Sat. Sep 24th, 2022

TV INDIA

शेगां तोडण्याच्या नादात तरुणाने गमावला जीवघाटंजी तालुक्यातील साखरा येथील घटना

 
यवतमा,: वेळ आनी काळ आला, कानून होइल हे संगंग येत नाही। ऐच्या शेंगा तोडण्यासाठी घराच्या टिनावर चढलेल्या तरुणचा तोल जाऊं खाली कोसळला यात जैसीछा घटनास्थळीच जीव गेला। केवल घटना मचवारी बनी हुई घटना सव्वाआठ वाजता दरम्यान घाटंजी तालुक्यतिल साखरा येथे घडली।
रमेश उत्तम चौधरी (किशोर २८) असे मृत तरुणचे बो आहे। आज तक आजी नेहमी प्रमाणे झोपेतून उठला। ऐच्या शेंगा तोडान्यासा घरावरील तिनवर चढला। यावे याी कावे आपल्यावर तपून बसला आहे। / चि पुत्सति कल्पना लभ्य मनात आली नाही। शेंगा तोडत असताना तोल जाऊं खाली कोसला। ओरत जागीच लच्छी मृत्यू झाला नागरिकंतना घटनेची माहिती मिळताच शेषं घटनास्थ धी धव गौउन गरदी केली। शेंगा तोडनेबाज़वर बेतल्याने परीसरात हातत एक्सप्रेस होत आहे। पुढील तवे जमादार वाघाडे करीत आहे।

कर्ज फेडीत महिलाच अधिक प्रामाणिक जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ; एसबीआय चावडी’ उपक्रमाचे उद्घाटन

यवतमाळ: दि.२८ ‘चूल आणि मूल’ या पांरपरिक संकल्पनेतून महिला कधीच्याच बाहेर पडल्या आहेत. आज कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात महिलांचा वाटा आहे. दैनंदिन व्यवहारातील जमाखर्च, मुलांचे शिक्षण, घरचा ताळेबंद आदी जबाबदा-या त्या समर्थपणे सांभाळत आहेत. कर्ज फेडीत महिला अधिक प्रामाणिक आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

पोस्टल ग्राऊंड येथे भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय व्यवस्थापक कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘एसबीआय चावडी’ उपक्रमाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसबीआयचे उपमहाप्रबंधक रजत बॅनर्जी, अपर पोलिस अधिक्षक नुरूल हसन, क्षेत्रीय व्यवस्थापक सुहास ढोले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे आदी उपस्थित होते.


बँकेच्या वेगवेगळ्या योजना लाभार्थ्यांना कळाव्यात, या उद्देशाने भारतीय स्टेट बँकेच्यावतीने दोन दिवसीय चावडी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, बँकांनी महिला बचत गटांना जास्तीत जास्त मदत करावी. बँकेचे कर्ज महिला वेळेपूर्वीच परतफेड करतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे. पैशाच्या नियोजनाबाबतीत त्या उत्कृष्ट व्यवस्थापक असून महिलांमुळे गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देशाचा विकास होण्यास मदत होते. महिला बचत गटाची चळवळ आणखी जोमाने चालविण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने बचत गटांना सहकार्य व आर्थिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. या चावडी उपक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ व ग्राहक मिळावे, हासुध्दा उद्देश आहे, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.


तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बचत गटाच्या महिलांना कर्जाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रदर्शनात एकूण 45 स्टॉल लावण्यात आले असून यापैकी 32 स्टॉल महिला बचत गटांचे आहे. यात मादणी येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गट, आर्णि येथील अनुसया माता महिला बचत गट, कांडली येथील जगदंबा महिला बचत गट, उचेगाव येथील दुर्गा शक्ती महिला बचत गट, वटफळी येथील वैष्णवी महिला बचत गट आदींचा सहभाग आहे.
कार्यक्रमाला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार भगत, सुजित क्षिरसागर यांच्यासह भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाई (रूई)येथे केंन्द्रस्तरावरील क्रीडा स्पर्धा संपन्न

आज दिनांक 27/11/19 ला वाई (रूई)येथे मंगरूळ केंद्रातील 12 शाळेच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उमेश हेळगीर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वाई मराठी, उद्घाटीका सौ.कांताताई संजयराव कांबळे सदस्य पंचायत समिती यवतमाळ, प्रमुख पाहुणे श्री फिरोजभाई अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वाई उर्दू , श्री शंकरराव काळे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वाई,श्री इमरानभाई,श्री किशोर गोळे विस्तार अधिकारी शिक्षण परिसर मंगरूळ, श्री रामेश्वर कपाट केंद्र प्रमुख मंगरूळ, कु.वैशाली गायकवाड साधनव्यक्ती, सौ.कल्पना शेळके मुख्याध्यापक मंगरूळ, श्री किशोर सरोदे मुख्याध्यापक वाई मराठी व श्री हुसेन शेख मुख्याध्यापक वाई उर्दू हे उपस्थित होते.श्री अय्याज अहमद खान श्री शिवाजी उर्दू हायस्कूल रूई व श्री जावेद काझी अल्ताफ अली काझी इंग्लिश मिडीयम स्कूल रूई यांनी पंच म्हणून कार्य केले. कार्यक्रमाचे यशस्वीते साठी श्री दत्ता परतेती,यशोधरा काटकर,संजिवनी कांबळे, अनिता आगे,लता वानखेडे, तिलोत्तमा ठाकरे, समस्त गावकऱ्यांनी व केंद्रातिल सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

स्मृती पर्व २०१९ मध्ये चर्मकार समाजाचे वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रमाचे आयोजन

चर्मकार समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन – चर्मकार समाज यवतमाळ

यवतमाळ प्रतिनीधी

यवतमाळ जिल्ह्यातील चर्मकार समाजाच्या वतीने २८ नोव्हेंबर गुरुवारला सायंकाळी ०६:०० वाजता यवतमाळ येथील आझाद मैदान येथे स्मृती पर्व-२०१९ मध्ये गुरु रविदास यांचे विचार व आधुनिक काळातील चळवळीचे स्वरूप या विषयावर वैचारिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.कमलताई देविदास खंडारे या आहेत, गुरू रविदास यांच्या विचारधारेवर मा. डॉ.कल्याणीताई पद्मने (एमडी आयुर्वेद) फुले शाहु आंबेडकरी विचारवंत अकोला, तसेच अमर तांडेकर राष्ट्रीय रविदास परिषद प्रवक्ते हे मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संध्याताई बांगडे,सुजाताताई मोकळे,कमलताई पतके,लताताई सोनटक्के,संगीताताई वानरे,भारतीताई तांडेकर,उषाताई ठाकरे,वनिताताई झाडे,आशाताई बर्वे,वर्षाताई डहाके,संगीताताई इंगळे,वैशालीताई बच्छराज, कैवल्याताई कुंभरे,निर्मलाताई विनकरे यांची उपस्थिती राहनार आहे. यावेळी स्मृतीशेष देविदासजी खंडारे,शेषरावजी सूर्यवंशी,राजकुमार झाडे, किशनराव मालखेडे यांना समाजक कार्याच्या योगदानाबद्दल त्यांच्या परिवाराचा स्मृती सन्मान देऊन यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ साहित्यिक दलित मित्र खुशालराव डवरे,समाजातील संघटक असलेले उत्तमरावजी ईसाळकर यांना (जीवनगौरव पुरस्कार),विश्वासराव वालदे (भूजल वैज्ञानिक)निलेश ठोंबरे(एस.डी.ए.आ) शामकुमार आकोडे (संत रविदास पुरस्कार म. रा. २०१९)डॉ.देवानंदजी तांडेकर (संत साहित्य अकादमी अध्यक्ष पुरस्कार प्राप्त २०१९ म. रा.) प्रा. मिनाक्षी सावळकर(पानझाडे),नरेशजी बच्छराज, श्रीकृष्णजी पखाले (राज्यस्तरीय पुरस्कार २०१९ ),मायाताई चंदनकर,तोष्णाताई मोकडे, संबाभाऊ वाघमारे(ज्येष्ठ समाजसेवक),इंजिनियर एस.एन.बांगडे सर, चंद्रशेखरजी लहाडके,बळीरामजी पतके(जेष्ट समाजसेवक), डॉ.विश्वनाथजी विनकरे, रमेशजी पिंपरखेडे(कृषी उपसंचालक,यवतमाळ), महेशजी डहाके(संचालक विश्वास स्पर्धा परिक्षा), हरिषजी कुरील, प्रमोद वाघमारे ज्यांचा चर्मकार समाजामध्ये सामाजीक कार्यात विशेष सहभाग घेऊन सामाजिक कार्य केल्याबद्दल त्यांचा समाजाच्या वतीने पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

या वैचारिक प्रबोधनाच्या कार्यक्रमाला दिनांक. २८ नोव्हेंबर २०१९ ला सायंकाळी ०६:०० वाजता जिल्ह्यातील व शहरातील समस्त चर्मकार समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संजय तरवरे,विजय मालखेडे,मनिष ईसाळकर, अभिलाश खंडारे,रवी बच्छराज,हरीश कठारे,भंडारी दुबेकर,महेश चंगोले तसेच यवतमाळ जिल्हा चर्मकार समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

२८ नोव्हेंबर पासून यवतमाळात फुले-आंबेडकर स्मृतीपर्व

यवतमाळ -म.ज्योतीराव फुले यांच्या स्मृती दिनापासून ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत २८ नोव्हेंबर ६ डिसेंबर असे एकुण ९ दिवस चालणाèया स्मृती पर्वाचे आयोजन यवतमाळातील आझाद मैदानात करण्यात आले आहे. स्मृती पर्वाचे हे १४वे वर्ष असून विविध संघटनांच्या सहभागाने या पर्वाचे येथे आयोजन करण्यात येत असते. या ९ दिवसाच्या वैचारीक मेजवाणीचा आस्वाद संपूर्ण जनतेने घ्यावा असे आवाहन आज आयोजित पत्रकार परिषदेत स्मृती पर्वाचे आयोजन तथा समन्वयक डॉ.ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे, कवडूजी नगराळे यांनी केले. यावेळी रियाज सिद्धीकी, बाबुqसग कडेल, सुनिता काळे, माया गोरे,संजय बोरकर, प्रा.काशिनाथ लाहोरे यांच्यासह आयोजन समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते. ९ दिवस दररोज एका संघटनेने वैचारीक पर्वाचे संयोजनाची जवाबदारी घेतली असून रोज सायंकाळी ६ वाजता विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली आहेत. यासाठी सुप्रसिद्धी साहित्यीक व विचारवंत डॉ.कल्याणी पद्मणे, डॉ.प्रभाकर गायकवाड, दिलीप सोळंके, अ‍ॅड.धनराज वंजारी, वाजीद कादरी, प्रा.डॉ.संतोष खंदारे, रवी मानव, प्रा.देविदास घोडेस्वार, ना.मा.बंजारा, प्रा.वसंत कनाके, एस.जी.माचनवार, अ‍ॅड.फारुकी अहेमद, अतुल खोब्रागडे, अशोक बुरबुरे, इत्यादींचे व्याख्यान होणार आहे. फुले आंबेडकर स्मृती पर्वाच्या अयोजन करणाèया संघटनामध्ये गुरु रविदास विचार मंच, सत्यशोधक स्टडी सर्कल, अ.भा. अंधश्रद्धा निर्मुलन समिती, तेली समाज महासंघ, जमात ए इस्लामी (हिंद), साहित्यरत्न अण्णाभाउ साठे स्मारक समिती, प्रज्ञाशिल प्रतिभा लॉर्ड बुद्धा संवैधानिक प्रतिष्ठान, भटक्या विमुक्त जमाती, अ.भा. आदिवासी विकास परिषद, भारतीय पिछडा(ओबीसी) शोषीत संघटना, स्मृतीपर्व महिला समिती, वुमेन्स विंग्ज ऑफ आंबेडकराईटस मुव्हमेंट, तसेच आंबेडकरी साहित्य व कला अकादमी यांचा समावेश आहे.