Sat. Sep 24th, 2022

Uncategorized

Breaking news : एकाच मतपत्रिकेवर सरपंच, उपसरपंचाची निवड सावर येथील प्रकार; ग्रामपंचायत सदस्यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातील सावर येथे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचपदाच्या निवड प्रक्रियेत एकाच मतपत्रिकेवर निवडणूक घेत अध्यासी निवडणूक अधिकारी यांनी घोळ घातला. त्यामुळे ही निवड प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी नायब तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रारीतून केली आहे.

 

अध्यासी अधिकारी एन. आर. भोंगाडे यांनी सर्व सदस्यांना हात वर करून सरपंच निवडीची प्रक्रिया समजावून सांगितली. गुप्त मतदानासाठी कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन न घेता सदस्यांना सरंपच व उपसरपंचपदाच्या उमेदवारासाठी निश्‍चित केलेल्या अर्जाची प्रत सोपविण्यात आली. एकाच बॅलेट पेपरवर ही निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदी मंदा गुल्हाने तर उपसरपंचपदी मोहम्मद इलियास यांची निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी भोंगाडे यांनी त्यांच्या प्रोसिडींगमध्ये प्रथम सरपंच व नंतर उपसरपंचपदाची निवडणूक घेतली, अशी नोंद घेती. प्रत्यक्षात मात्र, दोन्ही पदाची निवडणूक एकाच मतपत्रिकेवर घेतली. नियमबाह्य झालेली ही निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली. निवेदनावर नितीन राठी, वैशाली पसोडे, मंगला शिवणकर, मीरा शेंडे,सुनील क्षीरसागर, सविता गौरकार यांची स्वाक्षरी आहे.

Breaking news यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात जवळा गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित पुढील आदेशापर्यंत सिमा बंद

यवतमाळ, दि. 24 : यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे रुग्ण आढळून येणारा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत निर्देशित केले आहे. उपविभागीय अधिकारी, यवतमाळ यांनी आर्णी तालुक्यातील जवळा या गावात कोविड पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने सदर गावास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत प्रस्तावित केले आहे. त्यानुसार आर्णी तालुक्यातील जवळा या गावास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागाच्या सिमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिला आहे.
या आदेशाच्या कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी / कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेकरीता कर्तव्य करण्याची मुभा राहील. तसेच जवळा ग्रामपंचायतीच्या सचिवांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना/ पासेस निर्गमित कराव्यात आणि सदर्हु परवाना/ पासेस धारकांची यादी संबंधित पोलीस स्टेशन अधिका-यांना तात्काळ द्यावी. सदर्हु परवाना / पासेस धारकांना अत्यावश्यक सेवा, पोलीस स्टेशन अधिकारी यांनी नेमून दिलेल्या ठराविक वेळेत पुरविण्याची मुभा राहील. तसेच सदर्हु अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सामाजिक अंतरचे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सचिव यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांचे मार्फत करावी.
तसेच प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेले नियम वरील नमूद प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू राहतील. जे वरील आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
००००००

तीन अनोळखी व्यक्तीकडून तरुणाला मारहाण पिंपळगाव परिसरातील घटना

यवतमाळ : पिंपळगाव परिसरात मांडवकर यांच्या बिअर शॉपी पुढे तीन अनोळखी इसमांनी विनाकारण वाद उपस्थित करून एका दुचाकी चालकाला बेदम मारहाण केली. तसेच जखमी दुचाकी चालकाचा मोबाईल, सोन्याची अंगठी व चांदीचा ब्रेसलेट पळवून नेला. याप्रकरणी 21 फेब्रुवारीला दुपारी तक्रार दाखल करण्यात आली.
शैलेंद्र प्रकाश सिंग ठाकूर (28) राहणार विसावा कॉलनी असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.घटनेनंतर त्यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी अज्ञात इसमाने विरुद्ध गुन्हा दाखल केला.
___________

नियम पाळू लॉकडाउन नकोच; सामान्य नागरिकांची अपेक्षा

यवतमाळ : फेब्रुवारी महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने जिल्हा प्रशासनाने यवतमाळ जिल्ह्यात 28 फेब्रुवारी पर्यंत संचारबंदीचे आदेश जारी केले आहे. यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, पुसद, पांढरकवडा आदी तालुक्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. नियमांचे गांभीर्याने पालन करू पण लॉक डाउन नकोच अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे.

मागील एक वर्षापासून कोरोनासोबतच लढा सुरूच आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, हे नियम पाळण्याचे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात आले. तरीदेखील नागरिकांनी त्याकडे पाठ फिरविली. लग्न व सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी केल्याने कोरोनोचा संसर्ग वाढण्यास मदतच झाली आहे. लॉकडाउनच्या काळात अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. उपासमारीची वेळ आली. यातून सावरत असताना पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शासनाने कडक निर्बंध करावेत, मात्र लॉकडाउन नको,याकडे नागरिकांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

 

ओला दुष्काळ जाहीर करा जिल्हाधिकारी यांच्याकडे भूमिपुत्र शेतकरी संघटनेची

 

यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा जिल्हाधिकारी यांच्याकडे भूमिपुत्र शेतकरी संघटनेची मागणी.

 

 

शेतकरी अनेक संकटाचा सामना करीत करीत आज पर्यंत त्यांनी आपले शेत फुलविले आहेत परंतु मागील सतत सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस उडीद मूग अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुस्कान झालेल्याचे यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिसून येते याच बाबीचा गांभीर्याने विचार व्हावा आणि ओला दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन देऊन मागणी केलेली आहे निवेदन देते वेळेस युवक यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विशाल भाऊ राठोड जिल्हा संपर्कप्रमुख मनिष गोठे अमरदीप वाहुळे महेश ढेंगळे आदी भूमिपुत्र संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आहे.

नुकसनामुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता; शेतकरी नेते सिकंदर शहा; मदत न मिळाल्यास नेत्यांना गावबंदी

 

यवतमाळ : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. भरीव मदत न मिळाल्यास शेतक-यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता असून या आत्महत्यांना राज्य तसेच केन्द्रातील सरकार जबाबदार राहील असा आरोप शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केला आहे. ते यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते.

 

यवतमाळ जिल्हयात जवळपास 80 टक्के शेतकरी अल्पभुधारक आहे. नैसर्गीक संकटामुळे शेतकरी आर्थीक दृष्ट्या संकटात सापडला आहे. सोयाबिन तर पुर्णता नष्ट झाले आहे. हजारो शेतक-यांचा कापूस पावसामुळे काळवंडला असून कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले. उरलेल्या कापसाच्या बोंडावर आता बोंडअळींचा प्रकोप सुरु झाला आहे. अशा परीस्थितीत समोर येणारे सण तसेच रब्बी हंगाम बघता शेतक-यांचा कापूस खरेदी करणे गरजेचे आहे. राज्य सरकारजवळ पैसेच नसल्यामुळे शेतक-यांना मदत मिळेल कि नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अतिवृष्टीमुळे शेतक-यांवर आर्थीक संकट आले आहे. दिवाळीपुर्वी मदत न दिल्यास लोकप्रतिनिधींना गावात पाय ठेऊ देणार नाही. जागोजागी घेराव घालून लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही.असा इशारा देण्यात आला आहे.

 

विक्रमादित्य धनंजय तांबेकर एक बहुआयामी व्यक्तिमत्व..

 

धनंजय तांबेकर सर यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला. कुटूंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती पण अशा विपरित परिस्थितीतही त्यांना त्यांच्या आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा होता. या आशिर्वादाच्या शिदोरीवर त्यांनी ‘’कमवा आणि शिका’’ याप्रमाणे आपले उच्चविद्याविभूषित एमबीए फायनान्स पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबतच त्यांना कराटेची आवड होती ‘’मार्शल आर्ट’’ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर असंख्य पारितोषिके प्राप्त केले. सोबतच दहा हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना स्वरंक्षणाचे धडे दिले. आयुष्यात प्रगती करायची असेल कोणत्याही कामाला कमी लेखु नका आपण केलेलं प्रत्येक काम हे आपल्या यशाची पायरी तयार करत असते हे वाक्य आम्हां सर्वांना कायम प्रेरणा देऊन जाते.
अत्यंत शिस्तप्रिय व्यक्तीमत्व दिवसाचा प्रत्येक वेळेचा त्यांचा स्वतःचा शेड्युल ठरलेला असतो जितक कामाप्रती प्रेम तितकेच आरोग्याप्रती जागरूक आहेत. इतक्या व्यस्ततेतही रोज सकाळी ३० ते ४० किलोमीटर सायकलिंग देखिल करतात. त्यांच्या बोलण्यातून प्रत्येक वेळी काहीतरी नविन शिकायला मिळत असते. ते उत्तम वाचक असून त्यांना वाचनाची आवड आहे. त्यांच्या वाचनात आलेली चांगली पुस्तके आम्हां सर्वांना शेअर करत असतात यासोबतच समाजातील विविधांगी व्यक्तींना भेटण्याचा छंद देखिल त्यांना आहे. दैनंदिन कामकाजात त्यांच्याकडून मी बऱ्याच बाबी शिकलो आहे आणि अजूनही शिकतच आहे. सरांचा प्रत्येक बाबीकडे पाहण्याचा चिकित्सक अंदाज असतो. आपण विचारही करू शकत नाही अशा पध्दतीने सर विचार मांडतात. मी कायम सरांना माझे सहकारातील गुरू आहात असे म्हणत असतो आणि आहेतच.
गुणग्राही संस्थापक खासदार हेमंत पाटील साहेबांनी या अभ्यासू व्यक्तिमत्वाची चमक ओळखून तांबेकर सरांवर गोदावरीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी अत्यंत विश्वासाने सोपवली आणि ती त्यांनी अत्यंत ताकदीने तोलून धरून संस्थेला नावारूपास आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. संस्थेच्या रोज चालणाऱ्या कामकाजाबद्दलच्या नियोजनाचं अध्यक्ष राजश्रीताई पाटील हे प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवून असतात पण हे करीत असताना तांबेकर सरांच्या ज्ञानाची आणि तळमळीची जाणीव ठेऊन योग्य ते व्यक्ति स्वातंत्र देखील सरांच्या कार्यकर्तृत्वास मोकळं आकाश देण्यास महत्वपूर्ण ठरते. संस्थेच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेताना संचालक मंडळही तेव्हढ्याच ताकदीने कर्मचाऱ्यांना पाठबळ देतात.
संस्थापक,अध्यक्ष,संचालक आणि कर्मचारी यांचा सकारात्मक ताळमेळ या वाटचालीत अत्यंत महत्वाचा आहे हे आवर्जून सांगावं वाटत. ग्राहक जोडण्याच्या बाबतीत तांबेकर सरांचे स्वतःचे असे वैशिष्ट्यपूर्ण तत्व आहे. एकदा जोडलेला माणूस कुठल्याही परिस्थितीत आपल्यापासून दूर जाऊ नये यासाठी ते नेहमी आग्रही असतात.
‘’संस्थेचे सन्माननीय ग्राहक हेच आपले दैवत आहे’’ अशी श्रद्धा कर्मचारी वर्गात त्यांनी निर्माण केली आहे. आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना सतत सहकाराचे ज्ञान देत प्रशिक्षण दिल्यामुळे चांगली कर्मचारी वृंदांची टीम गोदावरी अर्बनमध्ये कार्यरत आहे .

गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री पाटील यांनी सर्वसामान्य व्यक्तीचं हित लक्षात घेऊन स्थापन करण्यात आलेल्या गोदावरी अर्बनच्या पाच राज्यात शाखा विस्तार आहे.
व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर हे सहकार क्षेत्रात गेली २८ वर्षांपासून कार्यरत असून ते ‘’बँकिंग तज्ञ’’ आहेत त्याच बरोबर राज्य व सहकार फेडरेशन सारख्या नामवंत प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो युवकांना बँकिंगचे मागर्दशन करीत असतात सरांच्या सूक्ष्म नियोजनानुसार अंत्यत पारदर्शक व्यवहार गोदावरी अर्बन करीत आहे. “गोदावरी अर्बन” ने अल्पावधीतच सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य फेडरेशनचा ”सहकार शक्ती पुरस्कार” त्यांना प्राप्त झाला आहे.
संस्थेने सहकार क्षेत्रातील अनेक विक्रम मोडीत काढण्याचा बहुमानच प्राप्त केला. नुकताच संस्थेने १००० कोटींचा ठेवीचा पल्ला गाठला आहे. सहकार क्षेत्रातील नामवंत अनेक पुरस्कार गोदावरी अर्बनच्या शिरपेचात लावले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सलग ४ वेळा बँको, सहकार सुगंध, नॅशनल अवार्ड, अर्थरत्न, दीपस्तंभ, प्रतिबिंब, प्राईड ऑफ महाराष्ट्रा, बेस्ट चेअरमन असे नामवंत पुरस्कार संस्थेला आपल्या कार्यशैलीमुळे अल्पावधीतच मिळाले आहेत.
संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांच्या दुरदृष्टीतुन अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनात व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनाखाली पाचही राज्यात “गोदावरी अर्बन” च्या सर्व शाखा नामांकित बँकांना देखिल लाजवतील इतक्या सुसज्ज देखण्या आणि संगणकीकृत आहेत. संस्थेची कर्मचारी भरती ही अत्यंत पारदर्शक पध्दतीने केली जाते. प्रत्येक शाखेत उच्चविद्याविभूषित अधिकाऱ्यांची नेमुणक केलेली आहे. पाच राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे सातत्याने “सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट” प्रशिक्षण घेतले जातात.
संस्थेचा पाच राज्यात शाखा विस्तार असल्यामुळे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सरांच्या शिस्तीत तयार झालेल्या टीम सातत्याने तपासणी व प्रशिक्षण देत असतात. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याकरीता विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात येते. तसेच त्यांच्या सुख-दुःखात कुटुंबियाप्रमाणे संस्था सातत्याने पाठिशी ठामपणे खंबीर उभी राहते. कर्मचाऱ्यांनी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करावे यासाठी गोदावरी अर्बन ही आपली मातृसंस्था असून आपल्या निष्ठा पवित्र असाव्यात असा मूल्यात्मक संस्कार स्वतःच्या कार्यप्रणालीतुन व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर सातत्याने कर्मचाऱ्यांवर करीत असतात.
आपल्या सहकाऱ्यांना आणि संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल कसे घडून येतील यासाठी ते सतत जागरूक असतात. अगदी शिपाई वर्गापासून प्रत्येकाला छोट्या-छोट्या बाबी सांगून प्रत्येकाचा उत्कर्ष व्हावा यासाठी त्यांची नेहमीच तळमळ असते. ‘’जे जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जण’’ या उक्तीप्रमाणे त्यांचे वागणे असते. अत्यंत अध्यात्मिक प्रवृत्तीचे असलेले तांबेकर सर कायम समर्पण ध्यान, योग, चिंतनाच्या सहाय्याने आपली मानसिक आरोग्य अबाधित ठेवत राहतात. नवनवीन टेक्नॉलॉजीच्या बाबी समजून घेऊन नवीन पिढीसोबत अद्ययावत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न ज्ञानाच्या बाबतीत सातत्यपूर्ण असतो.
सतत कार्यमग्न राहणे, वेळेचे योग्य नियोजन, नको असलेल्या गोष्टींना नम्रतापूर्वक नाही म्हणणे, आपल्या विचारांचं आणि कार्यकर्तृत्वाचं स्वतंत्र दालन निर्माण करणे या त्यांच्यातील बाबींमुळे सहकार चळवळीतील उत्तुंग भविष्यकालीन अशा प्रचंड उंचीवर या व्यक्तिमत्वास आम्हाला बघायला मिळणार आहे. यासाठी आमच्या संपूर्ण गोदावरी परिवाराच्यावतीने तांबेकर सरांना वाढदिवसा निमित्त कोटी-कोटी शुभेच्छा…!

रिपोटर, संजय राठोड टीव्ही इंडिया न्यूज यवतमाळ

 

वागद इजारा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती साजरी

 

महागाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वागद इजारा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्तानेराज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या गांधी जयंती निमित्त आवाहनाला प्रतिसाद देत शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांनी गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत या राष्ट्रपित्याला गावातील प्रतिष्ठित नागरिक मोतीराम चव्हाण निवृत्त मुख्याध्यापक व रमेश भाऊ जाधव नाईक व शेरसिंग आडे निवृत्त पोलिस नायक व मनीष भाऊ जाधव शेतकरी नेते यांनी फोटोचे पूजन करून अभिवादन केले आज 2

 

ऑक्टोंबर 2020 ला वागद इजारा ग्रामपंचायत कार्यालयासमोर या गावाच्या ग्रामपंचायत मध्ये शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही गावामध्ये भौतिक मूलभूत सोयीसुविधा चा अभाव असल्याकारणाने स्थानिक ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी दिनांक 11 / 8 /2020 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती महागाव यांच्यामार्फत महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री माननीय ना श्री हसन मुश्रीफ यांच्याकडे लेखी निवेदन करून गावातील झालेल्या अनागोंदी आर्थिक अनियमितता बाबत सखोल चौकशी करून निरपेक्ष न्यायाची मागणी करण्यात आली होती पण दुर्दैवाने या निवेदन पत्राला शासनाकडून सकारात्मक उत्तर न आल्याने दुर्लक्ष केल्याने आज दिनांक 2 ऑक्टोबर 2020 राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त या एक दिवसीय आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन मनीष भाऊ जाधव शेतकरी नेते यांनी केले आहे या मध्ये —-त्यांच्या मागण्या दिनांक 11 / 8 / 2020 च्या निवेदन पत्रातील अंतर्भूत असलेल्या खालील प्रमाणे मागण्या —1 ) गावामध्ये पुरवठा होणाऱ्या पाण्यामधून नारू आढळल्यामुळे गावातील बंद अवस्थेत असलेल्या आरो फिल्टर ला तातडीने चालू करण्यात यावे 2 ) गावांतर्गत झालेल्या तांडा सुधार विकास वस्ती अंतर्गत व ठक्कर बापा योजनेअंतर्गत रस्त्याच्या निकृष्ट व गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी 3 ) दिनांक 28 / 8 / 2018 च्या घेतलेल्या ग्रामपंचायत सभा अनुषंगाने ठराव क्रमांक 12 नुसार गावांतर्गत अंगणवाडीची इमारत ही तीन वर्षापासून बांधून झाली असून इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने या अंगणवाडीत इमारतीला तडे गेले असून या इमारतीच्या बांधकामासाठी जबाबदार असणाऱ्या शाखा अभियंता व कंत्राटदारावर चौकशी करून फौजदारी कारवाई करावी असा ठराव एक वर्षापूर्वी ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आला होता पण यावर अद्याप पर्यंत शासन व प्रशासन स्तरावर कारवाई करण्यात आली नाही 5 )– चालू 14 वित्त आयोग यामध्ये समशान भूमीमध्ये च्या कंपाऊंड करण्यात आले असून यासाठी वापरले गेलेले साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असून या कामाची चौकशी करण्यात यावी 6 ) covid-19 सारख्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावामध्ये निकृष्ट दर्जाचे मास्क व सैनी टायझ देण्यात आले होते या निकृष्ट दर्जाच्या दिल्या गेलेल्या साधनांच्या खरेदीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाले असून येत असून याची सुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी 7 ) दलित विकास अंतर्गत समाज भवनाचे काम करत अनेक वर्षापासून या कालखंडातील कंट्रोल करणे हे काम सोडून गेल्यामुळे हे काम चांगल्या गुणवत्तेमध्ये व्हावे यासाठी माती मिश्रित रे तिला विरोध केल्यामुळे हे ठेकेदार निकृष्ट दर्जाचे साहित्याचा वापर करण्यासाठी प्रयत्न करीत होते हा प्रयत्न गावकऱ्यांनी हाणून पाडला असता आज रोजी हे काम कंत्राटदाराने बंद केलेल्या सदर कामाचे सुद्धा चौकशी करून कॉन्ट्रॅक्टरला काळया यादीत टाकण्यात यावे व याची चौकशी करण्यात यावी गावांमध्ये शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेसाठी आर ओ वाटर फिल्टर पाच वर्षांपूर्वी बसविण्यात आले असून पण दुर्दैवाने ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे हे यंत्र धूळ खात पडून आहे सात वर्षांपूर्वी बांधकामाचे अपूर्ण राहिलेले राजीव गांधी भवनाचे काम यांची आर्थिक सखोल चौकशी करण्यात यावी गावांतर्गत हा पण हातपंपावर चार ठिकाणी मोटर पंप बसविण्यात आले आहे यामध्ये मोठे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दृष्टीक्षेपात येते याबद्दल सुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी गावांतर्गत लावल्या गेलेल्या सौर ऊर्जेचे लाईट बॅटरी चोरट्याने लंपास केली त्यामुळे गावात सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधार असतो चोरी गेलेले यासंबंधाने प्रशासकीय स्तरावर चौकशी करण्यात यावी व पोलिस प्रशासनाला विद्यमान प्रशिक्षकांकडून गुन्हा नोंदविण्यात यावा ही ग्रामपंचायत 2011 पासून अस्तित्वात आल्यापासून शासनाच्या ग्रामविकास महा पोर्टल अपडेट नसल्याने दहा वर्षापासून घरकुल सारख्या महत्त्वकांक्षी योजना प्रथम गावातील नागरिक वंचित राहिलेल्या यामध्ये माझ्या हस्तक्षेपामुळे चालू आर्थिक वर्षात नवघर स्कूल प्राप्त झाली त्यामध्ये रमाई आंबेडकर आवास योजनेअंतर्गत 7व महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन घरकुलाचा लाभार्थ्यांचा समावेश आहे या गावाला विशेष अतिरिक्त बाब म्हणून घरकुलाचा अनुशेष तातडीने भरून काढण्यात यावा या गावांमध्ये ग्रामपंचायतच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात 14 वित्त आयोगाच्या विकास कामांच्या बाबतीत आर्थिक अनियमितता झाली असून सर्व गुणवत्ताही कामाची ग्रामपंचायतीची आर्थिक लेखाजोखा शासकीय स्तरावर ऑडिट करून सखोल चौकशी करण्यात यावी सदर निवेदन प्राप्त झाल्यापासून 60 दिवसाच्या आत सर्व विषयाचे चौकशी करण्यात यावी अन्यथा महागाव पंचायत समिती व तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण तयारी गावकऱ्यांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेली आहे करिता शासनाचे विषयाची गंभीरता लक्षात घेऊन दिलेल्या निवेदनाला अनुरूप उचित कार्यासाठी अग्रेषित करावी , या आंदोलनाच्या स्थळी मनीष भाऊ जाधव यांची भेट जी एस गौतम ठाकूर विस्तार आधिकारी व एस एस मस्के ,ए बी सुर्यवनशी ग्रामसेवक यांनी केलेल्या मागणीचा संदर्भात निवेदनातील विषयावर चर्चा करून तातडीने आठ दिवसात दिलासा देण्याचे मान्य केले खडबडून तालुका प्रशासन जागे होऊन हे सर्व प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिले यावेळेला मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते व दिलेल्या निवेदनावर शेकडो गावकऱ्यांच्या सह्या घेऊन हे निवेदन प्रशासनाला सादर झाले यावेळी मोतीराम चव्हाण निवृत्त मुख्याध्यापक रमेश अशोक धर्मा जाधव सुरेश राठोड रविंद्र रामचंद्र राठोड लालसिंग रामा राठोड काशिराम जाधव सदाशिव पवार गोपीचंद पवार देविदास राठोड आकाश राठोड विनोद मुळे शेरसिंग आडे निवृत्त पोलिस नायक देवराव राठोड रमेश भाऊ जाधव प्रेम सिंग राठोड अधी गावकरी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे सोशल फिजिकल डिस्टन्स पाळून हे आंदोलन यशस्वी केले मनीष भाऊ यांना शरबत चे ग्लास एबी सूर्यवंशी यांच्या हाताने देऊन या आंदोलनाचा समारोप झाला

नीलगाईच्या पाडसाला शेतकर्‍याने दिले जीवदान

 

Acr :- यवतमाळ : काळी दौलतखान सर्कलमधील वागद शिवारात आईपासून दुरावलेले नीलगाईचे पाडस आढळून आले. गावखारीच्या शेतात कुत्र्यांची भीती असताना मनीष जाधव या मायाळू शेतकर्‍याने भुकेलेल्या पाडसाला गाईचे धारोष्ण दूध पाजून जीवदान दिले.

VO :- वनविभागाच्या कर्मचार्‍यांना पाडस सोपविल्यानंतर त्यांनी रात्रीला पाडसाला निलगाईंच्या अधिवासात त्याच्या आईच्या मिलनासाठी सोडून दिले.आकाश राठोड यांच्या शेतातील कपाशी पिकात दोन आठवड्याचे नीलगाईचे गोंडस पाडस आढळून आले. दुडू-दुडू धावणारे पिलू पाहून ते आईपासून दुरावले असल्याचे लक्षात आले. प्रथमदर्शनी हे पिलू हरिणाचे असावे, असे वाटले. आकाश राठोड त्यांचे मित्र आत्माराम राठोड, संतोष चव्हाण यांनी शेजारी शेतकरी मनीष जाधव यांच्याकडे ते सोपविले. त्यांनी लगेच भुकेल्या पाडसाला गाईचे धारोष्ण दूध पाजले. दूध पोटात जाताच मलूल झालेल्या पाडसाला तरतरी आली. त्यांनी लगेच वनविभागाचे वडद क्षेत्र सहाय्यक शालिक जाधव यांना कळविले. त्यांनी तत्परतेने मनीष जाधव यांचे शेत गाठले व पाडसाला ताब्यात घेतले.

मनीष जाधव शेतकरी

संकल्प फाउंडेशनच्या वतिने पत्रकार बांधवांना वाफारा यंत्राचे वाटप.

 

 

यवतमाळ-:गेल्या सात महिन्यापासून यवतमाळ शहरात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला असुन संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.या महामारीचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे.आता तर शहरात कोरोणा रुग्णांची संख्या शेकडोच्या पटीने वाढत आहे.या कोरोणाच्या महामारीतुन वाचण्यासाठी नियमांचे पालन,जनजागृती व त्यावरील उपाय महत्वाचे आहे.याच अनुषंगाने संकल्प फाउंडेशनच्या वतिने प्राथमिक उत्तम पर्याय म्हणून आयुष मंत्रालयाने सांगितल्या प्रमाणे प्रत्येकाने वाफारा घेणे गरजेचे असल्यामुळे शहरातील पत्रकार बांधवांना वाफारा यंत्राचे वाटत करण्यात आले.

 

गेल्या सात महिण्यापासुन विवीध उपक्रम राबवित संकल्प फाउंडेशनने प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून लाॅकडाऊनच्या काळात जनजीवन विस्कळीत झालेल्यांना जिवनावश्यक वस्तु किट वाटप केले,रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधी वाटप केले,या सह लाॅकडाऊनच्या काळात सामाजिक अंतर राखण्याच्या हेतुने उत्कृष्ट अशा संकल्प भाजी बाजाराचे आयोजन करुन सामाजिक अंतर राखण्याचा नागरीकांना संदेश दिला.लाॅकडाऊन सुरु असतांना व आज ही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक उपचार म्हणून वाफारा यंत्राचे वाटप करण्यासाठी शासकिय विश्रामगृहात सामाजिक अंतर पाळुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून

स्वंयसेवी संस्थांचे समन्वयक प्रा.घनश्याम दरणे,प्रमुख पाहुणे भाई अमन तसेच ईतर मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बांधवांना वाफारा यंत्राचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार यांनी केले तर सुत्र संचालन संकल्प वनिता वाहिनीच्या प्रमुख सौ.अंजली फेंन्डर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार,सचिव वसंत शेळके,अनिल तांबेकर, सुकांत वंजारी प्रसिद्ध प्रमुख,नितेश यादव,मनीष इसाळकर,मनोज पवार,किशोर नरांजे,निकेश तिरपुडे,आकाश भारती,अनिकेत गोपाळे,राम कुकडे,नितीन माटे तसेच संकल्प वनिता वाहिनीच्या सौ.संगीता टिप्रमवार यांनी प्रयत्न केले.