Sat. Sep 24th, 2022

TV INDIA

Breaking news : एकाच मतपत्रिकेवर सरपंच, उपसरपंचाची निवड सावर येथील प्रकार; ग्रामपंचायत सदस्यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातील सावर येथे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचपदाच्या निवड प्रक्रियेत एकाच मतपत्रिकेवर निवडणूक घेत अध्यासी निवडणूक अधिकारी यांनी घोळ घातला. त्यामुळे ही निवड प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी नायब तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रारीतून केली आहे.

 

अध्यासी अधिकारी एन. आर. भोंगाडे यांनी सर्व सदस्यांना हात वर करून सरपंच निवडीची प्रक्रिया समजावून सांगितली. गुप्त मतदानासाठी कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन न घेता सदस्यांना सरंपच व उपसरपंचपदाच्या उमेदवारासाठी निश्‍चित केलेल्या अर्जाची प्रत सोपविण्यात आली. एकाच बॅलेट पेपरवर ही निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदी मंदा गुल्हाने तर उपसरपंचपदी मोहम्मद इलियास यांची निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी भोंगाडे यांनी त्यांच्या प्रोसिडींगमध्ये प्रथम सरपंच व नंतर उपसरपंचपदाची निवडणूक घेतली, अशी नोंद घेती. प्रत्यक्षात मात्र, दोन्ही पदाची निवडणूक एकाच मतपत्रिकेवर घेतली. नियमबाह्य झालेली ही निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली. निवेदनावर नितीन राठी, वैशाली पसोडे, मंगला शिवणकर, मीरा शेंडे,सुनील क्षीरसागर, सविता गौरकार यांची स्वाक्षरी आहे.

ब्रेकिंग न्यूज : जिल्ह्यात दोन मृत्युसह 511 जण नव्याने पॉझेटिव्ह 194 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 2 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह तब्बल 511 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 194 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये बाभुळगाव तालुक्यातील 73 वर्षीय आणि मारेगाव तालुक्यातील 67 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 511 जणांमध्ये 303 पुरुष आणि 208 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळातील 174, पुसद 164, दिग्रस 34, दारव्हा 28, पांढरकवडा 18, बाभुळगाव 17, उमरखेड 13, आर्णी 12, घाटंजी 12, वणी 09, महागाव 04, कळंब 02, मारेगाव 01 व इतर 1 रुग्ण आहे.
मंगळावारी एकूण 2736 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 511 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2225 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1803 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 18086 झाली आहे. 24 तासात 194 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15816 आहे. तर जिल्ह्यात एकूण 467 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 164838 नमुने पाठविले असून यापैकी 164313 प्राप्त तर 525 अप्राप्त आहेत. तसेच 146227 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००

ब्रेकिंग न्यूज : आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर ; अधिवेशनात समस्या निकाली न निघाल्यास आंदोलन

यवतमाळ : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार आपले अपयश लपवत आहे. अधिवेशनात समस्या निकाली न निघाल्यास आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शेतकरी नेते मनीष जाधव यांनी दिला आहे.


यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड नैराश्याच्या गर्तेत सापडला असून त्याच जगणे हे निखाऱ्यावर चे झालेले असताना पालकत्व हरविलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडून आपल अपयश लपवत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. लागवडीचा खर्च निघाला नाही. आणेवारी कमी निघाली मात्र, कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. मनीष जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून लक्ष वेधले आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली निघणार काय याकडे लक्ष लागले आहे.मनीष जाधव
जिल्हाध्यक्ष, शेतकरी स्वाभिमानी संघटना

ब्रेकिंग न्यूज : पालकमंत्री सुनिल केदार यांनी केली रात्री गोल मार्केट परिसराची पाहणी

वर्धा शहरात गोल मार्केट परिसरात लागलेल्या भीषण आगीत आज तब्बल 10 ते 15 दुकाने संपूर्ण जळून खाक झाले. यात भाजी व्यवसायिक आणि फ्रूट व्यवसायिक यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. सांगितले गेले तब्बल वीस ते पंचवीस लाख रुपयाचे नुकसान या संपूर्ण भागामध्ये या आगीमुळे झाले.
या परिसराची संपूर्ण पाहणी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी आज रात्रीच्या ११.३० वाजता वाजताच्या सुमारास केली असता ते म्हणाले पहिले प्राधान्य मी नुकसान झालेल्या व्यवसायिकांना कशा स्वरूपात मदत करता येईल याकडे बघेल आणि नंतर री स्ट्रक्चर कडे वळणार.
विशेष करून पालक मंत्री म्हणाले मी आज मुंबईत होतो परंतु मला या घटनेबद्दल माहिती मिळताच मी थेट इथे पोचलो आणि हे सरकार महा विकास आघाडीचे सरकार आहे आणि त्या नात्याने मी नक्की आश्वासन देतो की ज्यांचे नुकसान झाले ते भरपाई नक्कीच मिळणार परंतु हे भरपाई कशा स्वरूपात मिळेल हे मी आत्ताच सांगू शकणार नाही.
संपूर्ण घटनेचे तपास करून ही आग कशामुळे लागली किंवा लावल्या गेली हे बघितलं जाणार असेदेखील पालकमंत्री म्हणाले.

 

ब्रेकिंग न्यूज : संपत्तीच्या वादातून काकान जाळली पुतण्याची जिनिंग फॅक्टरी, पुतण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न 

वर्धा : पुतण्याची जिनिंग फॅक्टरी जाळली.. सोबतच पुतण्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय… वर्ध्याच्या आर्वी इथं ही घटना घडलीय.. दीपक त्र्यंबक देशमुख राहणार वाढोना असं जिनिंग जाळणाऱ्या काकाच नाव आहेय.. आर्वी येथील कौस्तुभ देशमुख हा त्याच्या जिनिंगमध्ये काम करत होता.. यावेळी तलवार घेऊन आलेला काका दीपक देशमुखन कौस्तुभला धमकावल.. पेट्रोल टाकून कापसाची जिनिंग जाळली.. कौस्तुभन कस तरी जीव वाचवून पोलीस ठाण गाठलं.. पोलिसांनी दीपक देशमुख तसच गाडीचालकाला ताब्यात घेतलं.. यात जिनिंगच 40 ते 50 लाखांचं नुकसान झालं..

ब्रेकिंग न्यूज : ओंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीचा यात्रा महोत्सव रद्द जिल्हाधिकारी यांचे आदेश

हिंगोली जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढतच आहे देशातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री महोत्सवा निमित्त मोठी यात्रा भरते जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यात्रा रद्द करण्याचे आदेश काढले आहेत देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त मोठी यात्रा असते रथ उत्सव कार्यक्रम यात्रेतील प्रमुख आकर्षण असून नागनाथ मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात सुमारे दोन लाख भाविकांची उपस्थिती असते मात्र यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आलीये.

ब्रेकिंग न्यूज : यवतमाळ येथे प्रभाग क्र १७ ऑनलाईन जनता दरबार उपक्रम

 

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अंकुश पांडे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र १७ या भागात ऑनलाईन जनता दरबार सुरू करण्यात आला असून नागरिकांनचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ऑनलाईन जनता दरबार मध्ये परिसरातील नागरिकांच्या विविध तक्रारी व समस्या या कॉल,मॅसेज,सोशल मीडिया च्या माध्यमातून अंकुश पांडे हे जाणून घेत असुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रभाग क्र १७ मध्ये ऑनलाईन जनता दरबार हा सोमवार ते शनिवार सुरू राहत असुन दर आठवड्याच्या शेवट नागरिकांच्या समस्या व तक्रारी नगर पालिका व संबंधित विभागाला निवेदनाद्वारे सांगण्यात येते व नागरिकांच्या काही तक्रारी या अंकुश पांडे स्वतःजाणून घेत असुन त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येते ऑनलाईन जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळत असून विविध विभागाच्या अनेक तक्रारदारांच्या तक्रारी आल्या असुन त्या सोडविण्यासाठी अंकुश पांडे प्रयत्न करत आहे तक्रारदारांचा प्रतिसाद पाहता, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या पुढे दर आठवड्याच्या प्रत्येक दिवशी ऑनलाईन जनता दरबार घेतला जाईल असे सांगण्यात येत आहे. ऑनलाईन जनता दरबार मध्ये महसूल विभाग, पोलिस विभाग, विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, नगरपालिका या खात्यांबाबत नागरिकांच्या सर्वाधिक तक्रारी होत्या.या उपक्रमाबाबत अंकुश पांडे म्हणाले, प्रशासकीय स्तरावर जनतेच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे लोकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन ते सुटावेत, यासाठी ऑनलाईन जनता दरबार सुरू करण्यात आला. या पुढे प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेतला जाईल. सार्वजनिक प्रश्नाबरोबर खासगी प्रश्न सरकारी यंत्रणेसाठी संबंधित असलेले सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी ऑनलाईन जनता दरबाराचे आयोजन केले आहे. या मध्ये आलेल्या तक्रारींचा प्रामुख्याने पाठपुरावा करून लोकांचे प्रश्न सोडविले जातील. स्थानिक नागरिकांच्या समस्या सुटाव्या या करिता अंकुश पांडे यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन जनता दरबाराला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे..

ब्रेकिंग न्यूज : भाजपा युवा मोर्चा यवतमाळ च्या वतीने दारव्हा येथे नगडा बजाव आंदोलन

यवतमाळ : पूजा चव्हाण हिला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने दारव्हा येथे नगाडा बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दारव्हा हा संजय राठोड यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़.

आकाश धुरट,
भाजप युवा मोर्चा, पदाधिकारी, यवतमाळ.

ब्रेकिंग न्यूज : यवतमाळ येथे अवैध दारुविक्रेते तिघे गजाआड शहर पोलिसांची कारवाई

यवतमाळ ) : संचारबंदीचे आदेश धुडकावून सर्रास अवैधरित्या दारुविक्री करणा-या तिघांना यवतमाळ शहर पोलिसांनी अटक केली. यामध्ये देशी विदेशी दारुसाठ्यासह 51 हजार 290 रूपयाचा मुदे्माल जप्त करण्यात आला. ही कारवाई छोटी गुजरी, पिंपळगाव परिसरात आज करण्यात आली.
कमलेश गणेशलाल पातालबंशी, शैलेश महादेव पातालबंसी, दोघेही रा. छोटी गुजरी चौक, तसेच नरेंद्र राजेंद्र जयस्वाल, रा. पिंपळगाव असे अटक करण्यात आलेल्या दारु विक्रेत्यांची नावे आहेत. जिल्ह्यामध्ये वाढत्या कोवीड संक्रमणामुळे जिल्हाधिकारी साहेब, यवतमाळ यांचे आदेशान्वये आज संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान पोलिस अधिक्षक दिलिप भुजबळ पाटील यांनी यवतमाळ शहरासह इतर ठिकाणी सुरु असलेल्या अवैधदारु विक्री अड्यावर धाडसत्र राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज  शहरात विविध भागात धाडसत्र राबविण्यात आले. यामध्ये पिंपळगाव व छोटी गुजरी परिसरातुन 51 हजार 210 रुपयाचा मूद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच संबधीत तिन्ही आरोपींना ताब्यात घेवुन गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मनोज केदारे, सपोनि भाकडे, पोलिस उपनिरीक्षक  बोरकर, सफौ क्षिरसागर आदींनी केली.

ब्रेकिंग न्यूज : पूजा चव्हाणच्या आई,वडील आणि बहिणीनी घेतली मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट !

या प्रकरणी विरोधी पक्ष गलिच्छ राजकारण करत असून पूजा चव्हाण हिचे आई-वडील आपल्याला भेटले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या भेटीत त्यांनी माझ्याकडे एक पत्र दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या पत्रात पूजाच्या आई-वडिलांनी घेतलेल्या भूमिकेची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
यावेळी पूजाच्या आई-वडिलांनी दिलेल्या पत्राने संपूर्ण प्रकरणाला मिळाली कलाटणी !