ये 186 पुरुष आणि 115 महिला आहेत. यात यवतमाळातील 100 रुग्ण, पुसद येथील 75, दिग्रस 65, दारव्हा 10, आर्णी 9, नेर 9, घाटंजी 7, बाभूळगाव 5, कळंब 4, महागाव 4, वणी 4, पांढरकवडा 3, उमरखेड़ 3 आणि 3 इतर शहरातील रुग्ण आहेत.
रविवारी एकूण 1516 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 301 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1215 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1937 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 19274 झाली आहे. 24 तासात 236 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 16859 आहे. तर जिल्ह्यात एकूण 478 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 172588 नमुने पाठविले असून यापैकी 171044 प्राप्त तर 1544 अप्राप्त आहेत. तसेच 151770 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
00000000

Breaking news : Yavatmal जिल्ह्यात 291 पॉझेटिव्ह तर 235 कोरोनामुक्त माहूर येथील एकाचा मृत्यु

यवतमाळ, दि. 5 : गत 24 तासात जिल्ह्यात 291 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 235 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील माहूरचे रहिवासी असलेल्या 42 वर्षीय पुरुषाचा यवतमाळ येथे कोरोनामुळे मृत्यु झाला. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 175 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 291 जणांमध्ये 182 पुरुष आणि 109 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळातील 138, पुसद 52, दिग्रस 38, उमरखेड 20, बाभुळगाव 12, दारव्हा 7, नेर 5, पांढरकवडा 5, महागाव 4, आर्णि 4, मारेगाव 3, कळंब 1, वणी 1 आणि इतर 1 रुग्ण आहे.
शुक्रवारी एकूण 1675 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 291 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1384 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1781 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 18693 झाली आहे. 24 तासात 235 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 16441 आहे. तर जिल्ह्यात एकूण 471 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 169492 नमुने पाठविले असून यापैकी 168033 प्राप्त तर 1459 अप्राप्त आहेत. तसेच 149340 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००

Breaking news : Yavatmal कोरोनासंदर्भात तालुकास्तरीय यंत्रणेचा व्हीसीद्वारे आढावा

 


यवतमाळ, : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा, पांढरकवडा, बाभुळगाव आदी तालुक्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी सुरवातीपासूनच तालुकास्तरीय समितीचे गठण करण्यात आले असून टेस्टिंग आणि काँटॅक्ट ट्रेसिंग संदर्भात गांभिर्याने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड, तहसीलदार डॉ. संतोष डोईफोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मून आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा दर कमी करायचा असेल तर दररोज किमान 3 हजार ते 4 हजार नमुन्यांची चाचणी होणे आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्याबाबत काय नियोजन केले, अशी विचारणा त्यांनी केली. तसेच टेस्टिंग आणि ट्रेसिंगचा डाटा नियमित भरावा. काही तालुकास्तरीय समितीकडून डाटा अपडेट केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. वरिष्ठ स्तरावरून कोणतीही माहिती कधीही विचारली जाते. त्यामुळे माहिती अपडेट ठेवण्याबाबत सर्वांनी गांभिर्य राखावे.
रुग्ण जास्त येत असलेल्या भागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव तालुकास्तरावरून त्वरीत जिल्हा प्रशासनाला पाठवावा. सुपर स्प्रेडरवर लक्ष केंद्रीत करावे. हाय रिस्क व लो रिस्क संपर्कातील नागरिकांचा शोध, त्यांचे नमुने घेऊन चाचणीकरीता पाठविणे, लॉकडाऊनसंदर्भात तातडीने तालुकास्तरीय समितीची बैठक घेणे आदी निर्देश त्यांनी दिले.
००००००

Yavatmal breaking news : काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या तीन अल्पवयीन बालिका ताब्यात जिल्हा महिला व बाल विकास विभागाची कारवाई

यवमताळ  : ज्यांना काळजी व संरक्षणाची गरज आहे, अशा अनाथ, निराश्रीत, पालक सक्षम नसलेल्या बालकांना बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बालकल्याण समितीच्या परवानगी (आदेश) शिवाय एखाद्या निवासी संस्थेत ठेवणे बेकायदेशिर आहे. ही संवेदनशील बाब ओळखून बाल कल्याण समिती व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली.
सदर मुलींना तातडीने बालकल्याण समिती समक्ष सादर करण्यात आले तसेच या मुलींना काळजी व संरक्षणाची गरज आहे, हे ओळखून सध्या त्यांना बालकल्याण समितीच्या आदेशाने मान्यताप्राप्त बालगृहामध्ये दाखल करण्यात आले. सामाजिक भावनेने अनेक सेवाभावी संस्था जिल्ह्यात कार्यरत आहे. मात्र काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांना ठेवण्याकरीता बालकल्याण समितीची परवानगी असणे गरजेचे आहे. तसेच अशा संस्थांना बालन्याय अधिनियम 2015 च्या कलम 41 अन्वये नोंदणी बंधणकारक आहे. विना परवानगी काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना कोणत्याही निवासी संस्थेत ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे. विनापरवानगी कुणीही निवासी संस्थेत मुले ठेवत असल्यास बालकल्याण समिती कार्यालय, शासकीय मुलांचे निरीक्षण गृह चापनवाडी, यवतमाळ 1098 व 07232-295022 या क्रमांकावर संपर्क करावा. जेणेकरून कोणत्याही बालकांचे शोषण होण्यापासून संरक्षण करता येईल, असे आवाहन ज्योती कडू यांनी केले आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, बालकल्याण समिती सदस्या संजू गभणे, तहसिलदार परसराम भोसले, ठाणेदार पी.एस.जाधव, विशेष बाल पोलीस पथकाच्या सहा. पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे, तालुका आरोग्य अधिकारी श्यामकुमार शिंदे, परिविक्षा अधिकारी गजानन जुमळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, महिला व बालविकास कार्यालयाचे रवींद्र गजभिये, सुनिल बोक्से, आकाश बुर्रेवार, वनिता शिरफुले, तसेच पोलीस विभागाचे संतोष गावंडे, अमित लोखंडे, अरूण राठोड आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.
०००००००